Top Post Ad

दहीहंडी ही जीवघेणी स्पर्धा नव्हे, हा आहे उत्सव हिन्दुत्वाचा


  जांभळी नाक्यावर रंगणार संस्कृती व परंपरा जपणारा महादहीहंडी महोत्सव

तर शिवाजी पाटील यांच्या  स्वामी प्रतिष्ठानची ५१ लाखांची दहीहंडी

ठाण्यातील जांभळी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे टॉवर समोरील क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते चौक येथे महा दहीहंडी उत्सव २०२२ साजरा होत आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या उत्सवाचे खऱ्या अर्थाने महोत्सवात रूपांतर केले आहे. महादहीहंडी जगभरात पोहोचून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचे आकर्षण निर्माण केले आहे. या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील आकर्षण ठरेल असा विश्वास आनंद चारिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. 

त्या सोहळ्यात युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राउत, शिवसेना उपनेते अनिताताई बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, मधुकर (अण्णा) देशमुख, मनोहर गाढवे, चिंतामणी कारखानीस, समिधाताई मोहिते, रंजनाताई शिंत्रे, स्नेहल कल्सारीया यांची उपस्थिती असणार आहे.


 धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर समोरील चौकात होणाऱ्या महादहीहंडी उत्सवाला ठाणे व मुंबई येथील गोविंद पथकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. मागील दहीहंडी महोत्सवात २०० च्या वर गोविंद पथकांनी आपली हजेरी लावली होती. ठाण्यातील एक मानाचा व प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव म्हणून आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा महादहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जातो.

मुंबई येथील गोविंद पथकासाठी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच ठाणे येथील गोविंदा पथकासाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११  रुपयाची तसेच महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची रोख बक्षिसे व स्मृती चषक देण्यात येणार आहे. महादहीहंडी आयोजना बरोबर सर्वांना आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला नृत्य मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामावंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्यात उपस्थित राहणा-या गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे. त्यामध्ये कार्डियोलॉजीस्ट, ऑर्थोपेडिक व न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास ५ बेड आरक्षित करण्यात आले आहेत व संपदा हॉस्पिटलचे डॉ.उमेश आलेगावकर यांच्या संयुक्त विद्यामानाने विविध तज्ञ डॉक्टरांचे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच ५०० सुरक्षा रक्षक व कार्यकर्ते सज्ज आहेत. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महादहीहंडी उत्सवात सहभागी होणा-या सर्व गोविंदा पथकांना बजाज अलायंझ कंपनीच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार आहे. उत्सव पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचीही संख्या मोठी असते. आनंदाच्या भरात प्रेक्षकांनाही इजा होण्याची शक्यता असते. या दहीहंडी परिसरात असलेल्या प्रेक्षकांनाही काही इजा झाल्यास त्यांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

महादहिहंडी महोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसुन उत्सव आणि परंपरेला साजेल असा हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दहिहंडीचे मनोरे रचत असताना शेवटच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला 'उदय आऊट डोअर' या गिर्यारोहक संस्थेमार्फत सेफ्टी रोप देण्यात येणार आहे. जेणेकरुन गोविंदांचे खालचे थर कोसळले. तरी सर्वात वरच्या थरावर असणारा गोविंदा रोपच्या सहाय्याने सुरक्षितर राहणार आहे. महादहिहंडी महोत्सव साजरा करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता आनंद चॅरिटेबल ट्रस्टने सेप्टी रोपची व्यवस्था केली आहे. महादहीहंडी सोहळयात प्रत्यक्ष येऊन पाहणे अनेकांना शक्य होत नाही. त्यासाठी या सोहळ्याचे स्थानिक केबल तसेच सर्व लोकप्रिय चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच संपूर्ण हिंदूस्थानमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवाला होत असलेली हजारोंची गर्दी लक्षात घेता पोलिसांबरोबर सोहळयावर सीसी टि. व्ही खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण कॅमेरांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या दहीहंडी महोत्सवाच्या दिवशी सकाळी १२.०० वा ठाण्यातील प्रतिष्ठीत महिला गोविंदा पथक व पुरुष गोविंदा पथकांची सलामी देण्यात येणार असल्याची माहीती आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे राजन विचारे यांनी दिली. 

---------------------------------------

शिवाजी पाटील यांच्या  स्वामी प्रतिष्ठानची ५१ लाखांची दहीहंडी

मराठी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे भाजप प्रणित आयोजित सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव या वर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून स्वामी प्रतिष्ठान यंदाच्या दहीहंडी उत्सवात एकूण ५१ लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यामातून राज्यातील ग्रामीण भागतील ७५ हजार गरजू महिलांसाठी कॅन्सर तपासणी  करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला आहे.


 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे उद्घाटक असतिल. तसेच महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे  यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय असेल.  याव्यतिरिक्त अनेक राजकीय नेतेमंडळी,  हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची हजेरी लावणार असल्याची माहिती स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी आमदार संजय केळकर सुभाष आंबेकर आणि धोंडीबा दूधभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

         स्वामी प्रतिष्ठान एक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे जिच्यामार्फत आम्ही समाजातील विविध घटकांसाठी, विशेषतः गरजू लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवते, २०१८ आणि २०१९ साली आम्ही ठाण्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते, जवळजवळ ४५० नोंदणीकृत गोविंदा मंडळांच्या १ लाखाच्यावर गोविंदानी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निधीतून आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केली. ह्यावर्षीही आम्ही काही नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन ७५ हजार गरजू महिलांसाठी कॅन्सर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ,महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com