Top Post Ad

... आणि गांधीचे प्राण वाचले


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, आपले हक्क मागुन मिळत नसतात तर ते संघर्ष करुन घ्यावे लागतात, त्याप्रमाणे त्यांनी इंग्रजांशी भिक मागुन नाही तर संघर्ष करुन सर्वसामान्यांच्या हीताच्या मागण्या मंजूर करुन घेतल्या.
 मात्र पुणे कराराच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने त्या हिसकावून घेतल्या.

डॉ. बाबासाहेबांनी इंग्रजाशी झगडून मागण्या मंजूर करुन घेतल्या पण  मो. क. गांधीनी या मागण्यांना तिलांजली दिली. या विरोधात आपले नेहमीचे उपोषणाचे हत्यार उपसले. १९३२ साली झालेल्या पुणे कराराला २४ सप्टेंबर रोजी ९० वर्षे पुर्ण होतील. मो. क. गांधींच्या प्राणांतीक आमरण  उपोषणांमुळे पुणे करार घडला. गांधी स्वत:ला हरिजणाचे पुढारी समजत होते मात्र हरिजणांच्याच विरोधात त्यांनी पुण्यात आमरण उपोषण सुरु केले. दलिताच्या हितासाठी काहीही केले नाही पण  इंग्रजांशी झगडून  दलितांच्या हिताच्या मंजूर झालेल्या मागण्यांना मात्र विरोध केला. या दृष्टीने पाहता इंग्रजांशी लढा देणारे डॉ. बाबासाहेब होते. इथल्या जातीयवादी लोकांनी बाबासाहेबांना इंग्रजांचे हस्तक म्हणून सर्वसामान्यांमध्ये प्रचार केला. मात्र सत्य हे उशीरा का होईना बाहेर येतंच. आज इंंग्रजांचे आणि  मोगलांचे हस्तक कोण होते हे  सर्वसामान्यांना सोशलमाध्यमाद्वारे कळू लागले आहे. दलित, शोषित पिढीत अंध, अपंगाचे दुःख, यातना, बाबासाहेबांना कळत होत्या. जे लोक कांदा-भाकर खाऊन दिवस काढतात त्या लोकांना आपले दुःख, होणाऱया यातनाची जाणीव असते. मो. क. गांधी श्रीमंत घरण्यात जन्मले त्यामुळे त्यांना दलित आदिवासी, गुंगे, बहिरे, अंध, अपंगाचे दुःख कधीही कळले नाही. 

पहिली गोलमेज परिषद 1930 मध्ये इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. या परिषदेमध्ये सर्व भारतीय पुढाऱयांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बाबासाहेबांना देखिल आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत मो. क. गांधी गेले नाही  कारण गांधीना वाटले की, मी या  परिषेदेत जाऊन करणार काय? आणि जर या परिषदेत गेलो तर दलितांच्या मागण्यांना मी विरोध करु शकणार नाही. पहिल्या गोलमेज परिषदेच्या बातम्या विविध वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. 
1) कार्यक्षम प्रतिनिधीत्व, 2) स्वतंत्र मतदार संघ, 3) दुहेरी मतदान , 4) प्रौढ मताधिकार 
अशा प्रकारच्या मागण्या बाबासाहेबांनी इंग्लंड येथे भरलेल्या गोलमेज परिषदेत मंजूर करुन घेतल्या. 

दुसरी गोलमेज परिषद ही 1932 ला इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. पहिल्या परिषदेतील ज्या चार मांगण्या मंजूर करण्यात आल्या होत्या त्यावर अंतीम निर्णय घेण्यासाठीच या दुसऱया गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये काँग्रेसच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले. परंतु गांधींना आमंत्रण नव्हते तरीसुध्दा ते गेले कारण मो. क. गांधीला वाटले की, जर मी या परिषदेला गेलो नाही आणि मंजूर झालेल्या मागण्यांना विरोध केला नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व मांगण्या मंजूर होतील आणि हिंदू धर्माची पारंपारिकतेची चौकट मोडेल. सनातन ब्राम्हणाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करीत आहोत हे परिवर्तन सर्वांच्या स्वातंत्र्यामध्ये परिवर्तीत झाले तर धोकादायक होईल. याचा अंदाज आला होता. इतकेच नव्हे तर रााष्ट्रीय काँग्रेस पक्ष अवघ्या भारतवर्षाचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा डॉ. आंबेडकरांचा पक्ष जर दलितांची तरफदारी करण्यासाठी पुढे येत असेल तर ही घटना देखील गांधीजींना न रुचणारी होती. त्यांनी 1928 ला छुपा विरोध केला. त्यानंतर 1932 ला खुला विरोध केला. 

