आषाढ पौर्णिमा - गुरु पौर्णिमा

 गृहत्याग केल्यावर वेगवेगळ्या गुरुंच्या आश्रमात ज्ञान संपादन केल्यावर वयाच्या ३५ व्या वर्षी इ. स. पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गया येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर सात आठवडे तथागत सम्यक सम्बुद्ध आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आनंद घेत होते. आठव्या आठवड्यात हे ज्ञान कोणाला द्यावे? आपल्या धम्माचा पहिला उपदेश कोणाला देऊ ?' असा विचार त्यांच्या मनात आला. भगवान बुद्धांना आलारकालामांची आठवण झाली. ते विद्वान, शहाणे, बुद्धिमान आहेत. त्यांना धम्म उपदेश करावा, असे त्यांनी ठरविले. परंतु ते मृत्यू पावले होते, असे त्यांना समजले. नंतर उदकरामपुत्त याला शिकवावे असे योजिले. परंतु तोही मृत्यू पावला होता. 

त्यानंतर त्यांना आपल्या पाच मित्रांची आठवण झाली. कौंडिण्य, वप्प, महानाम, भद्दीय, आणि अश्वजित अशी पाच परिव्राजकांची नावे आहेत. त्यांनी आपली तप काळात फार सोय केली आहे. मी माझा पहिला उपदेश त्यांना का देऊ नये ? असा विचार केला. त्यांची चौकशी केली असता ते सारनाथ येथे मृगदायवन ऋषीपत्तन येथे आहेत, असे समजले. तथागत तात्काळ तिकडे निघाले. त्या पांच परिव्रजकांनी दुरून भगवंतांना पाहिले आणि ते ढोंगी आहेत, आपण त्यांचा आदर सत्कार करायचा नाही, असा विचार त्यांनी केला. परंतु जसजसे भगवान बुद्ध जवळ आले, तसे त्यांच्यापैकी एकजण उठला आणि त्यांचे भिक्षापात्र घेतले. एकाने चीवर घेतले, एकाने आसन तयार केले, एकाने पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि पाचही जणांनी त्यांना वंदन केले. त्यांनी एकमेकांची खुशाली विचारली. तथागताने आपली ओळख करुन दिली व आपणास ज्ञान प्राप्ती झाली आहे, असे सांगून त्या पाच परिव्राजकांना आपल्या धम्माचा उपदेश केला व धम्मचक्र प्रवर्तित केले. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. या पौर्णिमेला सारनाथ येथे आपला धम्म उपदेश करून जीवनमार्ग जन्माला घातला. त्या दिनाला धम्म चक्क पवत्तनदिन म्हटले जाते. त्याच दिवशी पंचवर्गीय भिक्खूंनी तथागतांना गुरुस्थानी मानले. आणि तो दिवस गुरुपौर्णिमा म्हणून उदयास आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे त्याचे इतर धर्मियांकडून अनुकरण करून त्यामध्ये आपआपल्या परीने कथा निर्माण करण्यात आल्या. मात्र मुळ गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेचे बुद्धधम्मातले स्थान अबाधित आहे.

याच दिवशी भगवान बुद्धांनी भिक्षुंसाठी पावसाळ्याचे तीन महिने त्रास होऊ नये यासाठीच वर्षावास जाहीर केला. भिक्षूने तीन महिने कुठेतरी विहारात, चैत्यस्तूपात आपला वर्षावास करावा. स्थानिक उपासक- उपासिकांना धम्म उपदेश करावा. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास, निवारा.  भगवान बुद्धाने आपला पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपत्तन येथेच केला. त्यांनी आपल्या जीवनात एकूण ४६ वर्षावास केले. शेवटचा वर्षावास वैशाली येथे केला. याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी साठ भिक्षुंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली . अशा कारणांनी  आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे. जगात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  

