Top Post Ad

भर बाजारपेठेत धोकादायक बांधकाम

केवळ लोखंडी बीमवर उभे असलेल्या गुप्ताच्या बांधकामावर कारवाई कधी

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाण्यातील अनेक बांधकामांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात कळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये अनधिकृत आणि वाढीव बांधकामांवर प्रचंड कारवाई करण्यात आली. मात्र नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील जवाहर बाग लगत असलेल्या बाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामांवर अद्यापही कोणती कारवाई का होत नाही असा सवाल येथील बाजारपेठेमधील व्यापारी करत आहेत.
 
ठाणे जवाहरबाग जवळील मच्छीमार्केटच्या बाजुला भोईर देशी बारच्या लगत लोखंडी (आय बिंम)च्या सहाय्याने तळ मजला अधिक एक मजल्याचे बांधकाम.  खाली व्यावसायिक गाळे आणि वरती रहाण्यासाठी करण्यात आले. हे संपूर्ण बांधकाम केवळ लोडबेअरींगवर करण्यात आले आहे. त्यातच मागील काही दिवसात याच बांधकामावर पुन्हा लोड बेअरिंगच्या सहाय्याने आणखी एक माळा वाढवण्याचे काम सुरु झाले.  हे बांधकाम धोकादायक असून ते कधीही कोसळू शकते. त्यामुळे भविष्यात जिवीत हानी आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा परिसर बाजारपेठेचा असल्याने तो नेहमीच गजबजलेला असतो तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने हे बांधकाम कोसळल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही आता करण्यात येत आहे.
 
 बांधकाम करणारा गुप्ता म्हणतो, मैने सब पालिका अधिकारीको सेट किया है. मेरे काम पर कोईभी कारवाई नही होगी. एवढी शाश्वती या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांकडे आहे. या बांधकामावर कारवाई? केव्हा होणार की नौपाडा प्रभाग समिती याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. अनधिकृत बांधकाम मागील वर्षी जुलै महिन्यात ऐन पावसाळ्यात पुर्ण केले. संपूर्ण अनधिकृतपणे सुरु असलेल्या या बांधकामाबाबत नौपाडा प्रभाग समितीच्या अनधिकृत बांधकाम संबंधित विभागाला वारंवार कळवून देखील सहा.आयुक्तांनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले.    भविष्यात आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना आणि या बाजारपेठेत येण्राया जाण्रायांना धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी घेणार का? सहा.आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद असल्यानेच गुप्ता हे काम बिनदिक्कतपणे करत असल्याची चर्चा परिसरातील इतर व्यापारी करित आहेत. मराठी मराठी म्हणून दवंडी पिटणारे केवळ मतांसाठी परप्रांतियांना पाठीशी घालत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com