मुंबई - माझा दलित पँथर या संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, किंवा मी, साहित्यिक प्रांतात झालेल्या, लिटील मॅगझिन च्या चळवळीत सहभाग घेतला नाही .ब्लैक पैंथर आणि दलित पँथर, यांचा, संबंध फक्त नावापुरता आहे. ब्लैक पैंथर ची सामाजिक स्थिती भौगोलिक स्थिती, धार्मिक स्थिती, वेगळी आहे तर, दलित पँथर ची सामाजिक स्थिती फारच वेगळी आहे. दोन्ही चळवळीचे आदर्श वेगवेगळ्या प्रकारचे आहे. अशा परिस्थितीत, ब्लैक पैंथर संघर्षात संपली, तर, दलित पँथर ची चळवळ सुरू आहे, कारण तिचे, आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांनी दलित पँथर निर्मितीच्या आधी रक्त विरहित क्रांती घडवून आणली होती. असे स्पष्ट विचार प्रसिद्ध साहित्यक रावसाहेब कसबे यांनी मांडले. दलित पँथर सुवर्णमहोत्सव सोहळ्याच्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास आठवले आणि प्रमुख पाहुणे म्हणून, रावसाहेब कसबे होते. तेलंगणा येथील आंबेडकरी विचारवंत डॉ.मल्लीपल्ली लक्ष्मय्या हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. विचारमंचावर अर्जुन डांगळे; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे; दिलीप जगताप; सुरेश सावंत; लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; लक्ष्मण गायकवाड; सुरेश बारशिंग; बबन कांबळे; गौतम सोनवणे राही भिडे आदी अनेक मान्यवर तसेच यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित पँथर्स ही भविष्याची गरज आहे. आज ना उद्या जरूर दलित पँथर पुन्हा निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून आपला देश कधीही हिंदुराष्ट्र होणार नाही त्याचे दोर कधीच संविधनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कापले आहेत. डॉ माईसाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक सन्मान आणि न्याय देण्याचे काम तत्कालीन भारतीय दलित पँथरचे नेते रामदास आठवले यांनी केले. तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथर ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर लढा यशस्वी लढला असेही डॉ रावसाहेब कसबे म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करू या. राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर आम्ही भारतीय दलित पँथर सुरू केली. घरादाराची राखरांगोळी करून आम्ही चळवळ चालविली. सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन भारतीय दलित पँथर आम्ही देशभर नेली.गावागावात दलितांना लढण्याची हिम्मत आणि विश्वास दिला असे ना.रामदास आठवले म्हणाले.
पँथरचा संस्थापक कोण या वादात अन्याय अत्याचारा विरोधात झेप घेणारा धगधगता अग्नी म्हणजे पँथर,त्याचा धाक इथल्या प्रस्थापितांना आणि राजकर्त्यांना होता.ढसाळ ढाले वादानंतर पँथर बरखास्त झाली त्यावेळी पँथर असायला पाहिजे म्हणून भारतीय दलित पँथरची सुरुवात झाली. त्यानंतर गायरान जमिनी,मंडल आयोग लागू करा, नेल्सन मंडेलांची सुटका करा, अशा अनेक प्रश्ना बरोबरच नामांतरचा लढा असा १७ वर्ष भारतीय दलित पँथरने संघर्ष केला.सर्वहारा समाजा करीता चळवळ उभारली.अंधार असेल तिथे मशाल घेऊन उभे राहिले पाहिजे म्हणून पँथर असली पाहिजे. याकरिता पुनरूच्चार करु असे आठवले यांनी सांगितले.
दलित पँथर कोणी स्थापन केली या वादात न पडता दलित पँथर्स ही जागतिक स्तरावर नोंद घेतलेली क्रांतिकारी संघटना होती. आजही दलित पँथर्सचे नाव घेतले तरी तरुणांचे क्रांतीसाठी रक्त सळसळते ;अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते असे मत तेलंगणा येथून अलेले विचारवंत उद्घाटक डॉ मल्लेपल्ली लक्षमय्या यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या