दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती आणि पुरोगामी विद्यार्थी संघटना
दि, १५ जुलै,
शहिद लोक शाहीर विलास घोगरे व कवी मनोहर वाकोडे स्मृती दिनी,
कविता वाचन व शाहिरी जलसा!
घाटकोपर रमाबाई नगरातील अमानुष पोलीस गोळीबारात १० दलित शहिद झाले होते. त्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता व लोकशाहीर विलास घोगरे याने आत्म बलिदान करून स्वतः ला १५ जुलै रोजी संपविले होते, त्या बलिदानाचे हे २५ वे वर्ष आहे. तसेच पुरोगामी सांस्कृतिक चळवळीतील कवी, नाटककार मनोहर वाकोडे यांचाही १६ जुलै हा स्मृती दिन आहे.
वरील दोन्ही कलावंतांचा संयुक्त स्मृती दिन शुक्रवार दि १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. मुंबईतील आंबेडकरी, पुरोगामी, समतावादी, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते साजरा करणार आहेत.
या संयुक्त स्मृती दिनी वरील दोन्ही कलावंतांची गाणी, शाहिरी व कविता आणि आठवणींचा जागर! असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये मुंबईतील नामवंत शाहीर, कलावंत, कवी आणि विलास घोगरे व मनोहर वाकोडे यांचे जिवलग मित्र/ मैत्रिणी सहभागी होणार आहेत.
शेतकरी कामगार भवन, तिसरा माळा, विवेकानंद गार्डन मागे, माहिम काॅजवे, माहिम पश्चिम, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती, महाराष्ट्र तर्फे सुबोध मोरे, डॉ.श्रीधर पवार,सुनील कदम,सुमेध जाधव,अरूण कांबळे यांनी केले आहे.
संपर्क: सुबोध मोरे (९८१९९९६०२९), सुनील कदम ( ८३६९९८२८६१)
0 टिप्पण्या