Top Post Ad

बाळ गंगाधर टिळकांचे स्वराज्य


तेली - तांबोळी - कुणबटानां विधी मंडळात जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ?
चांभारांना विधी मंडळात जाऊन काय चपला शिवायच्या आहेत का ?
मी शेंगा खाल्ल्या नाही  म्हणुन मी टरफले उचलणार नाही.
ह्या टिळकांच्या वक्तव्याशी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही.. 

तेली , तांबोळी आणि कुणबटांना विधीमंडळात जाउन काय नांगर हाकायचाय काय?, चांभारांना विधी मंडळात जाऊन काय चपला शिवायच आहे का ? ह्या टिळकांच्या अथनी येथील जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याबद्दल टिळक समर्थकांनी आमच्याशी चर्चा करावी...

अथनीच्या सभेत असे  बोलणारे टिळक पंढरपुरला गाडगेबाबांच्या तावडीत सापडतात आणि पुरते घेरले जातात.. ते टिळकांना म्हणतात "  टिळक महाराज , म्या चुकलो ...आम्ही धोबी समाजाची लोकं ! हजारो वर्षापासुन तुमच्या लोकांची कापड धुण्याचं काम करत होतो.. आता लोकांना मार्गदर्शन करायला लागलो , म्या चुकलो ! आमची जात सुटली टिळक महाराज , आम्हाला बी तुमच्यासारखं बामन करा " !  एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांच्या ह्या बोलण्याचा अर्थ आजच्या आमच्या पाच पाच आकडी पगार कमावणार्यांना सुद्धा समजणार नाही . 

         " स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच " ( क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचं चोरलेलं वाक्य ) ...एव्हढच टिळकांच स्वराज्याविषयीचं वाक्य आम्हाला सांगण्यात आणि शिकवण्यात आलं . यवतमाळ , अकोला , भुसावळ येथे झालेल्या जाहिर सभांत टिळक त्यांच्या खऱ्या स्वराज्याचा अर्थ सांगतात . ते म्हणतात  "माझ्या स्वराज्याचा अर्थ असा होत नाही कि इंग्रजांनी भारत सोडुन निघुन जावे . प्राचिन काळात राजषकट ( राज्यकारभार ) चालवण्यासाठी राजे लोक शिकलेल्या ब्राह्मणांना प्रशासनात घेउन राज्यकारभार करत होते . जर इंग्रज आजच्या शिकलेल्या ब्राह्मणांना प्रशासनात घेत असतिल तर इंग्रजाना भारत सोडुन जायची मुळीच आवश्यकता नाही . इंग्रजांचा राजा आमचाही राजा असेल , इंग्रजांचा सम्राट आमचाही सम्राट असेल. इंग्रजाना भारत सोडुन जायची अजिबात आवश्यकता नाही "

       आता आमचं असं म्हणण  आहे कि " स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मि मिळवणारच " हा इतिहास तुम्ही आमच्या मुलांना शिकवता . जर तो इतिहास आहे , तर मग  "तेली ताम्बोळी आणी कुणबटांना विधिमंडळात जाउन काय नांगर हाकायचाय काय?" चांभारांना विधी मंडळात जाऊन काय चपला शिवायच्या आहेत का ? हा सुद्धा इतिहास आहे ,  हा इतिहास सुद्धा शिकवा ! दोन्ही इतिहास शिकवा ! आमची मुलं हुशार आहेत ...ते योग्य निर्णय घेतिल कि टिळकांची शुद्धी स्वर्ण योनितुन करावी कि गटारीच्या पाण्याने करावी ?? 

        ज्यांनी आम्हा बहुजन मराठा ओबिसीना हक्क अधिकार नाकारले , कुणबट म्हणुन शिवी दिली आज आम्ही मराठा ओबिसी ह्याच टिळक , गांधी , नेहरुंचा सर्वात जास्त जयजयकार करत आहोत . जर टिळक लोकमान्य होते तर मग मराठा- कुणबी ओबिसींना हक्क अधिकार का नाकारत होते ? जर गांधी महात्मा होते तर मग का ओबिसी, एस सी , एस टी ला अधिकार का नाकारत होते ? जर नेहरु आमचे " चाचा " होते  , तर का चाच्च्याने ओबिसींचा आरक्षणाचा अहवाल , जो बाबासाहेबान्नी 26 सप्टेंबर 1951 ला संविधान सभेवर ठेवला होता , त्याला कचरा कुंडीत फेकुन दिला ? ज्यांनी आमचा पुरता सत्यानाश केला , आजही ह्याच  त्रिकुटाच्या नावाने सर्वात जास्त टाळ्या वाजवणारे आम्हीच ते कपाळकरंटे आहोत ! 

डाॅ. निशांत पाटिल यांच्या wall वरुन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com