Top Post Ad

म्हणून बंडाचे नाटक करणे शिवसेना व भाजपसाठी गरजेचे होते

 सेना-भाजपचा अजेंडा एकच असताना शिंदे यांच्या माध्यमातून फुटीचे नाट्य कशासाठी हा प्रश्न कुणा समोर उभा कसा राहत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. ते एक मोठे रहस्य आहे. परंतु भाजप-सेनेचे सत्ता संघर्षाचे कारण जर उमजले तर त्यामागील रहस्याचा उलगडा होऊ शकतो. आपण जो सेना-भाजपचा सत्तासंघर्ष बघतो तो सत्ता संघर्ष नसून तो उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था किंवा जिला आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणतो ती टिकवण्यासाठीचा तो एक बनाव आहे. अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मोठी राजकीय ताकद असताना ते कधीही मंत्री झाले नाहीत. कारण दुसऱ्यांच्या माध्यमातून सत्ता उपभोगण्यात जो आनंद आहे तो आनंद सत्तेत राहून उपभोगता येत नाही हे त्यांना माहित होते. कारण जे लोक सत्तेत असतात त्यांनाच कुठल्याही गोष्टीसाठी लोक जबाबदार धरतात. परंतु पडद्याआड जे सत्तेची सूत्रे हलवणारे असतात ते लोकांना दिसत नाहीत. म्हणून ते लोकांना जबाबदार नसतात. परंतु खरे पाहता पक्षप्रमुख म्हणून कुठल्याही गोष्टींसाठी लोकांनी त्यांनाच जबाबदार धरले पाहिजेत.

आज भाजप व शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन्ही पक्षांचा अजेंडा एकच असताना त्यांच्यात सत्ता संघर्षाचे कारणच असू शकत नाही. तो केवळ बहुजनांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीचा तो एक बनाव असून त्यासाठी अधूनमधून असे नाट्य करण्याची नितांत गरज असते. अन्यथा बहुजन वर्गाच्या जर लक्षात आले की सेना भाजप हे वेगळे नसून एकच आहेत, तर दोन्ही पक्षाचे अस्तित्व समाप्त होईल हे लक्षात घेतले पाहिजे. दोन्ही पक्षाचा अजेंडा या देशातील उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्था, जी आज खिळखिळी झालेली आहे ती टिकवणे हा आहे.  त्यांच्याकडे मानव कल्याणाचा कुठलाही विचार नसल्यामुळे ते त्याची कमतरता हिंदुत्वाच्या नावाने भरून काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु जो शब्दच बहुजन वर्गाला केवळ भ्रमित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे, त्या शब्दाचा उपयोग जास्त काळ करता येणार नाही हे त्यांना चांगलेच माहित आहे. 

त्यामुळे ते कधी बाबरी मज्जिदवर हल्ला तर कधी मुस्लिमांच्या नावाने देशभर बॉम्बस्फोट घडवून बहुजन वर्गात मुस्लिमांच्या विरोधात तिरस्काराची व द्वेषाची भावना निर्माण करून त्यांना आपल्या मागे झुलवत ठेवतात. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मस्जिद वर हल्ला करण्यात आला तेव्हा देशात काँग्रेसचे राज्य होते. जानेवारी १९९३ मध्ये जेव्हा देशात बॉम्बस्फोट घडवून आणले गेले तेव्हा महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री होते. मुंबईत त्यावेळी ११ बॉम्बस्फोट झाले असताना पवार यांनी १२ बॉम्बस्फोट झाले असे खोटे सांगितल्याची त्यांनी स्वतः कबुली दिली होती. 

सन २००८ मध्ये राज्याचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांच्या हत्येपूर्वी काँग्रेस सरकारला लेखी अहवाल सादर केला होता की देशात झालेले सर्व बॉम्बस्फोट आरएसएसने केलेले असून आरएसएसवर बंदी घालण्यात यावी अशी त्यात शिफारस सुद्धा केलेली होती. परंतु काँग्रेसने त्याकडे कानाडोळा करून जसे काका कालेलकर अहवाल व मंडल कमिशनचा अहवाल दडपून टाकले होते तसा तो अहवाल ही दडपून टाकला आणि शिवसेनेने सुद्धा त्याबाबत एक ब्र शब्द सुद्धा काढला तर नाहीच, उलट राज्याचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी साध्वी प्रज्ञा सिंग हिला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केले म्हणून दैनिक सामनामध्ये त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती.


