आजच्या युगात शिक्षणाला प्रचंड महत्व आहे हे आपण सर्व लोक जाणता आहात.शिक्षण असेल तर,आणि तरच आपल्याला, आपल्या मुलामुलींना चांगली नोकरी लागते, चांगला व्यवसाय करू शकतो जगात मानासन्मानाने स्थान मिळते. कोणी ईंजिनीयर कोणी डाॅक्टर कोण व्यावसायिक तर कोण बिल्डर होऊ शकतो.आपले आईवडील आपल्याला त्यासाठीच पदरमोड करून प्रसंगी उपाशी राहून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात.
परंतु मुंबई महाराष्ट्रात एक असाही वर्ग आहे जो अजूनही गरीबीच्या रेषेत आहेत ईच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही काही लोक गावकुसाबाहेर ,रानात आदिवासी पाड्यातशराहतात जिकडे वीजदेखील पोहोचलेली नाही.
मित्र हो सध्या शिक्षण कमालीचे महाग झाले आहे मध्यमवर्गीयांच्यादेखील हाताबाहेर गेलेले आहे. आणि या अशा सर्व वर्गाला शिक्षणाचा परीघात आणण्याचा एक वही एक पेन अभियानचा अल्पसा प्रयत्न आहे.या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ,(वह्या पेन, पुस्तके, दप्तर,संगणक,मोबाईल, कंपास ,गणवेश ,कपडे ) आदी साहीत्य पुरविणे,Mpsc,Upsc क्लासेस चालविणे याकामी आपल्या सर्वांचाच हातभार,सहभाग व अल्पसी मदत या अभियानाला हवी आहे.
मित्र हो या कामासाठी आपण डिसेंबर-२०१५ पासून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी "हार रफुलांऐवजी महामानवाला एक वही एक पेन" अर्पण करा ही मोहीम राबवली.या मोहिमेला मुंबईसह राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले जयंती ,वीरमाता माॅ जिजाऊ जयंतीला देखील एक वही एक पेन अर्पण करण्याचे आवाहन केले,
दसरा व अशोकविजया दशमी दिनी(धम्म चक्र प्रवर्तन दिनीदेखील "एक वही एक पेन " हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात आवाहन केल्यानंतर तर राज्यातील विविध गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला अक्षरशः उचलून घेतले. ठिकठिकाणी हा उपक्रम लावल्यानंतर या मंडळांनी समाजातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य वाटप व शिष्यवृत्ती वितरण केले आहे .
आपण सुरूवातीला नको फुले नको हार असे ब्रीदवाक्य घेऊन चाललो होतो
मात्र हारफुलांच्या व्यवसायात आपलेच शेतकरी व फुलविक्रेते बांधव असल्यामुळे यापुढे आपण "हारफुलांऐवजी " हे ब्रीदवाक्य बदलून *हारफुलांसोबतच किमान एक वही एक पेन* अर्पण करा हे स्लोगन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आता येत्या ६ डिसेंबर दिनी म्हणजे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वीण दिनी महामानवाला हारफुलांसह वह्या आणि पेन तसेच शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करा असे आवाहन आपण एक वही एक पेन अभियानच्या माध्यमातून करीत आहोत. दादर चैत्यभूमीवर येताना किंवा राज्य आणि देशात महामानवाला अभिवादन करताना हारफुलांसोबतच शैक्षणिक साहित्य देखील घेऊन जावे.संबंधित मंडळे संस्थांनी जमा झालेल्या सदर साहित्याचे वितरण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना करावे.अशा प्रकारे आपण महामानवाने दिलेला 'शिका' का कानमंत्र आपण अंमलात आणू शकू.
मित्र हो, एक वही एक पेन अभियानचे हे ८ वे वर्ष सुरू आहे. या ८ वर्षात अभियानच्या माध्यमातून व आपल्यासारख्या मित्र मंडळी व दानशूर मान्यवरांच्या साथीने मुंबई ठाणे व महाराष्ट्रातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण केलेले आहे. ८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एक वही एक पेन अभियान या रोपट्याचा वटवृक्ष होत चालला आहे. या अभियानात जात पात धर्म पंथ आपापल्या घरात ठेवून एका उदात्त हेतुने "एकमेका साह्य करू "अवघे धरू सुपंथ !
या उक्तीप्रमाणे आपल्याला सर्वांना काम करायचे आहे .यात आपल्या सर्वांची साथ म्हणण्यापेक्षा आपण सर्वानी मिळून हे अभियान यशस्वी करू या .
धन्यवाद
आपलाच
राजू झनके पत्रकार मंत्रालय
महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेला धर्मातराचा सोहळा धम्म चक्र प्रवर्तन दिन (अशोक विजया दशमी) म्हणून देशभरात साजरा केला जात असून त्यांनी जनतेला दिलेला शैक्षणिक संदेश लक्षात घेता या दिवशी त्यांना शैक्षणिक अभिवादन केले जाणार असल्याची माहिती एक वही एक पेन अभियानच्या वतीने देण्यात आली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी- १४ आक्टोबर १९५६ रोजी अशोका विजयादशमी (दसरा) दिनी आपल्या लाखो बांधवांना नागपूर येथे. बौध्द धम्माची दीक्षा दिली. देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक धर्मातर होते. या घटनेच्या प्रित्यर्थ नागपूर येथे दीक्षाभूमी उभारण्यात आली असून या ठिकाणी अशोक विजया दशमी दिनी आजही लाखो लोक नतमस्तक होण्यासाठी येत असतात. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळा आपण अत्यंत हर्षोल्हासात तसेच विविध प्रबोधनकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा बुध्द विहार व सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो .आपल्या घरी गोडधोड बनवून तोंड गोड करतो. या सर्व कार्यक्रमासोबतच सोबतच शैक्षणिक सह विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा केला..
अशोक विजयादशमीचा सोहळा साजरा करीत असताना राज्यातील बांधव आपल्या घरात बनवलेले गोड धोड पदार्थ समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांनाही देऊन हा आनंद द्विगुणीत केेला.. बुध्दविहारातील तथागत भगवान बुद्ध, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरूषांना हारफुलांसोबतच किमान एक वही एक पेन आपल्या मुलांची जुनी पुस्तके व शालेय साहीत्य ठेवून अभिवादन करणार आहेत .समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शक्यतो नवीन कपडे दिली. वापरात नसलेले मोबाईल,आयपॅड , पीसी किंवा तत्सम साहीत्य या वस्तू समाजातील गरजू विद्यार्थ्यांना दिले
स्थानिक बुध्दविहार किंवा डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीला धम्मदान देवून यंदाचा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला
एक वही एक पेन अभियानाला सहकार्य करण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा
- राजु झनके
- 9372343108
- *एक वही एक पेन अभियान महाराष्ट्र*
0 टिप्पण्या