भिडेवाडा तात्यासाहेब भिडे यांनी ज्योतिराव फुले यांना शाळेकरिता दिला होता. १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. सावित्री माईंनी समाजाच्या त्रासाला झुगारून आपले शिक्षण कार्य सुरु ठेवले . संनातनी लोकांनी त्यांना दगड फेकून मारली,अंगावर शेण फेकले पण त्यांनी शिक्षणकार्य चालूच ठेवले . पण आज या सर्व गोष्टीचा साक्षीदार असलेला भिडेवाडा शेवटच्या घटका मोजत आहे . हा वाडा मोडकळीस आला आहे . जेथे स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला ,ज्या वाड्यात स्त्रिया शिकल्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या त्या वाड्याचे केव्हाच राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे होते . या वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे व येथे पुन्हा गरीब मुलानं -मुलीनं साठी शाळा सुरु करण्यात यावी .त्यांचे शिक्षण कार्य अखंड पणे सुरु ठेवावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनाच्या पलिकडे अद्याप काहीच मिळालेलं नाही.
पुण्यातील बुधवार पेठमधील ही मुलींची पहिली शाळा भिडे वाडा गेले अनेक वर्षांपासून अद्यापही पडक्या अवस्थेत आहे . त्याकडे शासन-प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने त्यावेळीही सावित्रीमाईंना विरोधच केला मात्र त्यांच्यामुळे शिकलेला आज महिला वर्ग देखील या गोष्टीकडे अर्थात भिडेवाड्याचे जतन व्हावे याकडे दुर्लक्षच करीत आहे. या भिडेवाड्याचे जतन करण्यासाठी त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी अनेक पुरोगामी संस्था, मंडळांकडून सातत्याने करण्यात येत आहे . मात्र प्रस्थापित व्यवस्था याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे या विरोधात आता सावित्रीच्या लेकी एकवटल्या असून भिडेवाडा बचावची हाक देत १८ सप्टेंबर रोजी भिडेवाडा बचाव समितीच्या माध्यमातून भि़डेवाडा येथे मुक निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने महिला वर्गाने मूक निदर्शने केली.
ज्यांच्यामुळे आज सर्व सखी आत्मसन्मानाने जगत आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना त्रिवार वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने भिडेवाड्यासमोर महिला जमल्या होत्या. 11 वाजता शनिवार वाड्यात एकत्र जमल्यानंतर प्रतिमा पुजन झाले. तसेच अभिवादन आणि विचारांची देवाण- घेवाण झाल्यानंतर प्रशासनाला देण्यात येणारे निवेदनाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व जमलेल्या महिलावर्गाने शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर सह्या केल्या. सदर निवेदन संयोजन समितीतील सदस्य मुख्यमंत्री, आयुक्त, महापौर यांना पोहोच करतील. अशी माहिती समितीच्या वतीने जाहिर करण्यात आली. भिडेवाडा बचाव यासाठी खूप खूप भावस्पर्शी अशा चारोळ्या करण्यात आल्या होत्या. हा मोर्चा मूकमोर्चा असल्याने यावेळी देण्यात येणाऱ्या घोषणा फलकावर लिहिण्यात आल्या होत्या.
--------
हे पण वाचा --- फक्त बामण पुरुषांना वेद शिकवणारे पुण्यातील वेद भवन
भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यमान अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, दिप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. महापालिकेसमोर काही अडचणी होत्या. त्या आता दूर होतील. आद्य स्त्रिशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समस्त महिला वर्गाच्या आदर्श आहेत. स्मारकातून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. महापालिकेकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल.
- मुक्ता टिळक, महापौर
महापालिकेच्या वारसास्थळांच्या यादीत भिडे वाड्याचा समावेश आहेच. काही वर्षे त्यासाठी निधीची तरतुदही होत आहे. यापुर्वी एकदा स्मारक करण्यासाठी प्रयत्न झाला होता, मात्र, भूसंपादनात काही अडचणी आल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे अडचण येणार नाही असा विश्वास बाळगायला हरकत नाही. - शाम ढवळे- निवृत्त अभियंता व हेरिटेज विभागप्रमुख, महापालिका
सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. भिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाईल. त्यापूर्वी वाड्याची पाहणी करणे गरजेचे आहे. पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांचा सहभाग आराखडा तयार करताना घेतला जाईल. वाडा वारसास्थळांच्या यादीत असल्याने आता कसली अडचण येणार नाही. - हर्षदा शिंदे- हेरिटेज विभाग प्रमुख अभियंता, महापालिका
महात्मा जोतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त (एप्रिल २०१९) युवा माळी संघातर्फे भिडे वाडा ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; भिडे वाड्याला लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे,' या शोभायात्रेत युवा माळी संघासह अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था, महात्मा फुले मंडळ, महात्मा फुले समता परिषद, माळी आवाज संस्था, ज्योती मित्र मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ अशा राज्यभरातील सुमारे ३६ संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
0 टिप्पण्या