Top Post Ad

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान


 महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून राजकीय इनिंग सुरू केली आणि संघटनात्मक कौशल्य आणि जनसमर्थन यांच्या बळावर ते शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक झाले. एकेकाळी मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात ऑटोचालक म्हणून काम करणाऱ्या 58 वर्षीय शिंदे यांनी राजकारणात उतरल्यानंतर अल्पावधीतच ठाणे-पालघर विभागातील एक प्रमुख शिवसेना नेते म्हणून आपला ठसा उमटवला. जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. चार वेळा आमदार राहिलेले शिवसेना नेते शिंदे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये नगरविकास आणि PWD खात्याचे मंत्रिपद सांभाळली.

 राज्याच्या राजकारणातील यशाबद्दल त्यांनी पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अनेकदा आभार मानले आहेत. 9 फेब्रुवारी 1964 रोजी जन्मलेल्या शिंदे यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच शिक्षण सोडले आणि राज्यातील उदयोन्मुख शिवसेनेत प्रवेश केला. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याला आपले कार्यक्षेत्र बनवले. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार शिंदे हे रस्त्यावर उतरून राजकारण करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्यावर शस्त्राने हेतुपुरस्सर दुखापत करणे आणि दंगलीसह विविध आरोपांखाली डझनभर गुन्हे दाखल आहेत.  शिंदे 1997 मध्ये ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा आमदार झाले. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, 

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातील एक सीनची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटातील हा सिन आठवत असेल, तर एक नगरसेवक त्याने नवीन कार घेतली म्हणून आनंद दिघे यांना पेढे देण्यासाठी येतो. त्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर इतक्या कमी वेळात गाडी काशी काय घेतली म्हणून आनंद दिघे त्याला बाजूला घेऊन त्याची चांगलीच धुलाई करतात. व त्याला तुम्ही या पदावर पैसे कमवण्यासाठी नाही तर लोकहिताची कामे करण्यासाठी असल्याचं सांगतात. चित्रपटातील याच सिनमुळे आता एकनाथ शिंदे यांची चर्चा आहे. ती म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीची? 

 एकनाथ शिंदे हे सुरुवातीला रिक्षा चालवत होते हे सर्वांना माहित आहे.  त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदापासून आज थेट मंत्री पदापर्यंत प्रवास केला आहे.  2019 साली भरलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची संपत्ती किती आहे याची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे शिंदे यांच्याकडे एकूण सात गाड्या आहेत. यामध्ये आरमाडा या गाडीची किंमत 96 हजार 720 रुपये, त्यांच्याकडे दोन स्कॉर्पिओ कार आहेत त्यांची किंमत 10 लाखांच्या आसपास आहे. तर 34 लाख रुपयांच्या दोन इनोव्हा कार सुद्धा त्यांच्याकडे आहेत. आशा एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 46 लाख 55 हजार रुपयांच्या गाड्या आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे 4 लाख 12 हजार 500 रुपयांचे 110 ग्रॅमचे सोने आहे. तर 21 लाख 75 हजार रुपयांचे 580 ग्रॅमचे सोने आहे. असं दोन्ही मिळून त्यांच्याकडे एकूण 25 लाख 87 हजार 500 रुपयांचे सोने आहे.  एक 2 लाख 50 हजार रुपयांचे एक रिव्हॉल्व्हर तर 2 लाख 25 हजार रुपयांचे एक पिस्तूल सुद्धा आहे. याशिवाय त्यांच्याकडे 7 हजार रुपयांचे फर्निचर, 63 रुपयांचा कम्प्युटर याचं सोबत त्यांचे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यामध्ये साधारण 2 करोडहून अधिक रुपयांची संपत्ती आहे.

एकनाथ शिंदे यांचे ठाणे पश्चिम मध्ये लँडमार्क हौसिंग सोसायटी मध्ये 2 हजार 370 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे दोन फ्लॅट आहेत ज्याची किंमत 9 करोड रुपये इतकी आहे. या दोन प्लेट सोबत त्यांची ठाण्यातील धोत्रे चौक या ठिकाणी असलेल्या व शिवशक्ती भवन रोड वागळे इस्टेट या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 60 लाखांच्या आसपास आहे. यासोबत शिंदे यांचा वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी 600 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचा एक दुकान गाळ देखील आहे ज्याची किंमत तीन लाख रुपये इतकी आहे. अशी त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 45 लाख 50 हजार रुपयांची संपत्ती आहे.  एकनाथ शिंदे यांच्या याच या करोडो रुपयांच्या संपत्तीची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे. एका नगरसेवकाने लोकहिताचे काम न करता गाडी घेतली म्हणून त्याला बेदम मारहाण करणारे आनंद दिघे जर आज असते तर एकनाथ शिंदे यांची ही इतकी अमाप संपत्ती पाहून त्यांनी काय केले असते? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

 एकनाथ शिंदे यांनी २०१४ आणि २०१९ साली निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहने, मालमत्ता आणि शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१९ मधील निवडणुकीत आपल्याकडील वाहनांची किंमत घटवून सांगितली. तसेच शेतजमीन असल्याची बाबही लपवून ठेवली, असे आरोप याचिकेतून करण्यात आले आहेत. अभिजित खेडेकर, डॉ. अभिषेक हरदास आणि समीर शेख यांनी ही याचिका दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये आरमाडा गाडी ८ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या निवडणूक पत्रामध्ये हीच आरमाडा ९६ हजार ७२० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४च्या निवडणूक शपथपत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, २०१९च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात बोलेरो ६ लाख ९६ हजार ३७० रुपयांना, तर तीच गाडी २०१९ च्या शपथपत्रात लाख ८९ हजार ७५० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे.

२०१४ च्या शपथपत्रक्षात एक टेम्पो ९२ हजार २२४ रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या शपथपत्रात तोच टेम्पो त्यांच्या पत्नीने २१ हजार ३६० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात इनोव्हा १७ लाख ७० हजार १५० रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या पत्रामध्ये तीच गाडी त्यांच्या पत्नीने ६ लाख ४२ हजार २३० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असणारी शेतजमीन आणि इमारतीची माहितीही लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. २००९ आणि २०१४ च्या शपथपत्रांमध्ये शिंदे यांनी पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले होते. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिह्यातील चिखलगाव येथे सर्वे नंबर ८४४,८४५ ही जमीन ६ ऑगस्ट २००९ मध्येच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तसेच शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पलीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पलीकडे ठाणे येथील वागळे इस्टेट येथे ००७ प्लॉट नंबर बी ५१ येथे वाणिज्य इमारत २० नोव्हेंबर २००२ रोजीच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रात ही इमारत खरेदी केल्याची माहिती लपविल्याचे स्पष्ट झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com