चाळीच्या जागेत ड्रेनेज लाईन... रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

कल्याणच्या इराणी चाळीची तीन फुटाहून अधिक जागा चिंतामणी हाईटच्या जागेत विलीन करून त्यावर अनधिकृत बांधकाम करणार्‍या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यशवंत कांबळे यांच्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त कारवाई करतील आणि त्यांना होणार्‍या त्रासातून मुक्त करतील या प्रतिक्षेत इराणी चाळीचे रहिवाशी आहेत. स्थानिक आमदार ना. राजू पाटील यांच्या मतदारसंघातील इराणी चाळ असलेला हा विभाग  असून त्यांनी लवकरच आमदार निधीतून इराणी चाळीच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन येथील रहिवाशांना दिले आहे.


इराणी चाळ ही कल्याण मधील जुनी चाळ, आज या चाळीमध्ये येथील रहिवाशांची तिसरी पिढी रहात आहे,  ही चाळ लोकग्राम वाटिका या कल्याण पूर्वेतील एका इमारतींच्या कॉम्प्लेक्सचा एक भाग होती, मात्र काही वर्षापुर्वी लोकवाटिकाच्या सोसायटीने  भिंत टाकून तो भाग वेगळा केला, त्यानंतर चिंतामणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी त्या चाळीशेजारी असलेल्या अर्धवट काम झालेल्या चार मजली इमारतीचे काम हाती घेवून ती इमारत पूर्ण केली. ही इमारत ग्रामपंचायतीच्या जागी अर्थात शासनाच्या उभी केली असून सदर इमारती अनधिकृत आहेत. 
याबाबतचा तक्रारी अर्ज इराणी चाळीच्या रहिवाशी श्रद्धा परब, मीनल कदम यांनी चाळीतील रहिवाशांच्या सह्यानिशी कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्तांना 18 मे 2022 रोजी दिला आहे. महानगर पालिकेमार्फत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच इमारत बांधकाम करण्यात आले. तसेच राजेश म्हात्रे यांच्याशी संगनमत करून अनधिकृतपणे त्या इमारतीतील फ्लॅट विकून रहिवाशांना राहण्यास दिले. या इमारतीमधील शौचाची घाण आणि सांडपाणी बाजूच्या चाळीत सोडले जाते परिणामी चाळीतील रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चाळीत रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 
सदर इमारती अधिकृत असल्याबाबत महानगर पालिकेकडे कोणते कागदपत्र असतील तर ते दाखविण्यात यावेत असेही या रहिवाश्यांनी पत्रकात नमूद करून महापालिकेस आवाहन केले आहे. या इमारतीचे बांधकाम करणार्‍या बिल्डरने महापालिका अधिकार्‍यांना हाताशी धरून इमारतीचे बांधकाम पूर्ण केले मात्र मल वाहिनी ड्रेनेज चेंबर जे फक्त २ sq ft चे आहे, ते इमारतीच्या भिंती बाहेर म्हणजे इराणी चाळीच्या हद्दीत बांधले, याचा  त्रास गेली अनेक दिवसापासुन चाळीतील रहिवाशी सहन करित आहेत. मात्र पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने नागरिकांच्या तक्रारीवर कारवाई केलेली नाही.
याच विषयाचे दुसरे पत्र इराणी चाळीतील रहिवाश्यांनी महानगर पालिका आयुक्त तसेच नगरविकास खात्याला दिले आहे. ज्यामध्ये इमारतीची ड्रेनेजची टाकी इराणी चाळीच्या आवारातून काढावी आणि त्यांच्या इमारतीच्या आवारात न्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.   या बाबतीत प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबरकर याना विचारले असता त्यांनी यासंदर्भात जलनिस्सारण अभियंता नवांगुल आणि मलनिस्सारण अभियंता बोरसे तसेच बिल्डर यशवंत कांबळे याना पत्र देऊन रहिवाशांचा प्रश्न सोडण्याबाबत सांगितल्याचे प्रजासत्ताक जनताशी बोलताना म्हणाल्या .
त्यांनी ड्रेनेज सारख्या शुल्लक गोष्टीसाठी बिल्डरने अडून रहाणे हे संयुक्तिक नसून बिल्डरने तात्काळ इमारतीच्या ड्रेनेजची पर्यायी व्यवस्था करावी. असे मत कल्याण नेतवली विभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख महेंद्र कुठे यांनी व्यक्त केले. तर  मलनिस्सारण कार्यकारी अभियंता नवांगुल यांनी सदर ड्रेनेज लाइन बाहेर काढायची झाल्यास ज्या जागेतून काढायची आहे त्यांची परवानगी घ्यावी लागेल. ती जागा कोणाच्या मालकीची आहे हे नगररचना विभागात तपासाव लागेल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मुळात इमारतीला इमारत पूर्णत्वाचा दाखला हा इमारतीच्या सर्व बाबी पूर्ण झाल्याशिवाय देता येत नाही मग हा ड्रेनेजचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो महापालिका अधिकार्‍यांनी कोणतीही बाब न तपासता बिल्डरला संपूर्ण कामे पूर्ण होण्याआधीच इमारत पूर्णत्वाचा दाखला दिल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यासाठी महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचे इराणी चाळीचे रहिवाशी श्रध्दा परब आणि मीनल कदम यांनी  सांगितले.

दिपक चिंदरकर
कल्याण प्रतिनिधी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA