Top Post Ad

मुंबईतील दोन मेळावे... निळ्या जनसागराची उपेक्षा


5 ऑक्टोंबर-2022 रोजी नागपुरात धम्मचक्र. मुंबईत शिवसेनेची विजयादशमी. या दोघांची तिथी ठरलेली. मात्र मीडियावर गाजले. मुंबईतील दोन मेळावे. निळ्या जनसागराची उपेक्षा. लोग तो कहेंगे. पक्षपाती मीडिया. एक ठाकरे मेळावा. ही शिवसेनेची परंपरा. दुसरा शिंदे मेळावा. हे सत्तेचे शक्ती प्रदर्शन.ती मीडियांवर लाईव्ह दिसत होती. माध्यमांनी ती देशभर दाखविली. लयी गाजलं. मुंबईतलं राजकारण.अन् त्यांचे दोन मेळावे. त्यासाठी किती पैसा ओतला. हिशेब नाही. जिल्ह्याजिल्ह्यातून बसेस गेल्या.राज्याच्या टोकावरच्या गोंदिया जिल्ह्यातूनही गेल्या. मुंबई-गोंदिया हजार किलोमीटर अंतर. त्या गाड्यांचे भाडे. शिवाय कार्यकर्त्यांचा बडदास्तीचा खर्च वेगळा. हे जिल्ह्याजिल्ह्यात घडले. यावरून उर्वरित जिल्ह्यांचा अंदाज येईल.


माणसं भरभरून नेले.लोकांनी पहिल्यादा हे बघितलं . जिल्ह्यांतून मुंबईच्या विजयादशमीला माणसं जाताना. ते सोशल मीडियांनी दाखविलं. मुख्य मीडियावर केवळ सभामंच व तयारीचे दृष्य होतं. ते सत्ता व पैसेवाल्यांचे मेळावे. ठाकरे गटाने इंकार केला. इथं भाड्याची माणसं नाहीत. पायी आलेली माणसं आहेत. हे सांगितलं हा भाग वेगळा. हे देण्या घेण्याचे मेळावे होते. सौदे ठरले होते. सौदेवाल्या मालकांची मर्जी सांभाळली जात होती. त्यानुसार चॅनेलवर दाखविले जात होते. लाईव्ह होते. दिवसभर झळकले. त्यात बेपत्ता दिसला. नागपूरचा दीक्षाभूमीवरचा मेळावा. तसा तो दरवर्षीच असतो. स्मारक समितीचे ते आयोजन असते. ते पैसा थोडीच खर्च करणार. तरी लाखोंनी लोक येतात. खूपिया विभागाच्या अंदाजानुसार आठ लाखांवर लोकं आलीत. त्यांची गोदी मीडियावर दखल नाही. हे योग्य नाही.
दीक्षाभूमीवर देशभरातून माणसं येतात. दिल्ली, मुंबई, बंगलोर, कलकत्ता आदी मोठ्या शहरातून. हिंदी पट्यातून आली. लोक आता आपल्या गाड्या, ट्रक,कार, मेटॉडोरनेही येऊ लागले. अलिकडे विदेशातूनही माणसं येतात. ती वेगवेगळ्या राष्ट्रातील असतात. तरी चॅनेलवाले फिरकत नाहीत. हा प्रकार यंदा जास्तच प्रकर्षाने जाणवला. त्याचे कारण मुंबईतील मेळावे. या निमित्तानं बरंही झालं. देशभरातील मीडिया उघडा पडला.तसा हा त्याचा दरवर्षीचा पक्षपात. यातून त्यांची मानसिकता कळली. प्रवृत्ती दिसली. कर्नाटक राज्यातून माणसं आली. 40 ट्रव्हल्यस् आल्या. त्या वेगवेगळ्या बौध्दवस्तीत थांबल्या. त्यांची बडदास्त वस्तीवाल्यांनी ठेवली. बंगलोरचे रवि कीर्ती म्हणाले, पुढच्या वर्षी पाच लाख येतील. इथं ऊर्जा मिळते. ती वर्षभर पुरते. या विधानात दम आहे. लोक येतात. दर्शन घेतात. निघून जातात. जत्थांनी येणारे घोषणा देत येतात. निळे व धम्म झेंडे खाद्यांवर असतात. त्यात तरूण ,वृध्दही दिसतात.ते झपाटलेले असतात.ओढ असते दीक्षाभूमीची. त्यांना कधीच ऊन, वारा, पाऊस थांबवू शकत नाही. थांबवू शकला नाही. हे काल पुन्हा एकदा सिध्द झालं. ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती. माणसं उभी झाली. ताटमानेने जगू लागली. दोन-चार नेते बिघडले. वैचारिकता सोडली. राजकीय गटारगंगेत वाहिले. सामान्य जनता कायम आहे. आपल्या निष्ठेवर. आंबेडकर, तथागतांच्या विचारांवर. त्यांची गर्दी होती. पुस्तकांच्या स्टॉलवर . लाखों पुस्तके विकल्या गेली. हे विचारधन घराघरांत गेले. ते घडविणार भावी पिढी.
नागपूर देशातील मध्यवर्ती ठिकाण. इथं होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा. त्यासाठी प्रत्येक माणूस स्व:खर्चाने आला. सहपरिवार आला. मिळेल त्या साधनाने आला. शिदोरी घेवून आला. पावसात भिजला. तरी ना आ ..! ना ऊ..! पाऊस कोपला. दुपारी आला. सायंकाळी पांच वाजता आला. काही काळ थांबला. पुन्हा सततधार बरसला. माणसं, महिला, मुलं ओलिचिंब झाली. तरी लोकजत्थे थांबेनात. श्रध्दा सूमनं वाहूनच थांबत. कमालीची जिंद. हे दृष्य बघून मन हेलावते. डोळे पानावतात. काहीजण छत्री घेऊन होते. ते भिजलेल्या परिवारांतील मुलांवर छत्री धरताना दिसले. विचलित करणारी अनेक दृष्य होती. दीक्षाभूमी रात्री सुध्दा माणसांनी फुलली होती. गर्दी थोडी ओसरली होती. आंत जाणाऱ्यांच्या रांगा कायम होत्या. हे तथाकथित राष्ट्रीय मीडियाने टिपले नाही. लोकांना दाखविले नाही. या मानसिकतेला काय म्हणावे..! आठ लाखांवर लोक स्वयंम स्फूर्तपणे येतात. त्यांची दखल नाही. ही उपेक्षा चीड आणणारी. याचा जॉब द्यावा लागेल. याचा कधीतरी हिशेब तर होणारचं. नवी पिढी घडत आहे. लवकरच ती हिशेब मागेल. तेव्हा मीडिया घराणे उघडे पडतील. त्या क्षणाच्या प्रतीझेत असंख्य आंबेडकरराईट...!
▪-भूपेंद्र गणवीर



