Top Post Ad

"समानता का संकल्प दिवस" मोठ्या हर्षोल्हासात साजरा


 पैगाम फुले-आंबेडकरी गौरवशाली व आदर्शवादी मुहीम या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी पैगाम व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दिल्ली, हरीयाणा, युपी, एमपी, गुजरात,पंजाब,तर महाराष्ट्रात ठाणे- मुंबई सह औरंगाबाद,नागपूर,पूणे येथे तसेच देशभरात "समानताका संकल्प दिनाचे" मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.त्याचप्रमाणे ठाणे येथिल कोळी समाज सभागृह.या ठीकाणी देखिल समानता का संकल्प दिवस मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील विचारवंत नेते,कार्यकर्ते, लेखक,कवी मान्यवरांची ऊपस्थिती लाभली होती.अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. चार तास चाललेल्या या समानता संकल्प कार्यक्रमात विविध ५० सामाजिक संस्था,संघटनांच्या पदाधिकारी यांनी आपली मतं मांडली.सदर कार्यक्रमात ५७ विविध सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्ते ऊपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रस्तावना मा.टी.के.बनसोडे यांनी केली. त्यांनी या दिवसाचे महत्व विषद केले.ते म्हणाले की,या दिवसाचे महत्व तीन प्रकारे सांगता येईल.एक म्हणजे, २३ सप्टेंबर १९१७ ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेली एक महत्वाची घटना की, ज्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन बदलले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी आपल्या संस्थाना मार्फत शिष्यवृत्ती देऊन बाबासाहेब डाॅ.भिमराव आंबेडकरांच्या परदेशी शिक्षणाचा खर्च ऊचलला होता व त्या बदल्यात ते संस्थानात दहा वर्षे सेवा देतील असे ठरले होते.

ठरल्या प्रमाणे बाबासाहेब डाॅ.भिमराव आंबेडकर आपले उच्च शिक्षण पुर्ण करून परदेशातून परत आले तेव्हा त्यांना बडोदा संस्थानातील महत्वाच्या म्हणजे सुरक्षा सचिव पदी नियुक्त करण्यात आले.नोकरी तर मिळाली परंतू राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती.त्यासाठी त्यांनी संस्थानात अर्ज देखिल केला होता.परंतू राहण्यासाठी जागा ऊपलब्ध झाली नसल्यामुळे जागेचा त्यांनी स्वत: शोध घेतला व एका पारशी धर्म शाळेत त्यांना जात लपवून राहावे लागले.परंतू पारशी लोकांना जेव्हा कळाले की,डाॅ.आंबेडकर अस्पृष्य समाजातील व्यक्ती आहेत.तेव्हा लगेच त्यांनी डाॅ.आंबेडरांना आत्ताच्या आत्ता जागा खाली करा व ईथून निघून जा.असे सांगून त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले.एका रात्रीसाठी राहुदे अशी विनंती डॉ.आंबेडकरांनी त्यांना केली पण उपयोग झाला नाही,मग नाईलाजाने त्या रात्रीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा सोडण्याचा निर्णय घेतला.

परंतु रात्रिच्या वेळी प्रवासाची कुठलीही साधने ऊपलब्ध नसल्यामुळे संस्थानातील सयाजी बागेमध्येच अतिषय दुखी अंतकरणाने त्यांनी रात्र जागून काढली.तेव्हा त्यांनी विचार केला की माझ्या सारख्या उच्च शिक्षीत व्यक्तीला इतक्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असेल तर माझ्या अडानी समाजाची व्यथा काय असेल, त्यांनी २२ सप्टेंबरच्या त्यारात्री संकल्प केला की, मानसांना हीन वागणूक देणारी विषमतावादी  अव्यवस्था मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा संकल्प घेऊन ते मुंबई ला परतले आणि त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.म्हणून हा दिवस विशेष महत्वाचा आहे, आजही आपणास विषमतेचे चटके बसतच  आहेत. ती कीड अजूनही नष्ट होत नाही,त्यामुळे आजही तोच विषमतावादी मानसिकता नष्ट करण्याचा संकल्प आपल्याला पुर्ण करायचा आहे.असा निर्धार करूया व  आजच्या दिवशी अशी प्रतिज्ञा करूया.असे त्यांनी सांगितले, 

