बिल्डर कांतीलाल बौवा यांच्याकडे खंडणी मागणाऱ्यास अटक


 माहीती अधिकार कायदयान्वये माहीती मिळवुन त्या माहितीच्या आधारे लाखो रूपये खंडणीची मागणी करणाऱ्यास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर कडुन  ९ जून रोजी अटक करण्यात आली. मे. विक्रांत एंटरप्रायजेस नावाने बांधकाम व्यवसायीक असलेले  बिल्डर कांतीलाल बौवा यांना सन २०१७ सालौ दत्तविजय प्रिमायसेस को ऑपरेटीव्ह हौसॉंग सोसायटी, चरई ठाणे या इमारतीचे पुर्नविकासाचे काम मिळालेले आहे. या कामकाजाबाबत मुकेश कनकीया याने  फेब्रुवारी २०२० पासुन ठाणे महानगर पालीकेकडुन माहीती अधिकार कायदयान्वये माहीती मिळवली. सदर पुर्नविकास बांधकामाचे कामकाज नियमवाहय रितीने करीत असुन त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे तक्रार अर्ज  ठाणे महानगर पालिकेकडे करून त्याबाबत बिल्डर कांतीलाल बौवा यांच्याकडे खंडणीची मागणी करणाऱ्या 'मुकेश कनकीया' यास अटक करण्यात आली आहे. 

सदर तक्रार मागे घेण्यासाठी सुमारे पाच लाखाची मागणी केल्याचे तसेच  यामध्ये तडजोड करून सुरवातीला ३ लाख ६१ हजार रूपये दिले असल्याचेही याबाबत बिल्डर कांतीलाल बौवा यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कांतीलाल बौवा यांनी इतकी रक्कम देऊनही या प्रकरणाबाबत केलेल्या तकारी मागे न घेता आणखी १० लाख मागणी केल्याने अखेर कांतीलाल बौवा यांनी याविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणीखंडणी विरोधी पथकामार्फत चौकशी करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून मुकेश कनकीया यास तीन लाख ११ हजार रुपयाची रक्कम स्वीकारतांना रगेहात अटक केली. घंटाळी ठाणे या ठिकाणी रंगेहात अटक करून  नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे गु. रजि.नं. १५७ / २०२२ भादवि कलम ३८४ ३८५ ३८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एम.बी कवळे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA