Top Post Ad

बौध्द विद्यापिठ एक दिर्घ लढाई


प्राचिन भारतात विद्यापिठ निर्मितीत बौद्धांचा महत्वपूर्ण वाटा आहे. या काळात,लक्षशीला, नालंदा, वल्लभी, विक्रमशीला, उदन्तपुरी आणि जगदद्ल इत्यादी बौध्द विद्यापिठातून जगातील विद्यार्थ्यांनी शिक्षण ग्रहण करून आपल्या देशाची उज्वल परंपरा निर्माण केली. परंतु आपल्या देशाने मात्र दखल घेतली नाही. ह्या विद्यापिठांतून विचारसंपत्ती बाहेरच्या देशात गेली. आणि काळाच्या ओघात वरील बौध्द विद्यापिठे देखील राहीले नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हा देश बौध्दमय करावयाचा होता. त्यांनी तशी घोषणाही केली होती. कारण बौध्द धम्मच जगाला तरू शकतो असा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता. स्वातंत्र्यापूर्वी आणि धर्मातारापुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द विद्यापिठाचा विचार केलेला दीसून येतो. २६ मार्च १९४६ ला दील्ली मध्यवर्ती विधिमंडळात शिक्षणावरील झालेल्या चर्चेत पंडीत गोविंद मालविय यांना बाबासाहेबांनी विचारले, ‘बनारस हिंदु युनिव्हर्सिटी विश्वविद्यालयांशी बऱ्याच प्रमाणात पंडीतजींचा संबध होता किंवा आहे ही गोष्ट पंडीतजींनी विसरू नये. पंडीतजींना वग असे विचारतो, की बनारस हिंदु विश्वविद्यालय ही जातीवाचक संस्था नव्हे काय? उलट मी तर असे म्हणतो की बनारसहिंदु विश्वविद्यालय हे हिंदु धर्मियांसाठी नसुन केवळ हिंदु धर्मातील एका विशिष्ट जातीच्या देखरेखीखाली खास त्यांच्यासाठीच चालविण्यात आलेली संस्था आहे. या विश्वविद्यालयाच्या अध्यापक वर्गात ब्राम्हणेतर जवळजवळ नाहीत. ही गोष्ट माझे मित्र पंडीतजी नाकारू शकतील काय? 

यावरून असे लक्षात येते की हजारो वर्षांपासुन शिक्षणक्षेत्रातील ब्राम्हणांची मक्तेदारी कायम राहिली. स्वतंत्र भारतात राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकास बरोबरीचे अधिकार दीले. सर्व क्षेत्रात समतेचा पुरस्कार करण्यात आला. परंतु असमतावादी तत्वे जोपासणारी माणसं बदललेली नाहीत. ती तशीच राहिली. या असमतावादी माणसांनी स्वातंत्र्यानंतरही शिक्षणक्षेत्रातील आपली पकड कायम ठेवली. यातूनच बनारस हिंदु विश्वविद्यालय,काशी हिंदुविश्वविद्यालय आणि काहींनी अलीगड मुस्लीम विद्यापीठ,जामिया इस्लामीय विद्यापीठ दिल्ली अशी विद्यापिठं निर्मिती केली. परंतु इथल्या बहुसंख्यांक समाजाचा ह्या उच्च शिक्षणसंस्थांशी संबंध नव्हता. म्हणून बाबासाहेबांना बौध्द विद्यापीठाची गरज भासली.१४ नोव्हेबर १९५४ ला हैदराबाद येथे विद्यार्थी मेळाव्यासमोर भाषण करतांना ते म्हणाले होते, बौध्दधर्माचा भारतात प्रसार करण्याची पूर्वतयारी म्हणून बंगलोर येथे बौध्द विद्यापिठ बांधण्यात येणार असुन त्यासाठी म्हैसूरच्या महाराजांनी आपली पाच एकर जमीन दीली आहे. रमन इंस्टीट्युट आणि इंस्टीट्युट ऑफ सायन्स या दोन प्रसिध्द शिक्षण केंद्राच्या मधल्या जागेत ही पाच एकर भूमी आहे. भारतात आपण ज्यांच्याकडे गेलो अशा अनेक इसमांनी आपल्याला द्रव्यसहाय्य तसेच तांत्रिक सहाय्य कबुल केले आहे.आणि आपण लवकरच भिक्षापात्र घेऊन देणग्यांसाठी फिरणार आहोत. पैसा उभा राहीला की सुमारे दोन वर्षात विद्यापीठ बांधून तयार होईल. 