दलित आदिवासी शोषित पिढीत समाजाला विधीमंडळात आरक्षण नको. या संदर्भात गांधी म्हणतात मी मुस्लिम अॅग्लो इंडियन, ख्रिश्चन, शिख यांना आरक्षण देण्याच्या  विरोधान नाही परंतु अस्पृश्यांना आरक्षण देण्यास माझा स्पष्ट विरोध आहे. गांधीजीची हरिजन विरोधी भुमिका असल्यामुळेच त्यांनी गरिब आदिवासी दलित समाजाला मिळालेल्या मांगण्यांना विरोध केला. तेल्या तांबोल्यांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे अशी जी भूमिका बाळ गंगाधर टिळकांची होती, त्याच प्रकारची भूमिका गांधीजींचीही होती. हे यावरून स्पष्ट झाले.

दि. 17/08/1932 रोजी जातीय निवाडा जाहीर करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे हे सत्य गांधी पचवू शकले नाही. म्हणून भारतात येऊन त्यांनी या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा विचार केला. दि. 20/09/1932 रोजी मो.क.गांधीजींनी येरवडा कारागृहामध्ये उपोषनास सुरुवात केली. चार दिवस उपोषण केले 24/09/1932 ला आंबेडकर / गांधी करार घडवून आणण्यात आला. याला आपण `पुणे करार' (पुना अॅक्ट) असे म्हणतो. 

गांधीच्या उपोषणापुर्वी बाबासाहेबांची भुमिका काय होती, हे आधी आपण जाणून घेतले पाहिजे. बाबासाहेब, गांधीजीच्या उपोषणाने मुळीच डगमगले नाही, ते म्हणाले गांधी मेले तरी चालतील असे किती महात्मे आले आणि गेले परंतू अस्पृश्य आहे तेथेच आहे. मला लाईटच्या खांबाला बांधून मारले तरी चालेल पण मी माझ्या समाजासाठी मिळवलेले अधिकार सोडणार नाही. परंतू `बाबासाहेबांनी या उपोषणाचा समाजावर होणारा दुरगामी परिणामाचा विचार केला आणि नाईलाजाने डॉ. बाबासाहेबांना पुणे करारावर सही करावी लागली. या देशात बाबासाहेब आंबेडकर सर्वात जास्त शिकलेले पुढारी होते. मो.क. गांधी कमी शिकलेले असल्यामुळे त्यांना ज्ञानही कमी होते. बाबासाहेब आंबेडकर बुध्दीमान असल्यामुळे उपोषणाचा होणारा दुरगामी परिणाम त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी सही केली. 

जर पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली नसती तर मो. क. गांधी कधीच मेले असते. जो जन्माला येतो त्याला मृत्यू हा अटळ असतो परंतू येथे गांधीजींना निसर्गाच्या नियमानुसार मृत्यू आला नसता पण उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला असता. पुणे करारावर बाबासाहेबांनी सहीच केली नसती तर त्यांचा मृत्यू अटळ होता. जर असे झाले असते तर गांधी समर्थकांनी दलित, आदिवासी, शोषित पिढीत समाजावर अत्याचार केले असते. स्पृश्यांनी अस्पृश्यांची कदाचित कत्तलीही केल्या असत्या, त्यांच्या घराच्या जाळपोळी केल्या असत्या, खुले आम दलितांच्या कत्तली झाल्या असत्या. त्यांना देशद्रोही म्हणून ठरविले असते. भारत भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटल जर माझा समाजच जिवंत राहीला नाही तर हे इंग्रजांशी झगडून आणलेले अधिकार कोणाला देऊ, आणि म्हणून बाबासाहेबांना मजबूर होऊन पुणे करारावर स्वाक्षरी केली. 

पुणे करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की, मी माझ्या समाजासाठी लंडनवरुन एक फळ आणले होते. मो.क.गांधी आणि  काँग्रेसने ते फळ हिसकावून घेतले आणि त्यातला रस त्यांच्या जातीयवादी समाजाला दिला आणि छिलके माझ्या तोंडावर फेकून मारले. 
शेवटी पुणे करारामुळे दोन मागण्या संपुष्टात आल्या. 
1) स्वतंत्र मतदार संघ,   2) दुहेरी मतदान    या दोन मागण्या मो. क. गांधीजीने संपवून टाकल्या. त्याऐवजी गांधीने बाबासाहेबांना संयुक्त मतदार संघ योग्य असल्याचे सांगितले. या पुणे करारामध्ये `संयुक्त मतदार संघ' पध्दतीमध्ये दुहेरी निवडणुकीची मागणी मंजूर करण्यात बाबासाहेब यशस्वी झाले आणि बाबासाहेबाच्या सहीने गांधीचे प्राण वाचले. एका सहीने त्यांना जिवदान दिले. त्यावेळी काँग्रेसच्या बऱयाच पुढाऱयांनी बाबासाहेबांना हात जोडून विनंती करीत होते की, बाबासाहेबच गांधीच प्राण वाचवू शकतात आणि पुणे करारावर स्वाक्षरी करुण शेवटी गांधीजीचे प्राण वाचविले, अशा पध्दतीने `पुणे करार' घडला 

मो.क. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या या पुणे करारावर पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com