धम्म चक्र परिवर्तन सुत्राची शिकवण प्राप्त करून झाल्यानंतर कौंटिण्य हे भिक्खु हे पहिले अरहंत झाले. ज्या जागेवर गौतम बुद्ध यांनी मनुष्य जातीला प्रथमत धम्म शिकविला होता त्याच जागेवर धम्यक स्तुपची उभारणी देखील करण्यात आली आहे.  आषाढ पौर्णिमेलाच गौतम बुद्ध यांनी त्यांचे वय २९ असताना परीवर्ज्या घेतली होती.आपल्या घराचा त्याग केला.ज्याला महाभिनिष्क्रमण असे संबोधित केले जाते.  आषाढ पौर्णिमेलाच गौतम बुद्ध यांनी सारीपुत्रास अधिधम्म शिकविण्यास आरंभ केला होता.म्हणुन अनेक बौदध देशांत याचदिवशी अधिधम्म शिकविण्यास आरंभ केला जात असतो. आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी पहिल्या बुदध संगीतीचा राजगृह येथे आरंभ झाला होता

गुरू अणि शिष्य या दोघांचे नाते खुप पवित्र असते.असे म्हटले जाते की जर आपणास जीवनात खुप यशस्वी व्हायचे असेल तर आपण एक चांगल्या गुरूचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे आहे. गुरू,शिक्षक हा तो व्यक्ती असतो जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्या प्रत्येक शिष्याला यशाच्या उंच डोंगरावर घेऊन जात असतो.अणि आपल्या शिष्याला जीवनात खुप यशस्वी झालेले पाहुन गुरूची मान अभिमानाने उंचावली जात असते.  गुरूचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असते.अणि असे म्हटले देखील जाते की गुरूशिवाय ज्ञान नाही.गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो. गुरूच तो व्यक्ती आहे जो आपल्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश देतो. म्हणुन आपल्या जीवनाला एक योग्य आकार दिशा प्राप्त करून देणारया गुरूविषयी कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे मनापासुन आभार मानण्यासाठी त्यांच्या समर्पणाचे कौतुक करण्यासाठी आपण दरवर्षी गुरू पौर्णिमा साजरी करत असतो.

असे म्हणतात की आपली पहिली गुरू आपली आई असते वडील असतात कारण आईच तिच्या गर्भात वाढत असताना आपल्यावर चांगले संस्कार करत असते. ह्या जगात आपण जन्माला आल्यावर आपल्यास आपले आईवडीलच आपणास चांगले काय वाईट काय याचे ज्ञान देत असतात.आपल्यावर उत्तम संस्कार करत असतात.आपले पालन पोषण करत असतात. मग हळुहळु आपण जसे मोठे होतो आपण शाळेत जाऊ लागतो शिक्षण करू लागतो तेव्हा तिथे शिक्षकाच्या रूपात आपल्याला आपला दुसरा गुरू मिळत असतो. जो आपल्याला साक्षर अणि सामर्थ्यवान ज्ञानसंपन्न बनवित असतो.अणि आपणास एक कतृत्ववान अणि कर्तबगार व्यक्ती बनवित असतो. 

आपला तिसरा गुरू असतो आपले जीवनातील अनुभव जे आपल्याला जसजसे आपण मोठे होते तसतसे रोज काही ना काही शिकवत असतात. गुरुपौर्णिमा ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते. आजवर मानव ज्यापासून अनभिज्ञ होता, त्या श्रेष्ठत्वाच्या आणि मुक्तीच्या शक्यतेला ती प्रकाशात आणते. तुमचा जन्म कोणत्या वंशात झाला, तुमचा जन्मदाता कोण आहे किंवा जन्मतःच अथवा नंतर तुमच्यात कोणत्या कमतरता किंवा दोष आहेत यांनी काहीच फरक पडत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही अलौकिक झेप घेऊ शकता. मानवजातीच्या इतिहासात मानवाला हे प्रथमच आकळलं आणि त्यानं घोषित केलं की, सजगतापूर्वक उत्क्रान्त आणि उन्नत होणं शक्य आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA