भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरण... 82 वर्षीय कवी डॉ. पी वरवरा राव यांना जामीन

 


भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले 82 वर्षीय कवी डॉ. पी वरवरा राव यांचे वय आणि आजारपण लक्षात घेता त्यांना जामीन मिळाला पाहिजे असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने  वैद्यकीय कारणास्तव आज 10 ऑगस्ट रोजी अंतरिम जामीन मंजूर केला आहे

 एल्गार परिषद रॅली प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग याला जून 2018 मध्ये नागपुरातून अटक केली, तेव्हा वरवरा राव यांचे नाव तपासात पुढे आले होते. 17 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे पोलिसांनी भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणात त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी त्याच्याशी संबंध असल्याबद्दल अटक केली. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली होती. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. जुलै २०२०मध्ये राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्यूशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने राव यांना जामीन दिला नव्हता. यामुळे राव यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला कवी वरवरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली होती.

वरवरा राव हे मूळचे तेलंगणातील वारंगलचे असून ते माओवाद्यांचे सहानुभूतीदार, कवी आणि पत्रकार आहेत.   मार्क्सवादी समीक्षक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आहेत. राव यांनी नवउदारवादी राज्याचा निषेध करणारे अनेक लेख लिहिले आणि सार्वजनिक सभांना संबोधित केले आहे. माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी 'विरासम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारी लेखक संघाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक कार्यकर्ते असण्यासोबतच राव हे एक उत्तम कवी देखील आहेत, त्यांचे 15 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 1957 पासून ते कविता लिहित आहेत. ते तेलुगू साहित्यातील उत्कृष्ट समीक्षकांपैकी एक मानले जातात.

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राव यांना भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणात अटक होण्यापूर्वीच अनेक प्रसंगी अटक करण्यात आली आहे. त्यांची पहिली अटक 1973 मध्ये झाली होती. त्यानंतर वरवरा राव यांना आंध्र प्रदेशमध्ये अंतर्गत सुरक्षा कायद्याअंतर्गत (MISA) अटक करण्यात आली. आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही करण्यात आली होती, आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात सुटलेल्या इतर कैद्यांच्या विपरीत, राव यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना आणखी एक आठवडा तुरुंगात ठेवण्यात आले. आणीबाणीनंतर अनेक वेळा त्यांचे प्राण वाचले. 

पोलिसांनीच पेरले पुरावे.......https://www.prajasattakjanata.page/2022/06/blog-post_30.html

प्रक्रिया हीच शिक्षा...https://www.prajasattakjanata.page/2022/07/blog-post_49.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA