Top Post Ad

आदिवासी धर्माचा शोध


भारतीय आदिवासींची संस्कृती, त्यांचे वसतीस्थान, सामाजिक जीवन यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी संशोधन केले आहे. आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासकांनी ती एक आदर्श संस्कृती आहे. हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या समाज जीवनात, सहकार्य, एकत्र कुटुंबपद्धती व कुलचिन्ह (ऊदास्) पद्धतीला विशेष महत्त्व आहे. त्यांचे वसतीस्थान रानावनात, डोंगरदऱयात निसर्गाच्या सानिध्यात असून त्यांचं दैनंदिन जीवनही निसर्ग फुलांसारखे निसर्गातील रंगागंधाने फुलते व कोमेजते. इथपर्यंत त्यांचे संशोधन झाले आहे. परंतु त्यांच्या धर्माबाबत अद्याप संशोधन झालेले नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचे जगणे निसर्गाच्या सानिध्यात निसर्गपूजेने व निसर्गाशी एकरुपतेने होत असते.  हिन्दू धर्माचे कोणतेही चिन्ह त्यांच्या जीवनपद्धतीत अनुभवास येत नाही. तेव्हा स्वतंत्र भारतातील आदिवासींचा धर्म कोणता? हा सरळ सवाल आजच्या ज्ञानी, शिकलेल्या जाणत्या लोकांना, पडल्याशिवाय राहणार नाही. याच प्रयत्नातून अनेक आदिवासी साहित्यिकांनी विचारवंतांनी आदिवासी धर्माच्या नवनवीन संकल्पना मांडायला सुरुवात केली. प्रस्थापितांनी गेली अनेक वर्षे आदिवासींवर हिन्दू धर्माची लादलेली संकल्पना खोटी असल्याचे हे साहित्यिक ठणकावून सांगू लागले. ही संकल्पना आता जोर धरू लागली आहे. भारतातील सर्वच आदिवासी जमाती आपल्या पुरातन खऱ्या धर्माच्या शोधात आहेत. आपला मूळधर्म त्यांना माहित नाही. त्यांना केवळ स्वतचे मूळ व कुलचिन्ह माहित आहे, नागरी जीवनाच्या सहवासाने त्यांनी आपल्या आचारधर्माचा त्याग करून हिन्दू धर्माचे आचारविचार स्विकारू लागले. जर धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हटले तर त्यांच्यात स्वधर्माची नशा चढायला हवी होती. किंवा ते हिन्दू आहेत असे मानले, तर आज मात्र आदिवासींच्या अनेक जमाती धर्मांतर करताना दिसतात. ही सर्व परिवर्तने विचारात घेऊन आदिवासी धर्माविषयी संकल्पना मांडताना एल.के.मडावी म्हणतात की, आदिवासी हे द्रविडीयन वंशाचे असून सिंधू संस्कृतीचे वारसदार आहेत. डॉ.गोविंद गारे यांनी आदिवासींचा निसर्गधर्म मानला तर स्टेफनफक्स म्हणतात की आदिवासी जमातीत कोणत्याही जातीभेद नव्हता. त्यांच्यात आंतरजातीय विवाह पद्धती प्रचलीत होती. व रोटी व्यवहारही होत होते. मात्र काही जमाती हिन्दूंच्या सहवासात आल्या आणि त्यातून रोटी बेटी व्यवहारात भेद निर्माण झाले. डॉ.विनायक तुमराम यांनीही गोंडी धर्माची संकल्पना मांडली आहे.  जीवनात विवेक अविवेक देण्याचे सामर्थ्य धर्म देतो असे म्हटले तर आज धर्म हा आदिवासींच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. अशावेळी आदिवासींच्या मुळ धर्माबाबतच्या विचारांचा शोध सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आदिवासी साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक, राजकारणी या सर्व स्तरांतून आदिवासी धर्माचा शोध सुरू झाला आहे.  - 

