Top Post Ad

अदानी समुह... मुद्रा बंदर... अंमली पदार्थ.... आणि कारवाई


कच्छ जिल्ह्यामध्ये अदानी समुहाच्या मालकीच्या मुंद्रा बंदराजवळ गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे.  ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ  एका कंटेनरमध्ये आढळून आले. गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीसानी मुद्रा बंदरावरील एका कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी दिली.  

गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. 20 डिसेंबर 2016 रोजी अदानीच्या मुंद्रा बंदरात येणाऱ्या जहाजातून 800 किलो कोकेन श्रीलंकेत पकडण्यात आले होते, ज्याची किंमत बाराशे कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि एटीएसने तपास सुरू केला असता, हे काम गांधीधामच्या एका लाकूड व्यावसायिकाच्या नावाने येत असल्याचे आढळून आले. त्यावेळी दक्षिण आशियात पकडलेली ही सर्वात मोठी असाइनमेंट होती. हे जहाज इक्वेडोर, बेल्जियम, सौदी अरेबियामार्गे भारतात येत असल्याचे आढळून आले.  याच वर्षी एप्रिल महिन्यात मुंद्रा बंदराजवळ आठ पाकिस्तानी पकडले गेले होते, ते 3000 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन घेऊन जात होते. २०२० या वर्षी अदानीच्या हजीरा बंदरातून 120 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, ट्रेमेडल नावाचे हे ड्रग, ज्याला ISIS ड्रग म्हणूनही ओळखले जाते. मे 2019 रोजी अल मदिना नावाच्या जहाजातून 6 पाकिस्तानींना 280 किलो ड्रग्जसह पकडण्यात आले. जुलै 2017 मध्ये, तटरक्षक दलाने समुद्रात बलुचिस्तानमध्ये चीनच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या ग्वादर बंदरातून गुजरातला जाणाऱ्या एका जहाजातून 1500 किलो हेरॉईनचा एक असाइनमेंट पकडला होता.

अशा तऱ्हेने अदानि समुहाच्या या बंदरावर  प्रचंड आमली पदार्थांचा साठा मिळत असेल तर यामागचे कारण काय असेल.  अदानी समुहाचे हे बंदर म्हणजे आंमली पदार्थ तस्करीचा अड्डाच बनले आहे. मागील वर्षभरात सुमारे २० हजार करोडहून जास्त आंमली पदार्थाची तस्करी या येथे पकडण्यात आली आहे. तरीही या बंदरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.  अदानि समुहाला नाममात्र दराने हे बंदर भाडेतत्वावर दिले. त्याचा खरेच कशासाठी उपयोग होत आहे हे आता जगजाहिर झाले आहे. पिढ्यान् पिढ्या व्यवसाय क्षेत्रात असणारे टाटा समुह, बिर्ला समुह इतकेच नव्हे तर बिल गेट्सला सुद्धा आठ वर्षात मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत यादीत अव्वल स्थानावर अदानि समुह कसा काय स्थान मिळवू शकला. याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणे गरजेचे आहे.

अदानी समुहाच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले गेले. पण अदानी समुह ड्रग्जचा व्यापार करतो असे कोणीही म्हटले नाही. असे म्हणणे चुकीचे ठरते. कारण असा कोणताही पुरावा नाही. पण आजपर्यंत याबाबत पुरावे कोणाला सापडले आहेत का?  किंवा तसा प्रयत्न तरी करण्यात आला आहे का?  खरेतर अदानी समुहाची मालकी असलेल्या बंदरात ड्रग्ज सापडले तर अदानी समुह संशयाच्या भोवऱ्यात असायला हवे. पण तसे होतांना दिसत नाही. हीच बाब जर कोणा सर्वसामान्य माणसाच्या घरी ड्रग्ज सापडले असते तर तो आतापर्यंत तुरुंगात असता. मात्र इथे तसे काही होतांना दिसत नाही. केवळ चौकशीचा फार्स सुरु आहे.  भारतात राष्ट्रीय सुरक्षा/देशद्रोहाच्या नावाखाली प्रत्येक विरोधकांवर UAPA/NSA/Narcotics Act लादण्यात आला.. 80 वर्षाच्या वृद्धाला तुरुंगातच मरू दिले गेले पण उपचार दिले गेले नाहीत. असे असताना या बंदराबाबत मात्र केवळ तपास सुरु आहे. यापलिकडे काही होत नाही.  

