Top Post Ad

भिमाकोरेगाव आंदोलन ख़टल्यात भीमसैनिकांना 5 वर्ष तुरुंगवास आणि दंड

 भिमाकोरेगाव आंदोलक बचाव संघर्ष समितीचा सर्वतोपरी सहाय्य करण्याचा निर्धार

नांदेड़ हदगाव येथील 26 भीमसैनिकाना भिमाकोरेगाव आंदोलन ख़टल्यात 5 वर्ष शिक्षा,आणि 5 लाख 46 हजार रुपये दंड झाला असुन, सध्या सर्व भीमसैनिक औरंगबाद येथील हरसुल करागृहात आहेत. हरसुल कारागृहात आणल्यापासुन त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात औरंगबाद, नांदेड़, लातूर, हिंगोली, जालना, पुणे येथील सामजिक कार्यकर्ते आणि अटक असलेले भीमसैनिक यांचे नातेवाईक संर्पकात होते. त्याच अनुषंगाने नुकतीच औरंगबाद येथे राज्यभरातून आलेल्या सामजिक कार्यकर्ते वकील मंडळी यांची बैठक झाली. यावेळी ऍड.एन.व्ही.सावते, ऍड.एम.एम.परघने, ऍड.भगवान वेरुळकर, ऍड.सिध्दार्थ गवई, ऍड.प्रवीण वाघमारे आदी वकील मंडळीसह कैलास सोनवणे, गोविंद कांबळे सुमेध घनबहादुर, पांडुरंग तारू, धम्मपाल दांडगे, देवदत्त सूर्यवंशी, गौतम सोनकांबळे संतोष घोडेकर, अशोक कदम, अशोक कांबळे मनोज चक्रे विलास पठारे, पांडुरंग नरवडे, रवी गायकवाड, दीपक डांगरे राहुल लांडगे ऋतिक उघडे राजू दुधाने विशाल भिंगारदिवे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत नांदेड़ येथील 26 भीमसैनिकाना प्रथम प्रधान्यक्रमाने मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना सर्व प्रकारची मदत भिमाकोरेगाव आंदोलक बचाव समितिच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रात दाखल असलेल्या खटल्यासाठी देखील ही समिति लढणार आहे, शासन निर्णयाप्रमाणे गुन्हे मागे घेतले पाहिजेत यासाठी शहर-जिल्हा पातळी पासुन ते मंत्रालया पर्यंत पाठपुरावा समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच औरंगाबाद मधील अनेक वकील मंडळी या 26 भीमसैनिक यांची मुक्तता करण्यासाठी औरंगाबाद न्यायालयात लढत आहेत. त्यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली भिमाकोरेगाव आंदोलनक बचाव समिती काम करत आहे. राज्यातील सर्व आंदोलक भीमसैनिकाना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासन निर्णया प्रमाणे खटले मागे घेण्यासाठी शहर पोलिस आयुक्त आणि जिल्हादण्डाधिकारी यांच्याकड़े अर्ज करावा, त्याचा पाठपुरावा करावा.प्रत्येक महिन्यात शासकीय समितिने बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अहवाल अभियोग संचालनालय आणि राज्य सरकारला दयावा असा शासन निर्णय आहे आणि  औरंगबाद उच्च न्यायालयाचे आदेशही आहेत. याबाबत काही अड़चण असल्यास भिमाकोरेगाव आंदोलक बचाव संघर्ष  समिति कड़े संपर्क साधावा असे आवाहन समितीचे सतिष पट्टेकर यांनी केले आहे.


