
वृत्तवाहिनीवर मुलाखतीत बाळासाहेबांना भाजप व हिंदुत्व याबद्दल प्रश्न विचारला गेला तेंव्हा बाळासाहेबांचे वक्तव्य होते, माझा आणि त्यांचा हिंदुत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी कधीच हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत नाही... मी फक्त आणि फक्त देशाचा विचार करून हिंदुत्वाचा विचार मांडत असतो. ? तुम्ही भाजपच्या लोकांशी सध्या जवळीक साधून आहात का? 'Close' आहात का? बाळासाहेब : राजकारणात कोण कोणाच्या जवळ नसत. Close म्हणजे काय असतं?? इंग्रजीत Close चा अजून एक अर्थ होतो तो म्हणजे "Close the door". ? तुम्ही विचारधारेनुसार भाजपच्या जवळ आहात...? बाळासाहेब : या सध्या असलेल्या पिढी सोबत नाही, जेव्हा अडवाणी होते, वाजपेयी होते तेव्हा होतो....विचारधारेनुसार तुम्ही आताही भाजप सोबत आहात का?? बाळासाहेब : हल्लीचे पक्ष राजकारणात विचारधारेला किंमत देत नाहीत...? येणाऱ्या काळात शिवसेना भाजप सोबत राहणार का??बाळासाहेब : सध्या भाजपमध्ये नवीन पिढी कार्यरत आहे म्हणून हा प्रश्न मला नाही, उद्धवना विचारले तर ते देतील उत्तर की ते तयार आहेत का त्यांच्या हातात हात टाकून चालायला.....
अजुन एक महत्त्वाचे, वंदनीय बाळासाहेबांना कॉंग्रेसची ॲलर्जी नव्हती, व्यापक राष्ट्रहित, महाराष्ट्रहित नजरेसमोर ठेवुन त्यांच्या काळातही शिवसेना-काँग्रेस जवळीक साधली गेली होती. बाळासाहेबांनी जहरी टीका केली कारण भूमिकेत भिन्नता होती. जर त्यांची टीकाच प्रमाण तर राणेना हाकलाल?सुरुवातीच्या काळातील शिवसेना याबद्दल वर्णन करताना 'सत्तासंघर्ष' पुस्तकात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात, "काँग्रेसच्या विविध गटांकडून वा नेत्यांकडून वेळोवेळी शिवसेनेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. सुरुवातीच्या काळात आदिक आणि देसाई शिवसेनेस अनुकुल होते. वसंतराव नाईक यांच्याशी सख्य असल्यामुळे शिवसेनेला एका टप्प्यावर खेळकर टिप्पणीसही सामोरे जावे लागले होते.
1977 साली काँग्रेसचे नेते मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले. विशेष म्हणजे, मुरली देवरा यांना महापौर बनवण्यासाठी शिवसेनेनं, बाळासाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता. सर्व विरोधकांना डावलून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचं बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन केलं होतं. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्यामुळं आणीबाणीच्या निमित्तानंही काँग्रेस-शिवसेना हा धागा भारताच्या राजकीय इतिहासात जुळला होता.1978 मध्ये जनता सरकारनं जेव्हा इंदिरा गांधींना अटक केली, तेव्हा त्याविरोधात शिवसेनेनं बंदही पुकारला होता. जनता दल मध्ये भाजप होते, त्यांना बाळासाहेबांनी पाठिंबा दिला नव्हता.
2007 साली राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित UPAकडून प्रतिभा पाटील; भाजपप्रणित NDA कडून भैरोसिंह शेखावत उमेदवार होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. भाजपने मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते भूमिकेवर ठाम राहिले.2012 साली राष्ट्रपतिपदाची निवडणूक असताना, शिवसेनेची मतं निर्णायक होती. काँग्रेसप्रणित UPAचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे होते. भाजपप्रणित NDA ने संगमा यांना राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीत पाठिंबा दिला. NDAच्या निर्णयापासून वेगळे राहत शिवसेना प्रणवबाबु मुखर्जींच्या पाठीशी उभी राहिली.बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करतं... त्यांच्या भाषेत त्यांनी वेळोवेळी भाजपचा समाचार घेतलेला आहे.
बाळासाहेबांनी शिवसेनेची धुरा उद्धवसाहेबांच्या हाती दिली होती, उद्धवसाहेबांनी ती समर्थपणे पेलली. आज स्वार्थामुळे सुकलेला पालापाचोळा मोठ्या प्रमाणावर गळुन गेला तरी पालवी फुटेल. शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्यांना विनंती, भरलेल्या बॅगा लपवायला असो किंवा रिकाम्या भरायला असो तुमचा मार्ग तुम्हीं निवडला, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्रास मुख्यमंत्री पदावरुन विश्वासघात करुन खाली खेचलेत, शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रु आणलेत. आता अजुन पडु नका. आज डोळ्यात अश्रु आहेत, लवकरच अंगार बरसतील, सरळ उघडपणे भाजपात सामिल व्हा आणि शिवसेना शब्दांपासुन दुर रहा. हे तेज सोसवण्याच आता तुमच्यात बळ उरलेल नाही.भाजपमध्ये जात आहात तर एक पुण्य किमान करा, सध्याच्या नेत्यांना जोशी, अडवाणी, वाजपेयी यांच्या मुल्यांची आठवण करुन द्या.जर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हां गद्दारांच त्यांनी काय केल असतं याचा विचारही करु नका, ते तुम्हांला कल्पनेतही घातक असेल.
- अनघा आचार्य,
0 टिप्पण्या