भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्नेहालय संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपासून भारत, बांगलादेश, नेपाळ बाली (इंडोनेशिया) या देशातील उपक्रशील तरुणाई या शिबिरासाठी नगरमध्ये एकत्र येणार आहे. शिबिरात नगरच्या तरूणांना उपक्रमशील युवकांशी संवाद साधता येणार आहे. भारताच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे (ICCR) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, वंचित मुलांच्या जीवनावर प्रभाव पाडणारे समरिटन हेल्प मिशन या संस्थेचे संस्थापक मामुन अख्तर, बांगलादेश मधील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष आणि बांगलादेशचे निवृत्त उपलष्कर प्रमुख जीवन कनन दास, मुख्य कार्यकारी अधिकारी राह नबकुमार, बांगलादेशातील मानवाधिकार आणि महिला हक्क कार्यकर्त्या तांद्रा बारूआ, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपट पवार आदीं तरुणाईशी शिबिरात संवाद करतील.
शिबीराचे औपचारिक उद्घाटन 13 ऑगस्टला होत असून 15 ऑगस्टपर्यंत सर्व तरुणाई एकत्र असेल. त्यानंतर परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना भारताची संस्कृती आणि विविध सेवा कार्य यांचा परिचय करून देण्यासाठी 4 दिवसांची भारत अनुभूती यात्रा आयोजिण्यात आली आहे. शिबीर संयोजन समितीत डॉ. विनय कोपरकर, अनिल गावडे, संतोष धर्माधिकारी, राजीव गुजर, संजय गुगळे, गायत्री थोरात, प्रा.श्रेयस रामदासी, हनीफ शेख, अजित कुलकर्णी, प्रवीण मुत्याल, पुजा पोपळघट, डॉ.अंकुश आवारे, डॉ. प्रमोद तांबे, प्रा. विपुल धनगर, अब्दुल खान, अजय शेळके, प्रीती ताकवणे, शुभम कोरडे, तुषार काकडे आदींचा समावेश आहे
0 टिप्पण्या