.... आणि सावरकरांनी चार वेळा इंग्रजांशी माफी मागितली- ओवैसी


  टिपू सुलतान यांना हिंदूविरोधी म्हटले जाते. मात्र ज्या मुस्लिमांनी ब्रिटिशांची गुलामी स्वीकारली होती, त्यांचादेखील टिपू सुलतान विरोध करायचे. ज्या मराठा शासकांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, त्यांच्याविरोधातही टिपू सुलतान होते. कर्नाटकच्या नवाबने इंग्रजांविरोधात लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे टिपू सुलतान यांनी नवाबाचाही विरोध केला होता, टिपू सुलतान यांनी चार वेळा इंग्रजांशी लढाई केली आणि सावरकरांनी चार वेळा इंग्रजांशी माफी मागितली, असे प्रतिपादन शनिवारी एका सभेला संबोधित करतांना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी  यांनी केले.

कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वाद झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते याच घटनेचा संदर्भ देत ओवैसी यांनी हे विधान केले आहे.  जे टिपू सुलतान यांच्याविरोधात रोष पसवरण्याचे काम करत आहेत. टिपू सुलतान यांनी दिलेल्या योगदानाला ते मिटवू पाहात आहेत,” असे ओवैसी म्हणाले. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. “टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात युद्ध केले होते. आपल्याला ते विसरता येणार नाही. आज टिपू सुलतान यांच्याविरोधात खोटी माहिती दिली जात असल्याचेही ते म्हणाले.

 कर्नाटकातील शिवमोग्गा शहरात अमीर अहमद सर्कलमध्ये हिंदू संघटनेच्या लोकांनी वीर सावरकरांचे पोस्टर लावले होते. यानंतर टीपू सुलतानच्या समर्थकांनी याचा निषेध केला आणि झेंडा घेऊन पोहोचले. त्यांनी देखील यावेळी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला. हा वाद थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
त्यानंतर सावरकरांचे चित्रही काढण्यात आले. तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA