मराठी हिंदूह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपवली ?

 

   मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक ,आमदार,खासदारांना जेरीस आणले होते,कायदेशीर कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारंची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते. कंपनीचा मालक असो की व्यापारी, बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती.त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई झाल्याची नोंद नाही.त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले, नगरसेवकांचे आमदार झाले.त्यांनी दलित मुस्लिम समाजा विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदूह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.त्यावेळी शिवसेना प्रमुखांची जाहीर धमकी होती माझ्या केसाला हात लावला तर उभा महाराष्ट्र पेटेल!.किंवा पेटून टाकील आणि त्यांचे परिणाम वाईट होती.या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी धोक्यात आली होती.पोलीस अधिकारी प्रत्येक वेळी कारवाई करण्यात मोठा धोका आहे असे रिपोर्ट सत्ताधारी पक्षाच्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सादर करीत होते. यामुळेच मराठी हिंदू ह्र्दयसम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली. ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.

ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त या मातीत सांडले आहे.त्याच मराठी भाषिक राज्याचे कोणी तुकडे पडण्याचे स्वप्न पाहत असेल तर?. आपण शांत बसून राजकारण पाहत राहणार काय?.त्यासाठीच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दयसम्राटाची दहशत राज्यात हवी होती. ती आता पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे रिक्षावाला वाहन चालक, टपरीवाले, नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदूह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पापमुक्त होण्यासाठी करीत आहेत. आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदूह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम करीत आहे. ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी बलाढ्य शिवसैनिकांची शिवसेना एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्वादी विचारांचे विरोधक होतो.आणि आज ही आहोत. पण मराठी माणसांच्या स्वाभिमानी जगण्यासाठी महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरेंनी स्थापना केलेली शिवसेना आज ही हवी आहे.अन्यता हे ब्राम्हण बनिया जातभाई मुंबई सह महाराष्ट्र गिळकृत कारणासाठी १९६० साला पासून टपून बसले आहेत.पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे आमदार खासदारांनी स्वार्थासाठी शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लावत आहेत. हे मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी खूप वेदनादायक आणि भविष्यासाठी प्रचंड नुकसान करणारे आहे.

           मुरारजी देसाई चे स्वप्न मराठी माणसांनी प्रचंड जनांदोलन करून १०६ हुतात्मानी उधळून लावले.तेव्हा पासून गुजरातचे गुजर मारवाडी बनिया ब्राह्मण आपल्या राज्यातील उद्योग धंदे गुजरात कडे घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत होते. त्याला मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत होती.तीच आमदार कट्टर शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने करीत आहेत.देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या नियोजनबद्ध योजनेनुसार राज्यातील उद्योग धंदे गुजरातला  पळवत असतील तर त्या कृतीचा मराठी माणसांनी पक्ष संघटना विसरून विरोध केलाच पाहिजे.आर एस एस प्रणित संस्था संघटना आणि भाजप पक्ष यांच्या हिंदुत्वादी मराठी माणसांना मोदीच्या निर्णयाचा विरोध करायचा नसेल तर तो त्यांनी करू नये.पण महाराष्ट्रात त्यांना भविष्यात राजकारणात किर्याशील राहायाचे आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राट जिवत असते तर त्यांनी कट्टर शिवसैनिकांना आदेश दिला असता "जिथे दिसतील तिथे तुडवा" त्यांची अंमलबजावणी शिवसैनिकांनी ताबडतोब केली असती.महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ हिंसक झाला असता. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगाडली असती आणि हे शिवसेनेशी गद्दारी करणारे घराच्या बाहेर पडले नसते त्याच बरोबर यांना फितूर करणारे रात्री तोंड लपूनछपून फिरणारे सुद्धा दिवसा फिरण्याची हिंमत करू शकले नसते.याचा भाजपा समर्थक मराठी माणसांनी मतदारांनी विचार केला पाहिजे.
        भाजपा समर्थक मराठी मतदारांनी आज लक्षात घ्यावे की आज त्यांचे समर्थन करत असाल तर उद्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही ते गुजरातला घेऊन जातील.कारण त्यांना माहीती आहे.आपण कीतीही चुकीचे केले तरी आपले भक्त आपले समर्थनच करतील.माणुस किती ही वाईट आणि किती ही निच मनोवृत्तीचा असला तरी काही ही झालं तरी तो आपल्या घराचा राज्याचा देशाचा चांगलाच विचार करतो.परंतु आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी तर लोकलज्जा शर्मच सोडली आहे. ज्या भाजपाला महाराष्ट्राने १०५ आमदार व २२ खासदार दिलेत ते १०५ आमदार व २२ खासदार सुध्दा आपल्या राज्याचा विचार करत नसतील तर यांना मतदारांनी धडा शिकविला पाहिजे. 

वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्याने आपल्या राज्याचे १,५४.००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात यावा यासठी अनेक प्रयत्न केले.उद्योग मंत्री सुभाष देसाई,अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग आणि एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन यांच्यासह मंत्र्यांनी खूप वेळा कंपनीच्या अधिकाऱ्या भेटा घेऊन सोबत बैठका घेतल्या होत्या. वेदांत फॉक्सकॉर्न कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथे जमिनीचे सर्वेक्षण सुद्धा केले होते. हीच जागा संपूर्ण देशातील सर्वाधिक कशी उपयुक्त आहे हे म्हटले होते.२१ जून २०२२ रोजी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता बदल घडविण्याच्या घडामोडी झाला नंतर विधानसभेच्या अधिवेशनात तशी अभिमानाने घोषणा केली होती.वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात होणार निश्चित असतांना अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेबर २०२२ रोजी वेदांत समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि ८ दिवसाच्या आत १३ सप्टेंबर २०२२ रोजी हा प्रकल्प गुजरातला मिळाला.त्यामुळेच महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायामुळे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय कार्यकर्ता,नेता आणि मराठी माणूस पेटून उटला पाहिजे होता.पण तो कुठे ही तो दिसत नाही.त्यामुळेच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज क्षणा क्षणाला आठवण येते. मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. शेवटी इतिहासात मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???. असा प्रश्न विचारला जाईल.

सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1