Top Post Ad

गाव-खेड्यातील माणसेच करतात पर्यावरण संवर्धन

 


५ जून हा जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप वापर करून, हवामान बदलण्यासाठी भाग पाडले आहे.त्यामुळे निसर्ग ऋतू अवेळी धिंगाणा घालत आहेत. आजच्या जागतिक हवामान दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे किंबहुना काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वर्तमानपत्रात लेख छापून येतात, मोठं मोठी व्याख्यान ठेवली जातात.विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागात व्याख्यानाला महानगरातील पर्यावरण अभ्यासक,तज्ञ मार्गदर्शनासाठी बोलावले जातात. जणूकाही पर्यावरणाच्या नासधूस करण्यात ग्रामीण भागातील लोक जबाबदार आहेत. 

वर्तमानपत्रातील लेख महानगरातील नागरिकांना वाचायला वेळ मिळतो का? मुळात धावपळीच्या , स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात अश्या विषयांकडे लक्ष द्यायला खरंच वेळ आहे का या शहरातील माणसांना आणि ज्यांना पाऊस आलेला आणि गेलेला याची जाणीव नसते.तसेच,उन्हाळा आहे की नाही आणि हिवाळ्यातही हीच परिस्थिती उपभोगत असलेल्या, ऐशोरामात जीवन जगणाऱ्या महाशयांनी वर्तमानपत्रांची पानं भरून आणि व्याख्यान देऊन पर्यावरण संवर्धन होईल का? दिवसेंदिवस उन्हाळा अधिक उष्ण होत चालला आहे. त्याला जबाबदार काँक्रीटचे पसरलेले जंगल आहे. झाडांची कत्तल करायची आणि त्या जागी आलिशान फ्लॅट बांधायचा स्वतः साठी किंवा व्यवसायासाठी आणि मग गच्चीवर किंवा कंपाऊंड वॉल च्या आत झाडं लावून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यायचा. यामुळे पर्यावरण संवर्धन होईल काय? 

केवळ ग्रामीण आणि निमशहरी भागात पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारण्यापेक्षा, शहरातील लोकांनीं स्वतः ला बदलायला हवं.झाडांची कत्तल करून आणि तिथे आलिशान बंगला बांधून व रिकाम्या जागेत फुलं फुलवून दिखाऊपणा सोडला पाहिजे.पर्यावरणाच खरं संवर्धन आणि संरक्षण हिच गाव खेड्यातील माणसं करताहेत.गाव खेड्यातील माणसं शहरांत कधी गेलीच तर हातात कापडाची पिशवी घेऊन जातात. पण, याऊलट शहरातील लोक प्लँस्टीक पिशवीचा किंवा कँरीबँगचा वापर करतात.यातूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे.त्यामुळे खरी गरज आहे ती शहरातील लोकांना पर्यावरणाची ओळख करून देण्याची ‌.कोणत्याही ऋतूत मानवाने ऋतुप्रमाणे वागले पाहिजे.ग्रामीण किंवा निमशहरी भागातील लोक ऋतुनुसार राहतात.ते हिवाळ्यात गरम हवा देणारी आणि उन्हाळ्यात थंड हवा देणारी तसेच पावसाळ्यात उष्ण हवा देणारी यंत्र वापरत नाहीत.त्यामुळे निसर्गाच्या बदलानुसार माणसाने वागणे आवश्यक आहेत. 

प्लँस्टिकचा सर्वाधिक वापर शहरातील कुटुंबात दिसून येईल. याउलट काही ग्रामीण भागात अजूनही मातीची भांडी वापरली जातात. शेतातील झाडं तोडणारे शेतकरी, झाडं लावून, त्यांची काळजीही तेच घेतात.त्यामुळे शेतकऱ्यांना, किंवा खेड्यातील लोकांना वृक्षसंवर्धन किंवा पर्यावरण संवर्धन करण्याच्या गोष्टी करणं म्हणजे फार काही पर्यावरणवादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं होय.उद्योग उभारणारी मंडळी काही खेड्यातील नसतात.ते कारखाना उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतात.

मला वाटत त्यांना प्रथम पर्यावरण शिक्षण द्यायला हवं.दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त सरकारदरबारी अमुक - अमुक कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला जातो. पण, तेच सरकार एखाद्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतो. तेव्हा पर्यावरण संवर्धन कुठं असतं? हा प्रश्न कोणी आणि कोणाला विचारावा.झाडं वाचली तर पर्यावरण वाचेल! खेड्यातील आणि निमशहरातील जनतेला झाडांचं महत्त्व सागण्याची गरज नाही. त्यामुळे लोकजागृती करण्यापूर्वी सरकार आणि उद्योगपतींमध्ये जागृती गरजेची आहे.त्यामुळे जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी मदत होईल. पर्यावरण संवर्धनासाठी व्याख्यान घ्यायचीच असतील तर ती महानगरात घ्यावीत, घेतली जात नाहीत, असे नव्हे! तर सरकारनेही या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन प्रकल्पाला मंजुरी द्यावी. शासकीय प्रकल्पासाठी किंवा उद्योजकांना, उद्योग उभारण्यासाठी विचार करूनच परवानगी देणे आवश्यक आहे.तरच,पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

पदमाकर उखळीकर ,
  मो.९६३७६७९५४२ .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com