ज्यांच्याकडे मानव कल्याणाचा कुठला विचार नाही अशा लोकांना खोट्या राजकारणाचा आधार घेऊनच राजकारणात अशा खेळी कराव्याच लागतात. काँग्रेस सत्तेत असताना जेव्हा लोकपाल बिल पास करून घ्यायचे होते, कारण ते लोकसभेत सरळ सरळं पास होऊच शकले नसते, म्हणून काँग्रेसने अण्णा हजारेना अचानक गल्लीतून दिल्लीत आणून आपल्या विरोधात आंदोलनाचे नाटक करीत लोकपाल बिल पास करून घेतले व त्यानिमित्ताने दिल्ली राज्यात सुद्धा केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून बसविण्यात आले. कारण खोट्या राजकारणात सत्ता दीर्घकाळ एकाच पक्षाकडे ठेवूनहि चालत नाही. त्यावेळी काँग्रेसच्या शीला दीक्षित दोन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर होत्या. आता तीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झाली होती. कारण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावून अडीच वर्ष तथाकथित करोना महामारीचा भाजपचा अजेंडा तंतोतंत पाळला. राज्यात अनेक वेळा लॉक डाऊन करून, लोकांचे उद्योगधंदे उद्धवस्त केले, लोकांच्या छोट्या छोट्या धंद्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे लोकांवर उपासमारीची पाळी आली. लोकांमध्ये सरकार विरोधी एक आक्रोश निर्माण झाला होता, लोकांच्या मनात राग होता. परंतु  तो प्रदर्शित करता येऊ शकत नव्हता. अर्थात सरकार विरोधी एक वातावरण निर्माण झाले होते. त्यामधून सावरण्यासाठी हे बंडाचे नाट्य शिवसेनेसहित सर्व पक्ष मिळून निर्माण करण्यात आले. 
अन्यथा शिवसेनेच्या नावाचे कपाळावर मोठे कुंकू लावून नेतेगिरी करणारे शिवसेनेच्या विरोधात काय बंड करू शकतात ? आणि बाहेर जाऊन तरी ते कुठे जाणार आहेत, एक तर मनसे किंवा भाजप किंवा आणखी त्यासारखे इतर पक्ष किंवा पुढे चालून परत शिवसेनेत यायला त्यांना किती वेळ लागणार आहे ?

सण २०१९ मध्ये भाजप व शिवसेना यांनी एकत्र येऊन राज्यातील विधानसभा निवडणुका लढल्या.. त्यात भाजपला १०५ शिवसेनेला ५५ राष्ट्रवादीला ५२ व काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. पक्ष निहाय जागांची अशी स्थिती असताना, भाजपला ज्या राज्यात एकही जागा मिळालेली नसताना भाजप त्या राज्यात आपले सरकार स्थापन करू शकतो, तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळवून तो पक्ष सरकार बनवू शकणार नाही यावर शेंबडे पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाही. शिवाय भाजप व शिवसेनेत निवडणुकीनंतर असा काय वाद निर्माण झाला की ते परस्परांपासून दूर गेले? त्यांचे एकमेकांपासून दूर जाण्याचे कारण पुढे करण्यात येते ते म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा वाद. एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, जे लोक इतरांच्या मार्फत सत्ता राबविण्यात तरबेज आहेत, ते सत्तेसाठी एकमेकांपासून दूर जातील यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अन्यथा, ज्यांनी इतर अनेकांना मुख्यमंत्रीपदावर बसवून आपण सत्तेपासून  वेगळे राहात महाराष्ट्राच्या सत्तेवर अंकुश ठेवला, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते काय? भाजप शिवसेना किंवा काँग्रेसचे पक्षप्रमुख यांना सत्तेचे काही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त देशात असलेली उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था, ज्यामध्ये ब्राम्हणांचे वर्चस्व आहे, ती टिकवून ठेवायची आहे. 