डॉ.संजय लोहकरे 


 --------------------------------

आदिवासी म्हणजे डोंगर दऱ्योखोऱ्यात राहणारा व अनादी काळापासून टोळ्या-टोळ्यांनी (समुहाने) आपापल्या जीवनपद्धतीने जगत असलेला समाज आहे. आणि जगतो आहे. माणूस ज्या पद्धतीने जगतो त्या पद्धतीला त्याची संस्कृती या नावाने संबोधले जाते. आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा आदिवासींना अनार्य म्हणून विरोध केल्याचे पुरावे रामायण महाभारतासारख्या ग्रंथात सापडतात. आर्य व अनार्य यांच्यात अनेक संघर्ष झालेत. आदिवासी आपापल्या जीवन पद्धतीने जगत असताना आपल्या जीवनात ज्या ज्या वस्तूंचा संबंध आला. त्यांच्या जीवनात उपयोग करता आला, प्राणी, पक्षी, वनस्पती दगड इत्यादींचा उपयोग केला आणि निसर्ग सृष्टीतील घडणाऱ्या घटना, घडामोडी व आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या अशा चमत्कारी घटना आपापल्या भावनेनुसार निसर्ग नियमानुसार घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावता, उदा.गोऱ्हाण पुजा (गोऱ्हाण म्हणजे गोठा) खोलापूजा (खोला म्हणजे मळणीची जागा खळा) वाघदेव इत्यादी देवदेवतांची पुजापद्धती आपली वेगळी आहे. आदिवासींच्या देवी देवतांची अशी खास मंदिरे नसतात गावाबाहेर शिवारात कुठेतरी झाडाझुडपात, मोठ्या झाडाखाली, रस्त्याच्या बाजूला, केव्हा नदी नाल्याच्या काठी टेकडीवर ही स्थाने असतात. त्यांचीच ते पुजा करतात. अशा प्रकारे त्यांची धार्मिक भावना असते. आदिवासी संस्कृती कोणत्याही धर्माशी संबंधीत नाही म्हणून तर सर्वच धर्म पंधाचे लोकांनी त्यांना अनार्य, रानटी म्हणून दूर लोटले. आज त्यांना आपापल्या धर्म पंथात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पंरतु आदिवासींची ना हिन्दू, ना मुसलमान, ना ख्रिस्ती त्यांचा धर्म निसर्गावर आधारीत निसर्ग धर्म आहे. म्हणजे आदि धर्म होय. 

आदिवासींचा आदि धर्माची कल्पना नंदूरबार जिह्यातील तळोदा तालुक्यातील रंजनपूर (गोखड) गावी इ.स.1938 साली आदिवासी संत गुल्या महारज यांनी मांडली आहे. त्यांची आदि धर्माची कल्पना मानवतेच्या आणि समतेच्या आधारावर रुजवली होती.व आजही ही काही प्रमाणात आहे. कोणीही जरी आदिवासींना जबरीने सांगत असेल की, आदिवासी हे अमूक धर्माचे आहेत तर ते बरोबर होणार नाही.कारण आपण स्वतच प्रश्नांचा शोध घेतल्यास उत्तर सापडते की, माणूस आधी की धर्म आधी? तर माणूस आधी, माणसांने धर्म बनविला की धर्माने? उत्तर सापडते. माणसाने धर्म बनविला. कारण धर्माची संकल्पना माणसानेच केली असून धर्म निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आदिवासी माणूस धर्म पूर्व संस्कृतीचा माणूस असल्याने त्यांचा निसर्ग धर्म अथवा आदी धर्म कल्पनेप्रमाणे असू शकतो. तो कोण्या धर्म संस्थापकाने स्थापन करून बनविलेला नाही. 

निसर्गत निसर्गावर आधारीत निसर्ग धर्म किंवा आदि धर्म ही संकल्पना आदिवासींना लागू पडते. कारण धर्म ही कल्पना नंतर आली. त्यानुसार आपल्या मायभूमीवर तीन परकीय धार्मिक व राजसत्तेची आक्रमणे झाली आहेत. पहिले आक्रमण आर्यांचे असून त्यांचा वैदिक धर्म व राजसत्तेच्या प्रभावाखाली हा देश गेला. दुसरे मुस्लिम धर्माचे आक्रमण झाले असून त्यांची सुद्धा काही काळ राजसत्ता होती. त्यानंतर खिस्ती धर्माचे आक्रमण झाले. इंग्रजी राजसत्तेखाली हा देश व प्रजा दिडशे वर्षे होती. अशी आक्रमणे होऊनसुद्धा आजही आदिवासी संस्कृती टिकून आहे. आजही आपल्या परंपरेनुसार रुढी, रितीरिवाजानुसार आपल्या जीवन संस्कृतीप्रमाणे आदिवासी जगत आहेत. म्हणून तर आदिवासींच्या सोयी-सवलतींना पाहून नकली आदिवासी खोटे दाखले घेऊन आदिवासी बनतात. परंतु जातीचे दाखले तपासले तर ते सापडतात. कारण त्यांना आदिवासी रितीरिवाज, रुढी परंपरा, देव-देवता, सण-उत्सव, जीवन संस्कृती ज्ञात नाही. 

आदिवासी जिवन संस्कृती आगळी-वेगळी आहे. म्हणूनच उलट तपासणीत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊ शकत नसल्याने हे खोटे आदिवासी सापडतात. कारण त्यांची व आदिवासींची संस्कृती वेगळी व भिन्न आहे. म्हणजेच पशु, पक्षी, पूजक, निसर्ग पूजक असा अर्थ होतो. म्हणून तर ब्रिटीश काळात आदिवासींना धर्माच्या बाबतीत अॅमिनीस्ट असे संबोधले आहे. प्राकृतिक पूजक धर्म एवं संस्कृती या पुस्तकातील पान क्र.34वर उल्लेख आहे की, सन् 1931च्या जनगणनेपर्यंत आदिवासींचा धर्म हिन्दू लिहिण्यास सुरुवात झाली आहे. असा उल्लेख मिळतो. 

आता अॅनिमीस्ट म्हणजे निसर्गाची पूजा करणारे अशा अर्थाने  अॅनिमिस्ट इंग्रजांच्या काळात जनगणनेच्या नोंदणीत लिहिले जात असे. पंरतु ते काढून (बदलून) टाकण्यात आलेले आहे. कारण कोणत्याही वस्तू, प्राणी, पक्षी जीवजंतूंची ओळख असते. ही ओळख म्हणजे आकार, गुण, लक्षणे, इत्यादीवरून ओळखली जाते. तर मानवी प्राण्यांची ओळख देखील ठरलेली आहे. ती म्हणजे मानवाचे वेगवेगळे समुदाय, त्यांची ओळख ही त्या समाजाच्या जीवन संस्कृतीवरून होत असते.त्यांची सामाजिक जागृती व विकास देखील त्यांच्या जीवन संस्कृतीवरून होत असते. त्यांची बोली भाषा, राहणीमान, रुढी-पंरपरा, देव-देवता, कला-कौशल्य व जीवन संस्कृतीचे अनेक पैलू आहेत. हे टिकवून ठेवणे गरजेचे आहे. संस्कृती हीच समाजाची ओळख असते. त्यांचे साहित्य हे दस्तैवज असतात. असे असूनसुद्धा आदिवासींची अस्मिता बोथट करून फूट पाडण्याचे चालूच आहेत. इंग्रज राजवट सुरु झाल्यावर आदिवासींची सर्व परिस्थीती बदलली. सरकारने शिरगणतीची (खानेसुपारी) कामे सुरु केली. त्यावेळी आदिवासी भागात देखील सर्वे करीत नोंदणीच्या कामाला सुरुवात झाली असता. इंग्रज सरकारच्या कर्मचाऱयांना प्रश्न पडला होता की, आदिवासींचा धर्म कोणता? त्यांची नोंद कोणत्या धर्मात करावी? कारण हिन्दुस्थानात राहतात म्हणून हिन्दू धर्मात नोंदकेली तर हिन्दू धर्मात चातुर्वण्याप्रमाणे शिवाशीव, कर्मवाद, पाप-पुण्य या कल्पनेवर आधारीत जाती भेदांमध्ये गणती केली जायची. तर आदिवासी जमातीची धार्मिक भावना व सांस्कृतीक जीवन हे हिंन्दुप्रमाणे वेगळे होते. त्यामुळे इंग्रजांनी आदिवासींना अॅनिमिस्ट असे म्हटले आहे. 