दुसरे महत्व म्हणजे पैगाम या सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनाचे. हे संघटन नाॅनपाॅलिटीकल,नाॅन रिलिजीयस आहे, समता,स्वातंत्र्य,बंधूत्व व न्याय या मानवी मुल्यांची जोपासना करून ते समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी निरंतर प्रयासरत आहे.या संघटनेचा आज रोजी वर्धापन दिवस आहे, शिवाय या दिवशी रात्र आणि दिवस हे निसर्गता समसमान आहे, म्हणूनच या दिवशी सर्व समविचारी, सामाजिक चिंतक,वक्ते,लेखक,नेते व कार्यकर्ते यांना एकामंचावर एकत्र आणण्याचा व त्यांच्यामधे ताळमेळ व सुसंवाद व्हावा या हेतूने हा अनोखा प्रयास आपण करीत आहोत, असे सांगून मा.बनसोडे यांनी आपले प्रास्ताविक केले, त्यानंतर मान्यवरांनी याविषयी आपापल्या भूमिका मांडल्या, आपल्या संघटनेचे कार्य थोडक्यात सांगून ऊपरोक्त कार्यक्रमासाठी आयोजकांना धन्यवाद दिले.

मान्यवर राजहंस टपके,सुरेश केदारे,राजाभाऊ कदम, ॲड. नाना अहिरे,भास्कर केदारे,राजकुमार शिंदे,प्रल्हाद गवारे,राजेंद्र कांबळे,राजू पटेल,मोहन देवतळे,राजा रावळ,आरती चावला,अण्णा नाईक, विनायक कांबळे,भारत शेळके,वसंत हिरे,गुरूनाथ शेळके,भास्कर सोनवणे,सुभाष कांबळे, व्ही.जी.सकपाळ,अनिल तेलवडे,शंकर द्रविड,अॅड.कुणाल, ॲड.अंजनी वेरूकुला, कांबळे,धनाजी सुरोसे,मंगेश बोरकर,स्वर्णजित सिंग,भारत वानखेडे,स्वरूप सिंग, भास्कर त्रीभुवन, आदी,विविध सामाजिक संस्था,संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांची भाषणे झाली.

तसेच मान्यवर अनिल कदम,प्रा.आनंद दांडगे,दिलीप कांबळे,अॅड.यशवंत गायकवाड, कविता ठक्कर, रूपिंदर सिंग, हरमित सिंग, राजू कांबळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवर गौतम सांगळे,चंद्रकांत शिंगाडे,शंकर जमदाडे, छायाताई देहाडे,सुरेखा धेंडे,भूषण धेंडे,जयश्री पाटील,रमेश वाकेकर, शंकर नितनवरे,अनिल गायकवाड,बाळू गवई,विजय ईंगळे,गजानन खराटे,गनपत आहीरे,,माधूरी आहेर,अशोक पवार सागर तायडे,यांची विशेष ऊपस्थिती लाभली व सर्वांनी या अनोख्या कार्यक्रमाचे भरभरून कौतूक केले व समतेचा संकल्प पुर्ण करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले  आम्हीही तूमच्या सोबत आहोत असे सांगून कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्या बद्दल शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन,मयुर आबासाहेब चासकर,अॅड.मंदा सोनवणे व डाॅ.चंदन जोगे यांनी ऊत्कृष्टरीत्या केले,आबासाहेब चासकर यांनी ऊपस्थित सर्व मान्यवरांचे व पाहूण्यांचे आभार मानले, चंद्रकांत पगारे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजनाचे सूत्र अथक परिश्रमाने सांभाळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com