काँग्रेसने सुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रावर बहुजनांच्या माध्यमातूनच दीर्घकाळ राज्य केले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सत्तेत, महात्मा फुले यांच्या भाषेत, शेटजी भटजींना अजिबात स्थान नव्हते. ही किमया केवळ फुले-आंबेडकरांच्या विचारांमुळेच होऊ शकली. म्हणूनच महाराष्ट्राला फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखण्यात येते. आपण इतिहासात जर बघितले तर शेटजी भटजींची देशावर राज्य करण्याची हीच योजना असल्याचे लक्षात येते. कारण आपल्या देशावर मोगल, पठाण, पोर्तुगीज इत्यादींनी शेकडो वर्ष राज्य केले. परंतु खरी सत्ता येथील शेटजी भटजींच्याच हाती होती. परंतु जेव्हा इंग्रजांनी खऱ्या अर्थाने सत्ता आपल्या हातात घेऊन राज्य करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून बहुजनांची प्रगती होऊ लागली व उच्चनीचतेच्या सामाजिक व्यवस्थेला जेव्हा धोका निर्माण झाला, त्यावेळी इंग्रजांची कल्याणकारी सत्ता हाणून पाडण्यासाठी याच शेठजी भटजींनी तथाकथित स्वातंत्र्य लढा उभा केला आणि बहुजनांना चुकीचे मार्गदर्शन करीत त्यांना पण आपल्यासोबत फरपटत नेले. परंतु बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर व इतर काही समजदार लोक त्यांच्या तथाकथित स्वातंत्र्य लढ्यपासून अलिप्तच राहिले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची भाजपची खेळी!
दोन दशके भाजप व शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात ठेवून फुले-आंबेडकरी विचाराला चांगलाच सुरुंग लावला. परंतु बहुजनांना एकदम सत्तेच्या बाहेर ठेवून आपण आपला अजेंडा योग्यप्रकारे राबवू शकणार नाही आणि तसेच सर्व बहुजन एकत्र येऊन फुले आंबेडकरी विचार मजबूत करतील अशी त्यांना भीती वाटली. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा सत्तेमध्ये सामील करावे लागले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले व ठाकरे पवार यांच्या इशाऱ्यावर वागतात अशी चर्चा करण्यात येते. परंतु अशा चर्चेत काहीएक तथ्य नाही, त्याउलट शरद पवार हे ब्राह्मण धार्जिणे असून त्यांच्याच सांगण्याप्रमाणे ते राज्य करतात हे त्यांच्या आजवरच्या सत्तेच्या राजकारणावरून उघड झालेले आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी त्यांचा विश्वासघात करून पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करून शेटजी भटजींच्या सल्ल्याने सत्ता काबीज केली हा इतिहास आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्रासहित देशपातळीवर संघटित होत असलेल्या बहुजनांच्या कार्यात अडथळा निर्माण करणे हे होय. कारण भाजप-शिवसेना किंवा काँग्रेस कडे कुठलाही मानव कल्याणाचा विचार नसल्यामुळे बहुजनांना आपल्या सोबत ठेवणे अवघड झाले आहे. काँग्रेसने देशावर जे दीर्घकाळ राज्य केले ते केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या एकाच मुद्द्यावर. परंतु तो लढा केवळ उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांच्या हातून सत्ता काढून घ्यावयाची होती. लोकांच्या स्वातंत्र्याचा त्यात कुठेही मागमूस नव्हता. देशपातळीवर बहुजनांच्या संघटिकरणाच्या माध्यमातून उच्चनीचतेच्या सामाजिक व्यवस्थेवर जे संकट निर्माण झाले होते ते दूर करण्यासाठी देशाच्या जनतेवर तथाकथित महामारी चे संकट लादण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर होती. 

कारण की बहुजन जनतेच्या लक्षात जर ही गोष्ट आली तर मग आपली खैर नाही हे सर्व सत्ताधीश जाणून होते. त्यामुळे केवळ भाजपा-सेना सत्तेत राहून चालणार नाही, तर बहुजनांच्या नावावर दोन्ही काँग्रेसला सोबत ठेवावे लागेल तरच ती योजना राबवता येईल, म्हणून भाजपने आपल्याला सत्तेपासून दूर ठेवत २०२० पासूनच २०२४ च्या निवडणुकांचा जप सुरू केला, जेणेकरून सामाजिक परिवर्तनाचे कार्य करणाऱ्या बहुजन जनतेचे लक्ष विचलित व्हावे व त्यांनी सत्तेच्या राजकारणाकडे आकर्षित व्हावे. तथाकथीत कोरोना महामारी चालू असताना वेगवेगळ्या राज्यात वेळोवेळी निवडणुका घेण्यात आल्या. सदरील निवडणुकीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने लोक एकत्र येत असत. त्यांना मात्र कोरोना बाधित करीत नव्हता. इतर ठिकाणी मात्र कोरोनाची एवढी भीती निर्माण करण्यात आली की, कोरोनाच्या भीतीनेच अनेक लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे आजारापेक्षा त्याचा गवगवाच जास्त करण्यात आला. 