इंग्रज अंमलाच्या वेळी आदिवासी जमातीचे लोक पूर्ण आपल्याच जीवन पद्धतीचे जीवन जगत होते. निसर्गावर आधारित गरजा भागविल्या जात होत्या. परंतु ब्रिटीश सरकारने महसूल व वनखाते सुरु केल्यानंतर मात्र आदिवासी भागात कर्मचारी-अधिकारी यांचे येणे-जाणे सुरु झाले. तसेच त्या काळात मिशनरी वर्ग प्रचारक देखील येऊ-जाऊ लागले. त्याबरोबर इंतर पांढरपेशी वर्ग, व्यापारी येऊ लागले. त्यामुळे आदिवासींवर त्यांचा प्रभाव येऊनही त्यांचे अनुकरण करू लागला. मिशनरी धर्माप्रमाणे हिन्दू धर्मात व मुस्लिम धर्मात देखील प्रभाव पडू लागला. अशा प्रकारे धार्मिक आक्रमणे होऊन काही ठिकाणचे आदिवासी ख्रिस्ती तर काही मुस्लिम देखील झालेले दिसतात. हिन्दू म्हणून तर सर्व सरकारी कागदोपत्री नोंदी होऊन आदिवासी हिन्दू बनला गेला व बनला जात आहे. आदिवासी जागतिक मानव, अधिकारासाठी संयुक्त संघाच्या मानव अधिकार आयोगाने 1993मध्ये जिनिव्हा येथे 19 जुलै ते 30 जुलैला परिषद भरविली. त्यात आदिवासी जनसमुहाला वंशहत्येपासून संरक्षण करण्यासाठी व्यक्तीगत व सामुदायिक अधिकार दिलेले आहेत की, आदिवासी जनसमुदायाच्या स्वतंत्र अस्तित्वाला बाधा आणू नये. त्यांच्या संस्कृतिक व वाशिंक वैशिष्ट्याला आणि अस्तित्वाला धक्का लावू नये. दुसरी संस्कृती आणि जीवन पद्धती जबरदस्तीने लादू नये. त्या समुहाच्या जमिनी, भू-प्रदेश साधन सामुग्री हरण करू नये. त्यांच्या विरोधात कोणताही प्रचार करू नये. तसेच भारतीय राज्य घटनेत देखील अनुच्छेद 19(1) अनुसार नागरिकांना भाषा, लिपी व संस्कृती धर्माप्रमाणे आचरण व प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. असे असूनसुद्धा आदिवासींना इतर धर्मियांच्या प्रभावाखाली रहावे लागत आहे. 

वरील सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, आपण कोण आहोत? हे ठरविण्याचा अधिकार आदिवासींचा आहे. म्हणून आदिवासींची संस्कृती अलग असण्याने आपोआपच आदिवासी धर्म घोषित होऊन पुढे येत आहे. हा सर्व लेखनप्रपंच ज्यांना लागू आहेत अशांना आम्ही आदिवासी आहोत अशी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. परंतु केवळ सवलतीसाठी असे प्रयत्न होत असतील किंवा ते करत असतील तर हे मात्र निश्चितच जात पडताळणीला विरोध करतील हे त्रिवार सत्य आहे. 

सिंधूसंस्कृती ही मातृसत्ताक आहे. देव पूजक नसून निगर्स पुजक आहे. हे सिंधू संस्कृतीच्या संशोधकांनी पुराव्याद्वारे सिद्ध केले आहे. आमचा धर्म अदिधर्म जो गुलाब महाराजांनी सांगितला आहे. त्याचप्रमाणे आदिवासीच्या संदर्भात अनेक मान्यवर विचारवतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या एक समान आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गिलानी, डब्ल्यू जे.पेरी, डॉ.रिव्हर्स इंपिरियल गॅझेट, मदन  व मुझूमदार, बोगार्डस् अशा अनेकांनी आदिवासींच्या व्याख्या केलेल्या आहेत. समाजातील धर्म व धर्माचरण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्ग धर्म आधी धर्म हाच त्यांचा धर्म आहे. मग इतर धर्मांना त्यांना चिकटवून काय उपयोग. आता हिन्दू धर्म व आदिवासी धर्म यांच्यातील फरक स्पष्ट करणारे अनेक मुद्दे आहेत. त्यातील काही आपल्या माहितीसाठी देत आहे. 

