Top Post Ad

भ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे

( राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त लोककल्याणकारी राजा राजषी शाहू महाराजाना हा लेख मी समर्पित करीत आहे.)- प्रदीप ढोबळे

शिंदे गट हिंदुत्वाच्या कितीही बाता करत असतील तरी लोकांना चांगले माहित आहे की ईडीच्या त्रासाने वैतागलेल्या लोकांचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपा प्रवेश.  कारण हा मार्ग नाही घेतला तर दुसरा मार्ग तुरुंगाचा आहे आणि त्याचे जागते उदाहरण म्हणजे अडीच वर्ष तुरुंगात असलेले भुजबळ साहेब आणि सद्यस्थितीत तुरुंगात असलेले अनिल देशमुख व नबाब मलिक.  भारतीय राजकारणात भ्रष्टाचारी नाही असा एखाद दुसरा  नेता असेल; तोही खूप मेहनतीने शोधावा लागेल. आज विधानसभा लोकसभा सोडा साध्या नगरसेवकांची निवडणूक लढण्यासाठी लाखो रुपये लागतात. परंतु यास कारणीभूत पूर्णपणे नेते नसून भारतीय जनता आहे; राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अनेक बाताडे लोक देश विकासाच्या गोष्टी करीत असतात परंतु ते मत देण्यास जात नाही.. मतदान न करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चाळीस टक्के च्या आसपास असते; गोरगरीब जनता लोकशाहीतील अज्ञानामुळे; आपल्या अमूल्य  मताची किंमत जाणत नसल्यामुळे; नेत्यांच्या दबावाखाली कधी प्रेमाखातीर; काही पैशाच्या बदल्यात; दारूच्या बाटली च्या बदल्यात आपले मत विकतात. आणि यातून एक दुष्टचक्र निर्माण होते. पुढील निवडणूक जिंकण्यासाठी जास्तीत जास्त पैसे कमवा. जो जास्त पैसे वाटेल तो निवडून येईल.

सर्वसाधारण कार्यकर्ते राजकारणास समाज विकास व देश विकासाचे साधन न समजून पैसा कमविण्याचे साधन समजतात. सरळ साध्या मार्गाने तुम्ही मेहनत करुन पैसे कमवायचे ठरविले तर जीवनात एखादा व्यक्ती जास्तीत जास्त  लखपती होऊ शकतो. परंतु राजकारणातील प्रत्येक डील मध्ये करोडो रुपये मिळतात. भ्रष्टाचाराच्या मार्गाने तीव्र गतीने करोडो रुपये जमविता येतात. अशी करोडो रुपये आजच्या राजकारणी मंडळीकडे आहे; सर्वच पक्षाच्या राजकीय मंडळीकडे आहे. भाजपाच्या विचारधारेच्या काही भागाशी मतभेद ठेवूनही हा पक्ष एक वेगळा पक्ष म्हणून भारतीय जनता बघत होती. Party with difference. आज केंद्रात भाजपची सत्ता आहे. ईडी सीबीआय केंद्र सरकारच्या हाती आहे.

 खरंतर या केंद्रीय संस्थांना स्वायत्ता आहे.  देशात होऊ घातलेल्या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारास बंधन घालण्यासाठी या संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. या संस्था उत्तम रीतीने त्यांचे काम करीत आहेत... फक्त गडबड एकच आहे या संस्था जे सरकार केंद्रात असते त्याच्याविरुद्ध च्या पक्षांच्या नेत्यांच्या मागे ससेमिरा लावते. भ्रष्ट राजकारणी कुणीही असो त्याच्याविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासाठीच या संस्थांचा जन्म झाला.. परंतु आपले काम करीत असताना फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांचे भ्रष्टाचार हुडकून काढण्याचे काम या संस्था करीत असल्यामुळे या संस्थे विरुद्ध लोकचळवळ निर्माण होत आहे. लोकांना या संस्था सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांच्या हातातील खेळणी वाटावयास लागल्या आहेत. या संस्थांनी आपली नैतीक पत वाढविण्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षांच्या राजकीय नेत्याना सुद्धा उघडे पाडले पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.... म्हणजे मग ही जी भटकंती की; आपले करोडो रुपये वाचवायचे असेल आणि तुरुंगात जायचे नसेल या दुहेरी हितानी; केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या बाजूने जाण्याचा राजकीय नेत्यांचा ओघ कमी होईल..  नव्हे कायमचा बंद होईल.

 हिंदुत्वाचे पांघरून भ्रष्टाचारी राजकारणी घेऊ शकणार नाही. परंतु त्यासाठी माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन साहेबां सारखेच अधिकारी लागतील. उच्चशिक्षित सर्व अधिकाऱ्यांनी देशाचा विचार केल्यास आणि ज्या शपथवर ते अधिकारी बनतात त्या शपथवर काम केल्यास हे राष्ट्र महान राष्ट्र बनू शकते. 

दुसरीकडे जनतेनी चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी धनआंदोलन करण्याची गरज आहे. लोक धनशक्ती तून लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सिव्हील सोसायटीची स्थापना करण्यात यावी. भारतीय संविधानात  बांधील अशा लोकांनी सिव्हिल सोसायटीच्या अकाउंटमध्ये महिन्याला पन्नास रुपये जमा करावे. पाच वर्षात हा अमाऊंट निवडणूक लढल्या पुरता निधी निर्माण करू शकेल. सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून इच्छुक उमेदवारतील एका उमेदवारास बहुमताच्या आधारावर निवडावे व निवडलेल्या उमेदवारास हा निधी निवडणूक खर्च म्हणून वापरण्यास द्यावा. जनतेच्या निधीतून निवडून आलेले प्रतिनिधी जनतेच्या करातून निर्माण झालेल्या निधीचा जनतेच्या विकासाच्या कामांसाठी उपयोग करतील आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल व भारत महान राष्ट्र बनेल.

जय भारत जय संविधान


प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे........BE MBA BA LLB

२६ जून २०२२............9820350758

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com