तालिबानने या बंदरात 21,000 कोटींची औषधे पाठवली. तालिबान "कॅश ऑन डिलिव्हरी" वर ड्रग्ज विकतात का? हा 100% रोखीचा व्यवसाय आहे. म्हणजे पैसे दिले गेले आहेत. तालिबानने भारतातील इतर बंदरांवर ड्रग्ज का पाठवले नाहीत? केवळ अदानीच्या बंदरातच औषधे का पाठवली गेली?  ड्रग्ज घेऊन जहाज अदानीच्या बंदरावर रवाना झाले होते. गुजरातमध्ये ड्रग्ज सहज कसे आले? 21 हजार कोटींचे ड्रग्ज विकत घेणारे 21 लोकही भारतात नाहीत. आणखी एक शक्यता निर्माण झाली आहे.. मुंद्रा बंदरात यापूर्वीही अमली पदार्थ येत आहेत.. प्रत्येक वेळी बंदरातून ड्रग्ज बाहेर पडतात. 

नोटाबंदीच्या काळात महेश शहा याच्याकडे 13,500 कोटींचा काळा पैसा पकडला. मात्र काळा पैसा आणि महेश शहा दोघेही गायब.  तसाच प्रकार या अदानी समुहाच्या मुद्रा बंदराबाबतही होत आहे.  ड्रग्ज आले ड्रग्ज गेले काही दिवस केवळ सोशल मिडीयावर याची वाच्यता होते. काही ठरावीक प्रसारमाध्यमातूनही याच्या बातम्या दिसतात. मात्र काही दिवसातच प्रकरण गायब. 10 ग्रॅम ड्रग्ज मिळाल्याने बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी माध्यमांनी प्रचंड खळबळ माजवली. मग या सर्व प्रकाराबाबत तेरी भी चूप मेरी भी चूप असे का? असा प्रश्न आज सर्वत्र चर्चेत आहे.

दहशतवादानंतर सध्या जागतिक पातळीवर  ड्रग्ज हे सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे. ड्रग्ज माफियांनी अनेक देशातील तरुणांच्या रक्तात हे विष मिसळवून त्यांना आपल्या नियंत्रणात केले आहे. अफगाणिस्तान, बेलीज, बोलीविया, कोलंबिया, मॅक्सिको, पाकिस्तान, पनामा, पेरू, केनिया, नायझेरिया, आफ्रिका असे देश आज ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. या विषरुपी नशेच्या दलदलीतून तेथील नागरिकांची सुटका करणे हीच सर्वात मोठी समस्या आज तेथील सरकार समोर आहे. एकदा नशेच्या आहारी गेलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढणे कदापि सोपे नसते. त्यामुळे ड्रग्जरुपी विष देशात पसरुच नये यासाठी वेळीच घेतलेली खबरदारी हेच यातून बचावाचे एकमेव प्रभावी उपाय असल्याचे यातील जाणकार मंडळी सांगतात. सहाजिकच भारतात देखील हे विष पसरू नये यासाठी वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे. अन्यथा चित्रपटाच्या पडद्यावरील चेह्रयांना आपला आदर्श मानणारी भारतातील तरुणाई देखील नशेच्या आहारी जाण्याची भीती आजची स्थिती पाहून सर्वच स्तरातून व्यक्त होतेय.  या सर्व प्रकाराला कारणीभूत कोण आहेत याचा शोध घेणे आता गरजेचे आहे.  येणारी पिढी अशा तऱ्हेने बर्बाद करण्याचे षडयंत्र तर सुरू नाही ना? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा.

विकेंडला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईसह काही बड्या शहरातील क्लब व हॉटेल्समध्ये नेहमीच नवनवीन पार्ट्या आयोजित केल्या जातात व त्यात विशेष ऑफर्स देखील देण्यात येतात. त्याच पार्ट्यांमधून रेव्ह पार्टी हा प्रकार समोर आला व श्रींमंतांच्या बिघडलेल्या तरुण वर्गात लोकप्रिय देखील झाला. मात्र शहरात अशा पार्ट्या आयोजित केल्या तर त्याची खबर पोलिसांना मिळायची. त्यामुळे मुंबईसह इतर बडया शहरातील क्लब व मोठ्या हॉटेल व्यवसायिकांनी ह्या पार्ट्या शहराबाहेर असलेल्या ग्रामीण भागात आयोजित करण्यास सुरवात केली. त्यात खंडाळा, इगतपुरी, अलिबाग या ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचे सर्वाधिक आयोजन होतात. तर ठाण्याजवळील येऊरचा परिसर, मुंबई-पुणे एक्प्रेस वे च्या आजुबाजूला असलेली फार्म होऊसेस, समुद्रात जहाजावर आणि कोकणातील फार्म हाऊसेसवर देखील रेव्ह पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. या पार्ट्यांची निमंत्रणे व्हॉट्सअँप ग्रुप वरून कळवली जातात. ही निमंत्रणे खास करून क्लब मेम्बर्सना पाठवली जातात. अशा क्लबच्या मेम्बर्स मध्ये बॉलिवूड सेलेब्रिटीज, हाय फ्रॉफाईल कॉल गर्ल, ड्रग्ज माफिया, दलाल यांचा मोठया प्रमाणात समावेश असतो.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1