--------------------------------------------------------

११ जुलै २०२२ रोजी भीमा कोंरेगाव प्रकरणात 27 भीमसैनिकांना 5 वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रु दंड ठोकण्यात आला. गुन्हा काय..? भीमा कोंरेगाव दगंल घडवणाऱ्यांना क्लीनचिट ते दंगलखोर मोकाट फिरत आहेत त्या दंगलीत आंबेडकरी जनतेवर दगड फेकण्यात आले, शिव्या दिल्यात, गाड्या फोडल्यात, परिणामी भीम अनुयायांची तारांबळ उडाली एकच उद्रेक झाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतीकात्मक प्रतिक्रिया उमटली. तामसा तालुक्यातील भीम सैनिकांना हे दृश्य पाहता त्यांचा  राग अणावर झाला आणि फक्त हाती निळा झेंडा घेऊन जय भीम च्या घोषणा दिल्यात प्रतिकार केला तर 5 वर्षाची शिक्षा आणि 20 हजार रु दंड ठोठावण्यात आल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतप्त भावना उमटत आहेत. याबाबत कुठेही बातमी नाही, मीडियाने यावर भ्र सुद्धा काढला नाही, सगळे मूग गिळून चूप बसलेले आहे जणू काही घडलच नाही तब्बल 30 परिवार उध्वस्त झालीत, सगळे मोलमजुरी करणारे भीमसैनिक आहेत 5 वर्षे जेल मध्ये जातील 20 हजार दंड भरतील तर त्यांचा परिवार जगेल कसा. मूल बाळ काय करतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

का आपण एवढे षंढ झालोत कुठे गेला तो भीमा कोरेगाव चा आपला बाणा, कुठे गेला तो भीम चळवळीचा धगधगता कार्यकर्ता कुठे ठेवल्या त्या चळवळीच्या मशाली, कुठे गेली आपल्यातील संवेदनशीलता,ते 27 भीमसैनिक स्वतःसाठी लढले नाहीत तर आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी भीमा कोरेगावची अस्मिता जोपासन्यासाठी लढलेत समाजासाठी लढण्याची इतकी मोठी शिक्षा..आणि आपण गप्पगार बसलेलो आहोत.  कुठे गेलेत आता आमचे दलाल भडवे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते जे दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात आणि स्वतःच्या स्वार्थापोटी जातीयवादी पक्षाचे तळवे चाटतात कुठे गेलेत 

आमचे तथाकथित नेते जे राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेना बीजेपी इतर पक्षाच्या मांडीवर बसून समाजाच नेतृत्व करतात,कुनि आमदार आहेत कुणी मंत्री आहेत कुणी या पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत आता कोणत्या म्हशीच्या जाऊन दडलेत आता या म्हणाव समोर यांना दगडापेक्षा वीट मऊ म्हणाऱ्यांना विचारा जाब..दल्ले कुठले आता भ्र काढणार नाहीत. न्यायव्यस्था तुमच्या हातात,सत्ता तुमच्या हातात, पोलीस प्रशासन तुमच्या हातात, वकील ही तुमचेच आणि जज ही तुमचेच आम्हाला न्याय मिळेल कसा..आम्ही तर नेतृत्वहीन होऊन जगत आहोत ना आमच सामाजिक संघटन,ना आमच राजकीय वलय,ना आर्थिक  वलय,ना शैक्षणिक, त्याचाच फायदा घेऊन तुम्ही नेहमी आम्हाला वेठीस धरता..

पण या व्यवस्थेला उरून उरु इतकी ताकद आमच्यात आहे,पण आम्हाला न्याय संविधानिक मार्गाने पाहिजे. जागे व्हा आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे,या देशातील व्यवस्था ही जनसामान्यांच्या जिवावर उठली आहे..आपल्याला निर्दोष लोकांचा नाहक बळी जाऊ द्यायचा नाही.या घटनेचा प्रत्येक स्तरावर विरोध झाल्यापाहीजे जेणेकरून या सरकारला जाग येईल. या व्यवस्थेला आपल्यातील दलाल भडवे नेते जबाबदार आहेत जे स्वतःच्या स्वार्थापोटी नेहमी समाजाला विकण्याच काम करतात आणि आपल्या पोळ्या शेकतात,आणि आपल्यातले काही बैलबुद्धि त्या विकलेल्या नेत्यामागे लाळ चाटत फिरतात..

श्रीकांत गौरखेडे
काटोल तालुका (समता सैनिक दल मुख्यालय दिक्षाभूमी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com