Top Post Ad

"मैं उनके सामने कीस झाड की मुली हु…"

 "वो लोग बहुत खतरनाक है, जो लोग ठाणा मे बैठके नरेंद्र मोदी को उडाने का प्लान कर सकते है, उनके सामने मैं कीस झाड की मुली हु" या शब्दात आत्महत्या करण्याच्या काही दिवसा पूर्वी बिल्डर सुरज परमार यांनी आपल्या परिवाराचे जुने स्नेही आणि ज्योतिषी वल्लभ रामजी मजेठिया यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली होती. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात ही बाब संबंधीत मजेठिया यांनी उघड केली असून याच जबाबात परमार यांना ठाण्यातील राजकीय नेते त्रास देत होते असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी मजेठिया यांचा जबाब कोर्टासमोर सादर केला आहे.

                   ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि कॉसमोस ग्रुपचे अध्यक्ष सुरज परमार यांनी ७ ऑक्टोबर २०१५ रोजी पिस्तुलातून गोळी झाडून घेवून आत्महत्या केली होती. परमार यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसापूर्वी २६ सप्टेंबर २०१५ रोजी आपल्या परिवाराचे जुने स्नेही आणि ज्योतिषी वल्लभ रामजी माजेठीया यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान परमार यांनी आपल्या मनातील व्यथा माजेठीया यांच्या समोर व्यक्त केली होती. परमार यांनी माजेठीया यांना आपणास ठाण्यातील काही लोकप्रतिनिधी पैशासाठी छळत असल्याचा उल्लेख केला होता. " सब लोग मुझे बिल्डर लाइन मे मुझे खत्म करने मे लगे है" या शब्दात परमार यांनी आपल्या मनातील अस्वस्थता माजेठीया यांच्यासमोर मांडली होती. " वो राक्षस लोग है, वो खतरनाक लोग है, जो लोग ठाणा मे बैठके नरेंद्र मोदी को उडाने का प्लान कर सकते है, उनके सामने मैं कीस झाड की मुली हु" असे परमार यांनी सांगून शिवसेनेचे नगरसेवक नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड हे आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख केला होता. 

पोलिसांनी घेतलेल्या जबाबात वल्लभ माजेठीया यांनी वरील सर्व घटनाक्रम लेखी स्वरूपात नोंदविला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, परमार फॅमिली पूर्वी टेम्भी नाका येथे राहवयास होती. मी सूरज परमार यांचे आजोबा रूपचंद सेठ यांचे सोबत लहानपनी त्यांचे कामानिमित्त नेहमी फिरायला जायचो. तेव्हा पासून मी परमार फॅमिलीला चांगल्या प्रकारे ओलखतो. रूपचंद सेठ यांना मांगीलाल आणि रमेश अशी दोन मुले होती. ती माझी समन्वयक असल्यामुळे माझे चांगले मित्र होते. मांगीलाल यांना उदय, हेमन्त, रजनी तीन मुले आहेत. तसेच रमेश परमार यांना सूरज परमार आणि नयना असे दोन मुले आहेत. 

दरम्यान मी देवीची पूजा करत असल्याने सूरज तसेच इतर सर्व मुले मला खुप मानतात. सर्वांना मी अंगाखांद्यावर खेळवले असल्यामुळे ते सर्व मला प्रेमाने अंकल म्हणतात. सूरज हां दर शनिवारी टेम्भी नाका येथील हनुमान मन्दिरात दर्शनासाठी यायचा. त्यावेळी तो नेहमी माझे बैठकीच्या ठिकाणी भेटत असे. माझे भेटिनंतर तो टेम्भी नाक्यावरील जैन मंदिरात जात असे. सूरज हा कॉसमॉस ग्रुप या नावाने बांधकाम करीत होता. सूरज मला भेटिवेळी त्याच्या सर्व सुख दुखाच्या गोष्टी मला सांगत असे. तसेच काही अडचणी आल्यास त्याबाबत माझ्याशी सल्ला मसलत करीत असे.

         पिछले एक डेढ़ साल से सूरज मेरे पास आने के बाद कभी कभी मुझे बताता था की, नगरपालिकाके नगरसेवक नजीब मुल्ला, सुधा चव्हाण, विक्रांत चव्हाण, हनुमंत जगदाले ये मुझे पैसे मांगते है. और पैसा नहीं दिया तो तुम्हारे प्रोजेक्ट के खिलाफ स्थायी समिती और जनरल बॉडी मीटिंग में आवाज उठाएंगे, और मैंने उन लोगो को पैसा देने के बाद भी उनकी मांग बढ़ती ही जा रही है. उनका डिमांड मैं पूरा नहीं कर सका इसलिए वो चारो तरफ लोग ठाना मे 300 से 350 बिल्डर होने के बावजूद भी केवल मेरे कॉसमॉस ग्रुप को ही टारगेट कर रहे है. और महानगरपालिका अधिकारिओ पर प्रेशर लाते है. अब मैं इन लोगो से तंग हो चुका हूँ. 

           त्यानंतर दिनांक 26/9/2015 रोजी सूरज हा हनुमानाचे दर्शन घेवून मला नेहमीप्रमाणे भेटन्यासाठी आला होता. सूरजचे चेहर्याकडे मी पाहिले तेव्हा तो कमालीचा अस्वस्थ व नाराज दिसला. म्हणून मी त्यास विचारले की, 'आज मूड नही है क्या?' असे  म्हणताच तो माझ्या पायावर हाथ ठेवून रडू लागला. मी त्यास काय झाले म्हणून विचारले तेव्हा तो मला रडत रडतच म्हणाला की, 'सब मुझे बिल्डर लाइन में खत्म करने में लगे है'. मी त्यास आधार देत विचारले की, क्यों डरता है, कोण तकलीफ दे रहा है?  सूरज म्हणाला की, 'सब कुत्ते लोग है काटने को दौड़ रहे है.' मी त्यास पुन्हा विचारले की कोण तकलीफ दे रहा है नाम तो बता? तेव्हा तो म्हणाला की, वही जो मैं आपको पहिलेसे बताते आ रहा हु, असे म्हणून "वो राक्षस लोग है , अंकल वो बहुत खतरनाक लोग है, जो लोग ठाना मे बैठके नरेंद्र मोदी को उड़ाने का प्लॅन कर सकते है, उनके सामने मैं किस झाड़ की मूली हु." 

तसेच तो म्हणाला की "वो घाऱ्या" मी त्यास 'घाऱ्या याने की जितेंद्र आव्हाड क्या?' असे विचारले तेव्हा त्याने होकार्थी मान हलवली. त्यानंतर " वो नरेश मस्के तकलीफ दे रहा है" तेव्हा मी त्यास म्हटले की, नरेश म्हस्के की कम्लेंट ऊपरके लोगो को करना तेव्हा सूरज बोलला की, "जाने दो अंकल इनमे विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाले, सुधाकर चव्हाण , नजीब मुल्ला भी शामिल है. सुधा चव्हाण तो मेरा खून पी गया है. इन लोगो को मैंने बंगला भी दिया था. उन्होंने चेक दिया था उसी चेक का कॅश भी वापस ले लिया है. जाने दो ये सब आप मुझे ये बताओ की मै इस तकलीफ से कब छूटूंगा" असे सूरज परमार यांनी सांगितले होते असा जबाब मजेठिया यांनी पोलिसांसमोर दिला आहे. वल्लभ मजेठिया यांचा हा संपूर्ण जबाब पोलिसांनी लेखी स्वरुपात घेतला असून हा जबाब कोर्टात सादर केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com