Top Post Ad

अमित शाह यांचा मुंबई दौरा सरकारी की खाजगी...?

 अमित शाहांनी मुंबई दौऱ्यादरम्यान  भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. अमित शाह म्हणाले,  मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. ...., असं आवाहनही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलं.

  • गणपति उत्सवानिमित्त देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर.
  •  अमित शाह यांचा लालबाग आणि वांद्रे गणपती दर्शन दौरा सरकारी का खाजगी? 
  • माहिती व जनसंपर्क विभागाकडून बातमी प्रसारीत 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लालबागच्या राजा मंडळाला भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्यावतीने शहा यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अमित शहा यांनी लालबागच्या राजा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.  अमित शहा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी  मुंबई दौऱ्याची सुरुवात लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.

त्यानंतर अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणपति उत्सवास भेट देऊन गणपतिचे सहकुटुंब दर्शन घेतले. दरवर्षी विविध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या या मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फुट उंच प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याचे अमित शाह यांनी कौतुक केले. वांद्रे भेटीनंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब ‘गणपति दर्शन’ घेतले. पुढे अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तेथे त्यांनी गणपति दर्शन घेतले. यावेळी शिंदे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला.

अमित शहा यांचा हा दौरा शासकीय होता की खाजगी याबाबत मात्र राज्य प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या या नियोजित खाजगी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होणार नव्हते. तसे मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही सकाळी सांगण्यात आले. मात्र अचानक अमित शाह यांच्या दौऱ्यात ते ही सहभागी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या दौऱ्याचा संपूर्ण वृत्तांत राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रसारीत करण्यात आला. त्यामुळे  केवळ राजकिय पक्ष बघून खाजगी दौऱ्याच्या बातम्या  माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात येतात की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येवू लागला आहे. शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे खाजगी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय नेते किंवा राज्यातील मंत्र्याच्या दौऱ्याचे कोणतेही वृत्त अर्थात बातमी शासकिय विभागाकडून जारी करायचे नाही असे संकेत आहेत. या शासकिय संकेताला धक्का लावत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून याबाबतची अधिकृत बातमीच सर्व माध्यमांना पाठविली. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभाग खाजगी दौऱ्याच्या बातम्या कधीपासून करायला लागला अशी विचारणा मंत्रालयातूनच व्यक्त करण्यात येत आहे. शासकिय संकेतानुसार खाजगी दौऱ्यावर असलेल्या कोणत्याही मंत्र्याची बातमी माहिती व जनसंपर्क विभागाने द्यायची नाही असा दंडक अर्थात संकेत आहे. त्यानुसार आतापर्यंत हे संकेतही माहिती व जनसंपर्क विभागाने पाळला आहे. मात्र राज्यात भाजपाच्या पाठिब्यांवर एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्वात आहे.  त्यामुळे अमित शाह यांच्यासाठी हा संकेत मोडण्यात आला का असा सवाल आता उपस्थित झाला असून याबाबत चर्चाही मंत्रालयात सुरु आहे




 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्यावतीने केंद्रीय मंत्री श्री. शहा यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला. अशा प्रकारचे वृत्त राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिध्द केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com