दुसरीकडे दिल्ली बॉर्डरवर लाखो लोक एकत्र येतात खातात झोपतात त्यांना मात्र कोरोना होत नाही. परंतु पलीकडे दिल्लीत मात्र कोरोना ने हाहाकार माजवला. त्यामुळे कोरोना महामारीचा फोलपणा बहुजन जनतेच्या लक्षात आला. अजूनही जनतेतील कोरोनाची भीती मात्र गेलेली नाही परंतु सत्ताधारी पुन्हा कोरोनाची उबळ आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोंडाला पंट्टी आणि सामाजिक आंतर हा फॉर्म्युला वापरून लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालून बहुजन संघटिकरण्यास अडथळा निर्माण करण्यात आला. परंतु आपण मात्र धर्म व राजकारणाच्या माध्यमातून सतत लोकांच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न चालू आहे.

भाजप सेना किंवा कॉंग्रेसचे प्रमुख बाहेर जरी वेगवेगळे एकमेकांच्या विरोधात बोलत असले, तरी त्यांचा एकच विचार असून आतून ते एकच आहेत. बहुजनांना विघटित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे मुखवटे धारण केले आहेत. त्यामुळे आमचे काही बहुजन भाजपच्या तर काही कॉंग्रेस तर काही शिवसेनेच्या मागे असल्यामुळे ते भाऊ भाऊ असून 'सुद्धा परस्परांचा द्वेष करतात व आपल्या विरोधकांना मात्र जवळ करत त्यांना आपले मानतात. त्याउलट सत्ताधारी आतून एकच असल्यामुळे आणि त्यांचा एकच अजेंडा असल्यामुळे सत्ता आपल्या कोणत्याही पक्षाकडे गेली तरी त्याचा त्यांना काही एक खेद किंवा दुःख होत नाही. परंतु बहुजन जनतेला मूर्ख बनविण्यासाठी त्यांना ही सर्व सत्तेची नाटकं करावी लागतात. असे नाटक करणेच त्यांचा चळवळीचा एक भाग होय. त्यांनी अशी नाटकं जर केली नाहीत, तर त्यांचा असलेला साटेलोटेपणा, त्यांची आतून असलेली एकजूट व एक विचार बहुजन जनतेच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. त्यांची अशा प्रकारची नाटकं बहुजनांच्या कल्पने बाहेरची असतात. कारण नाटकं करण्यापूर्वी त्या नाटकाची कहाणी तयार. केलेली असते आणि त्याप्रमाणे मग ते नाटक पुढे पुढे जात असते. त्याचा शेवट काय होईल हे मात्र त्यांना चांगलेच माहीत असते. त्यामुळे बहुजन जनतेला ती नाटकं खरीच वाटतात.

शिवसेनेने जर असे नाटक केले नसते तर महाराष्ट्रात शिवसेनेचा भाजप व्हायला वेळ लागला नसता. कारण बहुजन जनता भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे चांगलेच ओळखून आहे आणि शिवसेनेने भाजपच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात तथाकथित कोरोना महामारीचा बहुजन जनतेवर वरवंटा चालवून त्यांचे हाल हाल केले, त्यांच्यावर . उपासमारीची पाळी आणली, त्यांच्या नोकऱ्या घालवल्या ह्या गोष्टी बहुजन जनतेच्या लक्षात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सरकारने जनतेला हैराण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप जाणीवपूर्वक सहा महिने चिघळत ठेवला ही गोष्ट सुद्धा त्यांच्या लक्षात आली आहे. म्हणून बहुजन जनतेच्या कोपातून वाचण्यासाठी शिवसेनेला ही खेळी करणे गरजेचे होते. अन्यथा शिवसेनेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असता आणि त्याचा परिणाम भाजपवर सुद्धा झाला असता. कारण एक वेळ उत्तर प्रदेशात जेव्हा काँग्रेस समाप्त झाली, त्यासोबतच भाजप सुद्धा समाप्त झाला होता व तिसरेच बहुजनांचे पक्ष त्याठिकाणी उदयास आले होते ही गोष्ट आपणास विसरून चालणार नाही. तेव्हा महाराष्ट्रात तशी वेळ शिवसेना व भाजपवर यायला वेळ लागला नसता व बहुजनांचा तिसराच पक्ष सत्तेवर आला असता. म्हणून बंडाचे हे नाटक करणे शिवसेना व भाजपसाठी गरजेचे होते.

मानवी मु्ल्यांचा पैगाम - 
संपादक : बी.एन.वाघ
९८२०५०३९४३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com