दिक्षाभूमीचा आश्वासक ' फोर्स '
लोकशाही वाचवणारे जागर...एल्गार!
■ दिवाकर शेजवळ
भारताला मिळालेले स्वातंत्र्य (राजकीय) आणि स्वीकारलेली लोकशाही किती काळ टिकेल, याची वाटणारी चिंता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला प्रदान करतानाच बोलून दाखवली होती. स्वातंत्र्य आणि लोकशाही पुन्हा गमावून बसण्याची त्यांना वाटलेली भीती खरी ठरण्याच्या टप्प्यावर देश आज येऊन ठेपला आहे. हा धोका अटळ असल्याचे महान द्रष्ट्या अशा संविधानाच्या जनकाने
७५ वर्षांपूर्वीच हेरले होते.
देशाला संविधान दिले, आता आपली राष्ट्रीय जबाबदारी संपली, असे त्यांनी मुळीच मानले नव्हते.
देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित राखण्याबाबत राज्यकर्ते आणि येथील राजकीय पक्षांवर भिस्त आणि भाबडा विश्वास टाकायला बाबासाहेबांचे मन तयारच नव्हते. तो धोका निवारण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ते आपल्या परीने कामालाही जुंपले होते. त्याचे दर्शन संविधान अंमलात आणल्यानंतर सहा वर्षांनी अवघ्या देशाला घडले!
संविधान स्वीकारतानाच्या क्षणी आपला देश लोकशाहीला मारक असलेल्या अनेक विसगतींमध्ये प्रवेश करत आहे, याची जाणीव करून द्यायला बाबासाहेब ना विसरले होते, ना कचरले होते. आपण दिलेली लोकशाही अबाधित राखण्यासाठी लोकशाहीला अनुरूप अशी देशवासियांची मानसिकता इथे अजिबात तयार नाही, याच्या चिंतेने त्यांना ग्रासले होते. अन हे काम दिर्घपल्ल्याचे असून आपल्या पश्चात ते कितपत पूर्णत्वाला जाईल, याविषयी ते कमालीचे साशंक होते. लोकशाहीला चिरंजीवी करण्यासाठी समता,स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांना मानणारे लोकमानस घडवण्याचा ध्यास बाबासाहेबांनी घेतला होता. आपले हे इप्सित त्यांनी करोडो दलित बांधवांना तथागत बुद्धाच्या पथावर आणून एकाच झटक्यात साध्य केले. अन त्यातून लोकशाही वाचवण्यासाठी सक्षम आणि तुल्यबळ 'फोर्स' कायमस्वरूपी उभा करून टाकला. त्यांनी घडवलेल्या नागपुरातील धम्म क्रांतीचे खरे आणि सर्वात मोठे फलित हेच आहे.
त्या फोर्सची काल दीक्षाभूमीवर एकवटलेली ताकद आश्वासक आणि ऊर्जा देणारी आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने ती लाख झाकली तरी सोशल मीडियातून ती जगाला दिसण्याचे थोडेच थांबले?
अर्थात, संविधान आणि लोकशाही कायम राखून देशाला हुकूमशाहीच्या जबड्यात जाण्यापासून वाचवणारा हा 'फोर्स' आता दिक्षाभूमीपुरताच मर्यादित राहिलेला नाही, हे विशेष. काल दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 'फोर्स'नेही लोकशाही टिकवण्याच्या निर्धाराचाच आवाज बुलंद केला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या ठाण्यातून लवकरच निघणाऱ्या राज्यव्यापी प्रबोधन यात्रेतून तोच आवाज घुमणार आहे. काँग्रेसचा युवा नेता कन्हैया कुमार लोकशाही वाचवण्याची हाक देतच उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या पिंजून काढत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा'सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठीचाच जागर आणि एल्गार आहे.
ही लढाई केवळ उपेक्षित, वंचित, मागास वा अल्पसंख्याक समूहांच्या हित रक्षणाची,सुरक्षिततेची नाहीच. ती व्यापक सार्वजनिक हिताची आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार, मानवी हक्क शाबूत राखण्यासाठी, लोकाभिमुख राज्य कारभाराद्वारे त्याचे जगणे सुसह्य करण्यासाठी, निर्भयपणे मोकळा श्वास घेण्यासाठी ही लढाई समस्त देशवासियांना लढावी लागणार आहे. त्या लढ्यात दीक्षाभूमी- चैत्यभूमीवर एकवटणारी आंबेडकरी भीमशक्ती ही मोठी जमेची बाजू असून संविधानकारांचीच ती देणं आ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com