
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली शोकांतिका
वटपोर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही, अशी शोकांतिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार भाषण केलं. समाजात अनेक अनिष्ठ प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी वट पोर्णिमेवर देखील सडेतोड भाष्य केलं. आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा सतत चालू असतात त्यामुळे प्रत्येक गावांनी या प्रथा आणि परंपरा यामधून मुक्त व्हावं, असं अव्हान त्यांनी त्यांच्या भाषणामधून केलं. शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही पण मात्र आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली हे आमचं दुर्दैव आहे, असंही त्या म्हणाल्या.
-------------
केअर ऑफ़ नेचर अनोखा संकल्प
उरण - निसर्गाप्रति असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शविते .आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल आणि ह्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले ते पर्यावरण प्रेमी, वन्यजीव प्रेमी केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सहचारिणी निसर्गप्रेमी सावित्रीच्या लेकी राणीताई मुंबईकर, सुजाताताई कडू व प्रतिक्षादीदी म्हात्रे या निसर्गप्रेमी सोबतीनींच्यां रूपानं जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस काही महिला वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात.
मात्र उरण येथील वेश्वी गावातील एकविरा देवी मंदिराच्यां वाटेवर वटवृक्षाच्यां झाडांची लागवड करून वटपौर्णिमा हा सण साजरा केला. सण-संस्कृती सोबतच विज्ञानाची कास धरणाऱ्या ह्या सावित्रीच्या लेकीनं वटवृक्षांचीं लागवड करत पर्यावरणाच्या संरक्षणा सोबतच ह्या मानवजातीला ऑक्सिजन रुपी नवसंजीवनी देणाऱ्या ह्या शतायुषी महावृक्षांची लागवड करून समाज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आणि म्हणूनच ह्या अनोख्या पध्दतीनं निसर्गा सोबत पर्यावरण पूरक धाग्याची वीण विणत नैसर्गिक, धर्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्व असणाऱ्या वटवृक्षाची लागवड करून तथाकथित वटपौर्णिमा साजरी न करता वृक्षारोपण दिन म्हणून साजरी करणाऱ्या केअर ऑफ़ नेचर संस्थेच्या निसर्गप्रेमी सावित्रीच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
----------------------

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी वट पौर्णिमेनिमित्त नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागे रेल्वे रूळाशेजारी नगरपरिषदेच्या आॕक्सिजन पार्कमध्ये वडाची झाडे लावून वट पौर्णिमा साजरी केली.अशाच प्रकारे आपल्या समाजातील सर्व महिलांनीही अंधश्रद्धेला मातीत गाडून विज्ञानवादी म.ज्योतिबाची क्रांतीज्योती सावित्रीचा मार्ग स्विकारला तर आपला देश लवकरच जगाचा महागुरू झाल्याशिवाय राहणार नाही.
--------------------------

वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी आणि त्यांच्या सौभाग्यती यांनी उलवे येथे वटवृक्ष रोपन करुन धार्मिक परंपरेला छेद दिला
0 टिप्पण्या