Top Post Ad

सामाजिक चळवळीचा धगधगता निखारा आण्णाभाऊ साठे


कोणत्याही प्रकारची भाषा शतकानुशतके प्रवास करून, आजच्या स्वरुपात उपलब्ध आहे,आजच्या वर्तमान भाषेबद्दल आपण विचार करत आहेत. ती पुढील प्रवास कसा करील, ही कल्पनाही आनाठायी, आहे, भाषा प्रथम तिच्या प्राकृत भाषेत बीजारोपण करत करत मूळ धरणाच्या अवस्थेकडे सरकते, त्याअर्थी आपल्या मराठी भाषेचा सम्यक दृष्टीने विचार केला तर, मराठी भाषेचा प्रवास, प्राकृत, पाली, आणि मराठी, असा झाल्याचा अंदाज आहे. कोणत्याही प्रकारची भाषा विविध भाषांचा आणि विविध शब्दाच्या अपभ्रंश शब्दाचा समुच्चय आहे. या भाषेत पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासून, मराठी भाषेचा ध्वनी निर्माण झाला आणि तो विविध प्रकारे, महाराष्ट्रातील विविध भागात जनमानसात रांगड्या स्वरूपात उदगारीत होऊ लागला. त्याआधारे, मराठी माणसाचे सांस्कृतिक संचित निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कोणत्याही प्रकारच्या भाषेचा प्रतिध्वनी पहिल्यांदा, काव्यात्मक अवस्थेत जन्म घेतो. अकराव्या शतकात मराठी भाषेचा समृद्धी काळ सुरू झाला असे म्हणायला वाव आहे. लीळाचरित्र सारखे प्रथम क्रमांकावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. 

अकराव्या शतकात मराठी भाषेचा सुवर्ण काळ सुरू झाला, मराठी भाषेत संतसाहित्याची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून, त्याबरोबर, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, हे महत्त्वाचे संत, भक्ती मार्गाच्या निमित्ताने मराठी भाषेची कुस अधिक समृद्ध करु लागले.

संत तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत मराठी भाषेचा दर्जा आणखी समृद्ध झाला होता. रामायण आणि महाभारतातील, कथा जनमानसातील मनाचा ठाव घेत होत्या, असा काही शतके भाषेचा वापर केला जात होता, म. फुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीत साहित्यात सामाजिक परिवर्तनवादी चळवळीच्या साहित्याचा आवाज दर वळू लागला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीने सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचा, कळस गाठला, आणि अनेक लेखक परिवर्तनवादी दृष्टीने विचार करत लिहू लागले. 

आण्णाभाऊ साठे, बाबूराव बागूल, शंकरराव खरात, यांच्या माध्यमातून दबलेला वंचित, माणसाची अभिव्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली.

आण्णाभाऊ साठे, यांचा जन्म १९२० साली, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला होता. सामाजिक व्यवस्थेने, उपेक्षित ठेवलेल्या मातंग समाजात आण्णाभाऊ साठे जन्माला आले होते, आण्णाभाऊ साठे यांच्या वडीलांचे नाव भाऊराव होते तर आई चे नाव वालुबाई होते. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू शंकर साठे होते. आण्णाभाऊ साठे यांनी दोन विवाह केले होते, पहिल्या पत्नी चे नाव कोंडाबाई, तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता होते, या नावाने त्यांनी सुप्रसिद्ध कांदबरी लिहिली होती. आण्णाभाऊ साठे यांना तीन अपत्य होते, मुलगा, मधुकर, आणि मुली, शांता, शंकुतला, असे होते. आण्णाभाऊ साठे हे त्यांचे टोपणनाव होते, त्यांचे खरे नाव, तुकाराम साठे होते. आण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण दीड दिवसाचे होते, तरीही कठोर परिश्रम घेतले आणि अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले होते. मोजकेच शिक्षण घेतलेले आण्णाभाऊ साठे, आपले वडील भावराव यांच्या सोबत मुंबई येथे आले होते. इथे आल्यावर त्यांनी अनेक कष्टकरी कामे केली होती.

आण्णाभाऊ साठे यांनी, आपल्या जीवनकाळात विविध प्रकारचे लेखन केले होते, त्यांनी एकूण २१कथासंग्रह आणि ३० कादंबरी लिहिल्या आहेत. 

मराठी साहित्यातील वगनाट्य, पोवाडे,गीते, कविता, तमाशा या प्रतिक्रियेवर क्रांतिकारक बदल घडवून आणले होते. तात्कालिक सामाजिक व्यंगावर आपल्या लेखणीच्या आधाराने, प्रज्ञा पूर्वक ताशेरे ओढले होते. आपल्या कथा कादंबरी तून एकमेकांशी असणारे वैर संपविण्याचा संदेश दिला आहे. महाराष्ट्रातील तमाशाला, सांस्कृतिक वारसा मिळवून दिला आहे. वैजयंता ही कादंबरी लिहिली, त्यात तमाशातील महिलांची पिळवणूक, या बाबतीत आवाज उठवला होता. ब्रिटिश सरकारच्या काळात, भिषण दुष्काळात गोरगरिबांना, लूटमार करून आणलेला माल वाटून देणारा, फकिरा कादंबरी लिहिली होती, ती कादंबरी सरकारी पुरस्काराने गौरविण्यात आली होती. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत, आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे. 

आण्णाभाऊ साठे म्हणजे, जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाणारा परिवर्तनवादी साहित्याचा धगधगता निखारा आहे, आण्णाभाऊ साठे यांनी साहित्य निर्मिती का केली, तर त्यांच्या तील अंगभूत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रागतिक समाजाची संकल्पना, सामाजिक परिवर्तनवादी बदलाची दुर्दम्य इच्छाशक्ती, चळवळ आणि आंदोलनातून मानवी मनात आग पेटवणारा धगधगता निखारा. मराठी भाषेला आणि मराठी साहित्याला दिलेली भाषा समृद्धी ची शिदोरी अलौकिक प्रतिभेची आहे. पुढील काळात नव्याने येणाऱ्या सुशिक्षित पिढ्या आण्णाभाऊ साठे यांचे परिक्षण आणि अवलोकन करतील तेव्हा हा लखलखीत हिरा अधिक तेजाळून निघेल यात शंका नाही. 

विश्वास पाटील, यांनी लिहिलेले, अलिकडील, आण्णाभाऊ साठे यांच्या वरील पुस्तक, आण्णाभाऊ ची दर्दभरी दास्तान, हा, ग्रंथ काही काळ मराठी साहित्यातील माईल्स स्टोन ठरेल.

आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध प्रकारच्या चर्चा सुरू होतील आपसूकच परंतु आण्णाभाऊ साठे हे कोणत्याही इझम मध्ये मावणारा साहित्यिक नाही. समग्र मराठी भाषेचा आणि साहित्य कृतीचा सांस्कृतिक आवाका आपल्या साहित्यात अधिष्ठान प्राप्त करून ठेवला आहे. आण्णाभाऊ साठे जातीत नाही तर जातीच्या बाहेर पडून क्रांती घडवून आणणारा थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ विनम्रपणे अभिवादन...


अरुण वाघ.. ९२२३२०३५४५


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com