बुलेट ट्रेनचा हट्ट का ? मराठी माणसाचा फायदा ?


मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाहिलेले स्वप्न, ते सत्यात उतरवण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जिहुजुरी करत त्यासाठी तत्कालीन राज्यसरकार म्हणून मान्यता दिली. मात्र शिवसेनेने त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे केंद्र सरकार आणि फडणवीस तेव्हा बॅकफूटवर गेले. कालांतराने २०१९ च्या निवडणुका झाल्या शिवसेनेचे सरकार आले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि त्यांनी हा प्रकल्प थांबवला. पण परवा एका कार्यक्रमात मोदींनी पुन्हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा विषय बोलून दाखवला. 

*बुलेट ट्रेनचा हट्ट का ?* -  बुलेट ट्रेन हे जास्तीत जास्त अंतर कमीवेळेत पूर्ण करण्यासाठी असते. पण मुंबई अहमदाबाद खरंच इतकं लांब आहे का ? तर बिलकुल नाही. करायचीच असेल तर मुंबई-दिल्ली करा. पण मोदी-शहांना तसे करायचे नाही. कारण त्यांचा उद्देश वेगळा आहे. खरं तर मुंबईचे वैभव त्यांना अगोदरपासूनच डोळ्यात खुपत आहे. देशाच्या आर्थिक नाड्या मुंबईत, मोठं मोठे उद्योग मुंबईत, चित्रपटश्रुष्टी मुंबईत यामुळे त्यांना ती गोष्ट नेहमीच मनातून खटकते. पण समोर दाखवायचे नाही. पण मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी पडद्यामागून षडयंत्र करायची. यापूर्वी देखील फडणवीसांच्या काळात मुंबई महाराष्ट्रातून असंख्य उद्योग गुजरातला गेले.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कुठल्याही मराठी माणसाला नको आहे, कारण कोणीही अहमदाबादला जात नाही. पण गुजराती व्यापाऱ्यांना अशी सोय उपलब्ध करून द्यायची कि, सकाळी त्या ट्रेन ने मुंबईला येतील आणि संध्याकाळी घरी जातील. एक महामार्ग निर्माण करून द्यायचा आहे त्यांना मुंबई लुटण्यासाठी. त्यासाठी जपान कडून हजारो कोटींचे कर्ज घेणार आहेत. आणि त्या कर्जाची परतफेड महाराष्ट्राच्या माथी मारणार आहेत. म्हणजे फायदा गुजरातचा आणि पैसे भरणार महाराष्ट्र. मोदी आणि शहा हि माणसं मुळातच मनातून महाराष्ट्र द्वेष्टे आहेत.

देशासाठी ज्या ज्यावेळी बलिदान द्यायची वेळ येते, तेव्हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस उभा राहतो. यापूर्वी देखील मराठी माणूस लढला. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा सम्माननीय अपवाद वगळता कोणाही गुजरातच्याचे योगदान नाही. हिंदुस्तानच्या सैन्यात मराठा बटालियन आहे, पंजाब ची लोक आहेत सर्व आहेत. पण गुजरातची १% पण माणसं नाहीत. कारण यांना धंदा करायचा आणि सर्व देशावर राज्य करायचं आहे. *आज देशाचा पंतप्रधान गुजराती, गृहमंत्री गुजराती, देशातील सर्वात श्रीमंत माणसं मुकेश अंबानी आणि गौतम अदानी गुजराती. पण हिंदुस्तानच्या सैन्यात शून्य गुजराती. बेगडी हिंदुत्वाचे खोटे पांघरून ओढून मराठी माणसा सह इतरांना हे गंडवणार आणि आपली मूर्ख माणसं यांना डोक्यावर घेऊन नाचवणार*.!! मुंबई महापालिकेत भाजपचे ८२ नगरसेवक आहेत, त्यातले ३८ नगरसेवक गुजराती आहेत. म्हणजे जवळजवळ निम्मे. आपल्या महाराष्ट्रात हे गुजराती माणसं मतदारसंघ बनवून एकगठ्ठा मतदान करून भाजपला निवडून देतात आणि आपण आपल्या माणसांना विरोध करून असल्या लोकांना आपल्या राज्यात मोठे करतो.

मुंबईत मंगलप्रभात लोढा नावाचा गुजराती माणूस भाजपचा मुंबई अध्यक्ष होतो. हेच सुरु राहिले आणि चुकून मुंबईत भाजप आली, तर मुंबईचा महापौर म्हणजेच प्रथम नागरिक कोणी मेहता, शहा झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण मुंबई काबीज करा हे स्वप्न वर्षोनुवर्षे भाजप पाहतोय. *वाईट फक्त याचे वाटते कि,भाजपाचा हा कावा ज्यांना कळत नाही अशी काही मराठी माणसं भाजपची चाकरी करण्यातच  स्वतःला धन्य समजू लागली आहेत, आणि लबाड भाजपच्या कट-कारस्थानाला,आणि  भूलथापांना बळी पडतायत ही खरी शोकांतिका आहे.* ज्यांना स्वार्थीपलीकडे  काही  दिसत नाही, आणि ज्यांनी स्वतःचा स्वाभिमानच बेगडी हिंदुत्वासाठी गहाण ठेवलाय.. अशांचा विचार न केलेलाच बरा. परंतु काळाची गरज म्हणुन महाराष्ट्रातील प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या लबाडांचा कावा ओळखून, या कपटी लोकांच्या कटकारस्थाना विरोधात एकवटले पाहिजे हे मात्र नक्की !!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1