1. आदिवासी धर्म जाती व वर्ग व्यवस्थेला नकार देणारा आहे. तर हिन्दू धर्म याला मान्यता देणारा आहे. 
2. आदिवासी धर्म विशाल, विस्तृत विचार धारेचा आहे तर हिन्दू धर्म मात्र साच्यामध्ये बंदिस्त आहे. 
3. आदिवासी धर्मात मानवतावादी संस्कृती आहे. मात्र हिन्दू धर्मात मानवा-मानवाचे शोषण करणारी विकृत विचारधारा आहे. 
4.  आदिवासी धर्म समतेवर आधारीत आहे, तर हिन्दू धर्म विषमतेवर आधारीत आहे. 
5. आदिवासी धर्म न्यायावर आधारीत आहे तर हिन्दू धर्म अन्यायावर आधारीत आहे. 
6. आदिवासी धर्म समुहवादावर आधारीत आहे, हिन्दू धर्म व्यक्तीवादावर आधारीत आहे. 
7. आदिवासी धर्मात स्त्रीला श्रेष्ठ स्थान आहे. हिन्दू धर्मात स्त्रीला सर्वात खालचे स्थान आहे. 
8. आदिवासी धर्मात मौखिक परंपरा तर हिन्दू धर्मात लिखित परंपरा आहे. 
9. आदिवासी धर्मात जमाती आहेत, तर हिन्दू धर्मात जाती आहेत. 
10. आदिवासी शब्दावर विश्वास ठेवतो तर हिन्दू कागदावर विश्वास ठेवतो. 
11. आदिवासी धर्मात बहुमत, अल्पमताला मान्यता नसते तर योग्यतेला मान्यता असते. हिन्दू धर्मात बहुमताला मान्यता असते. तर योग्यतेची काही गरज वाटत नाही. 
12. आदिवासी धर्मात लग्नाला करार मानला जातो तर हिन्दू धर्मात संस्कार मानला जातो. 
13. आदिवासी धर्मात लग्न विधी नियम (धवलेरी) करतात तर हिन्दू धर्मात भट (ब्राह्मण) लावतात. 
14.आदिवासी धर्मात निसर्गाची पुजा केली जाते. तर हिन्दू धर्मात काल्पनिक देवतांची पुजा करतात. 
15. आदिवासी धर्म विज्ञानवादी आहे तर हिन्दू धर्म दैववादी आहे. 
16.आदिवासी धर्मात नवरा बायकोचे पटले नाही तर काडीमोड करून दोघानाही दुसरे लग्न करण्याची परवानगी मिळते. तर हिन्दू धर्मात घटस्फोटासाठी वीस-वीस वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. 
17. विधवाला दुसऱ्या लग्नाला आदिवासी धर्मात मान्यता तर हिन्दू धर्मात मान्यता नाही. 
18. जीवनावर व जगण्यावर स्वतचा अधिकार आदिवासी धर्मात मानतात तर हिन्दू धर्मात देवाचा अधिकार मानतात. 
19. आदिवासींची कुलदैवते/ग्रामदेवी गावच्या वेशीवर उघड्यावर असतात. तर हिन्दू धर्मात देवदेवतांची भव्य मंदिरे असतात, व देव कुलपात बंद असतो. 
20. निसर्ग शक्तीने हे विश्व निर्माण केले आहे, आदिवासी धर्म सांगतो तर हिन्दू धर्म दैविशक्तीने विश्व निर्माण झालं असं मानतो. 

असे अनेक मुद्दे आदिवासी धर्म व हिन्दू धर्म यामधील फरक स्पष्ट करणारे आहेत. तसेच आदिवासी धर्माची गरज आणि स्पष्टता दर्शवितात.  


साभार: ....आदिवासी धर्माचा शोध- एक आव्हान 

लेखक पी.सी.झांबाडे  9869655293 

सर्वत्र आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा 👇👇





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com