Top Post Ad

हा तर राष्ट्रचिन्ह अर्थात अशोकस्तंभाचा अवमान


नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे नुकतेच  अनावरण करण्यात आलं. मात्र, अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय याच भावमुद्रेवरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावर देखील याबाबत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
 तृणमूल काँग्रसचे खासदार जवाहर सरकार  यांनी म्हटलं की, देशाचं राष्ट्रीय चिन्ह असलेल्या भव्य अशोकस्तंभाचा अवमान करण्यात आला आहे. त्यांनी ट्विटर एक फोटो शेअर केला असून त्यात आधीचा आणि नवीन अशोकस्तंभ दिसत आहे. ते पुढं म्हणतात की, मूळ डावीकडे आहे, जो की सुंदर, आत्मविश्वासाने उभा आहे. उजवीकडे मोदींनी अनावर केलेल्या अशोकस्तंभ आहे, जो की तिरस्कार, अनावश्यकपणे आक्रमक आणि विषम वाटतो. ट्विटमध्ये सरकार यांनी अशोकस्तंभ तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

 आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, 'जुन्या अशोकस्तंभात सिंह गंभीर मुद्रेत आणि जबाबदार शासकासारखा दिसतोय तर, दुसर्‍यामध्ये (संसदेच्या इमारतीवर) तो मनुष्यभक्ष्य शासकाच्या भूमिकेत भीती पसरवण्यासारखा दिसत आहे. 

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील सिंहाच्या भावमुद्रेवरुन निशाणा साधला आहे. 'भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेले चार वाघ हे शांत, संयमी आणि चारही बाजूने लक्ष ठेवणारे आहेत, त्याखाली 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य मंडूक उपनिषदेमधून घेतलेलं आहे. सत्य, प्रेम, अहिंसा, शांती, विश्वास, प्रतीके हे देशाचा स्वभावमन ठरवते, समाजाच स्वभावमन ठरवतं

अशोक स्तंभातील चार सिंह स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून प्रसिद्ध आहे. पण आज ज्या राष्ट्रीय चिन्हाच्या नावाने प्रधानमंत्र्यांनी चार सिंहांच्या चिन्हाचे उद्घाटन केले आहे, त्याचे सिंह आणि अशोक स्तंभ सारनाथच्या सिंहांपेक्षा वेगळे दिसत आहेत. सिंहांची शरीरे देखील मूळ स्तंभाच्या सिंहांपेक्षा भिन्न आणि आकारहीन असतात, तसेच त्यांची तोंडे अधिक उघडी असतात. मूळ स्तंभाचे सिंह जे मोठेपण, भव्यता आणि सिंहावलोकन कोणत्याही कारणाशिवाय लोकांचे लक्ष वेधून घेतात, ते या नव्याने तयार केलेल्या चिन्हात नाही. एकतर हे चिन्ह दगडात आहे किंवा पितळेत आहे असे सांगितले जात आहे, मग ज्या शिल्पकाराने हे शिल्प साकारले आहे, त्यांना अशोकस्तंभ सारनाथच्या चार सिंहांचा अर्थ समजू शकला नाही किंवा ते या मूर्तीमध्ये ठेवू शकले नाहीत. शिल्पकला म्हणजे केवळ दगड, कांस्य किंवा कोणत्याही धातूचे कोरीव काम किंवा शिल्प करणे नव्हे. 

उलट त्याचा अर्थ एक प्रकारे प्रतिमेत जीव ओतणे असाही होतो. सारनाथ संग्रहालयाला भेट दिलेल्यांना हे चांगलेच माहीत आहे की, संग्रहालयाच्या मुख्य दालनाच्या मध्यभागी असलेला भव्य चार सिंहस्तंभ केवळ त्याच्या उल्लेखनीय पॉलिशसाठीच नाही तर त्याच्या भव्यतेसाठी, राजेपणासाठी, प्रतिष्ठेसाठी प्रसिद्ध आहे. शिल्पकला. हे देखील एक अद्भुत उदाहरण आहे. तसेच, आता, ते देशाचे मुख्य प्रतीक देखील आहेत. राष्ट्रीय चिन्ह जसे आहे तसे वाहून नेले पाहिजे, जसे संविधानाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय चिन्हाचे स्वरूप, हावभाव आणि प्रमाणातील कोणताही फेरफार हा त्याचा विच्छेद आहे आणि राष्ट्रीय चिन्हाचे विटंबन हा देखील दंडनीय गुन्हा आहे.

प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलेले कांस्याने बनवलेल्या या चिन्हाचे वजन 9, 500 किलो आहे आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे, याला सपोर्ट देण्यासाठी सुमारे 6,500 किलो स्टीलची रचना तयार करण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्ह बसवण्याचे काम आठ वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. यामध्ये चिकणमातीपासून मॉडेल बनवणे, संगणक ग्राफिक्स तयार करणे आणि कांस्य आकृत्या पॉलिश करणे समाविष्ट आहे. हे चिन्ह उभारण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या छताच्या मध्यभागी ते बसवण्यात आले आहे. कॉन्सेप्ट स्केच, क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स अशा एकूण 8 फेऱ्यांमध्ये ते तयार करण्यात आले आहे. हे चिन्ह एकूण 150 भागांमध्ये तयार करण्यात आले होते. ते एकत्र केले गेले आणि छतावर नेल्यानंतर स्थापित केले गेले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याला सुमारे दोन महिने लागले आहेत. मात्र मुळ अशोकस्तंभाच्या विपरीत दिसणारे हे चिन्ह राष्ट्रीय प्रतिक म्हणून जनमानसावर थोपवण्याचा प्रयत्न होत आहे. 
------------------------
राष्ट्रप्रतिकाची अवहेलना वाचा -  https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=574171714330267


 • आम्हा महाराष्ट्रातील शिल्पकारांच्या उन्नतीसाठी सुरू केलेला एक व्हॉटसअॅप ग्रुप आहे. त्यावर शिल्पकार सुनील देवरेसुद्धा आहेत. त्यांना मी राजचिन्हच्या शिल्पाबाबत काही प्रश्न विचारले होते.
 • सारनाथच्या मूळ शिल्पाची रेप्लिका बनवायची होती की सिंह करण्यासाठी काही फ्रीडम दिलं होतं?
 • शिल्पकार सुनील देवरे सरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे की त्यांनी सारनाथ येथे सापडलेल्या स्तंभशीर्षाची रेप्लिका बनवली आहे. किंवा तेच शिल्प मुख्य रेफरन्स आहे.
 • कोणतेही आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स किंवा शिल्पस्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न केलेला नाही
 • आता मुख्य आक्षेप
 • मुख्य शिल्पाचे डोळे मोठे असून ते नाकपुडीच्या अगदी थोड्या वरच्या रेषेपर्यंत आहेत. नव्या शिल्पात रागीट भावामुळे भुवया आक्रसल्या आहेत त्यामुळे कपाळाच्या मधोमध पडलेल्या वळ्या या मुख शिल्पात कुठेही नाहीत.
 • एकूण मुख्य शिल्पाची सिमेट्रीकल आयाळ असून ती एखाद्या पॅटर्न प्रमाणे कोरलेली आहे अगदी जे नव्या शिल्पात रियलिस्टिक करण्याचा प्रयत्न वाटतो
 • जेंव्हा तुम्ही शिल्पाचा आकार अतिभव्य बनवता तेंव्हा पर्सपेक्टिव्हनुसार हेड मोठं करावं लागतं. पण इथे ते आहे त्याच्यापेक्षा पण लहान झालंय.
 • डोक्याच्या दोन्ही बाजूला भरपूर आयाळ नसून पण भरपूर प्रमाणात आयाळ दाखलेली आहे जी पार पायापर्यंत वाढलेली आहे.
 • सारनाथचं स्तंभशीर्ष त्याच्या झिलईसाठी प्रसिद्ध आहे. मग ते मातीकामात तर सहज शक्य होतं. (मेटल कास्टिंग करताना तो परिणाम आला नाही तरी ते घासून बफिंग करू शकतो)
 • शिल्पाचे वेगवेगळे भाग जोडलेले एवढे स्पष्ट दिसत आहेत की ते घासून लेव्हल करण्याचे कष्ट ही घेतले नाहीत. हे खटकलं नाही का शिल्पकाराला आणि ते काम अप्रुव करणाऱ्या टीमला?
 • पायावर एवढ्या घोड्यासारख्या शीरा दाखवण्याचं नेमकं प्रयोजन काय?
 • खालचे घोडा आणि बैल (हत्ती आणि सिंह पलीकडल्या बाजूला आहेत) हे ज्या पद्धतीने मुख्य शिल्पात कोरले आहेत त्यासारखे नव्या शिल्पात अजिबात दिसत नाहीत. बैलाचा पुढच्या दोन पायांपैकी एक सरळ आणि एक हवेत का आहे? त्याचे खुर असे जाडे भरडे का केले आहेत हे न कळणारे आहे
 • (मुख्य शिल्पात किती व्यवस्थित खाली टेकलेला पाय आहे.) या साध्या गोष्टी एक शिल्पकार म्हणून लगेच नजरेत भरतात.
 • खरंतर मातीकामातच एवढे दोष आहेत की ते यावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने अप्रुव्ह कसे केले हे कोडं आहे.
 • आपलं राजचिन्ह जसं असायला हवं तसं ते झालं आहे का?
 • अजिबात नाही.
 • एखाद्या गणपतीच्या सिंहासनाचा सिंह करावा तसा काहीसा तो सिंह मला स्वतःला वाटतो. अशोक स्तंभावरचा सिंह नक्कीच नाही.
 • ज्या शिल्पकामाचा आदर्श सांगितला गेला पाहिजे ते कामंच सदोष असेल तर आपण भारतीय, शिल्पकलेचा नेमका काय वारसा सांगणार आहोत?
 • राजकीय लोकांना त्या आडून मोदींवर टीका करायची असेल किंवा अजून काही, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. जे स्पष्ट दिसतं आहे ते बोलायला हवं.
 • कारण शेवटी हा चौकातल्या एखाद्या शिल्पाचा विषय नसून संसदेवर लागणाऱ्या राजचिन्हाचा थोडक्यात देशाचा विषय आहे.
 • (हे आक्षेप घेतल्यावर सकाळपासून अनेक ज्येष्ठ शिल्पकारांचे आणि शिक्षकांचे मला फोन आले. त्यांनी तर हे शिल्प तिथे लागण्याच्या ताकदीचं आणि लायकीचं नाही. ते खरंतर उतरवून नवं बसवणं गरजेचं आहे इथवर मतप्रदर्शन केलं आहे)
--- भूषण वैद्यटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com