सर्वसामान्य लोकांत बौध्द धम्माचा प्रसार करण्याकरीता प्रचारक तयार करणे हा या विद्यापिठाचा मुख्य उददेश आहे. या विद्यापीठात जात,धर्म,राष्ट्र हा भेदभाव न मानता विद्यार्थी घेतले जातील.व त्यांना निरनिराळ्या धर्माचे तौलनिक ज्ञान करून देउन इतर संबंधीत विषय शिकवले जातील.चीन,जपान,ब्रम्हदेश आणि अमेरिका इत्यादी देशातूनही अध्यापक आणविणार आहोत. बौध्द साहित्य छापण्याकरीता पिठात एक छापखानाही चालविण्यात येईल.ग्रंथालय,बौध्दविहार,इ.विभागही ह्या विद्यापिठात असतील धर्मशिक्षणाचे एक महान विद्यापिठ कालांतराने ह्या ठीकाणी निर्माण होईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मागासवर्गीय पीडीत आदीवासी आणि एकूणच बहुजन समाजाचे दु:ख जवळून पाहीले होते. इथली असमानता पाहीली होती. म्हणून ह्या बहुसंख्यांक लोकांच्या हक्काचे विद्यापीठ असावे असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. ह्या विद्यापिठातून समता सर्वत्र स्थापता येईल असेही वाटले असावे.धर्मांतरानंतर त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. अल्पावधीत त्यांचे महापरीनिर्वाण झाले.आणि बाबासाहेबांच्या स्वप्नांना इथं पूर्णविराम मिळाला. धर्मांतरानंतर बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर धार्मिक चळवळ थंडावली आणि पक्षिय राजकारणाला वेग आला.परंतु अशाही स्थितीत काहींनी बाबासाहेबांच्या विचारांशी फीतूरी न करण्याचा निर्णय घेतला.डॉ.पी.टी.बोराळे यांनी या मागणीसंदर्भात एक मेमोरन्डम तयार करून त्यात लिहिले होते.
Dr.Babasaheb Ambedkar Wanted establish buddist university Aurangabad near Ajanta and Elora. But it has turned into Marathavada university.नामांतरची लढाई पंधरा वर्षे चालली. त्यासाठी पाच जणांचा बळी गेला. पण शेवटी नामविस्तार झाला. राजा ढाले आणि बे.खोब्रागडेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामागे मराठवाडा हा जोडशब्द लावू नये त्याऐवजी केवळ ‘बौध्द विद्यापिठ’ मागणीचा पर्याय पुढे केला. पण त्यात त्यांना अपयश आले.

डॉ.बाबासाहेबांना बौध्द विद्यापिठ हवे होते. पण त्यांचे दलीत पिडीतांसाठीचे मैलिक काम लक्षात घेऊन त्यांच्या मागणीत थोडा बदल करण्यात आला. ६ डिसेंबर १९९१ रोजी डॉ. आंबेडकर बौध्द विद्यापिठ ही मागणी पुढे करण्यात आली. नागपूरचे एक साहित्यिक कार्यकर्ते बबन लव्हात्रे यांनी पुढाकार घेतला भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदिया अशा चार जिल्ह्यांचा मिळून पुर्व विदर्भ होतो. या भूभागाला झाडीपट्टी असेही संबोधतात. दलित आदीवासी, भटक्या विमुक्त जाती आणि बहुजन समाज या भागात मोठ्याप्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन पुर्व विदर्भात, डॉ.आंबेडकर बौध्द विद्यापीठ मागणी पुढे केली आहे.

डॉ.आंबेडकर बौध्द विद्यापिठ मागणीसाठी नागपूर विद्यापीठासमोर २६ फरवरी १९९४ रोजी धरणे, मुंबई येथील सचिवालयासमोर २२ मे १९९७ ते २९ मे १९९७ पावेतो धरणे, संसदभवनासमोर ८ ऑगस्ट १९९७ ते १५ ऑगस्ट १९९७ पर्यंत धरणे आंदोलन, भंडारा, गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून दि. १४ सप्टेबर १९९६ ते ३ ऑक्टोबर १९९६ तसेच १४ ऑक्टोबर १९९८ ते १० नोव्हेंबर १९९८ पर्यंत ११०० कीमी अंतराचा समतामार्च- पायदळ मार्च काढण्यात आला. याच क्षेत्रात हजारो सभा,संमेलने,परिषदा तसेच या क्षेत्रातील गोळा केलेल्या ४ लक्ष लोकांच्या स्वाक्षऱ्या इत्यादी पद्धतीने आंदोलन उभारले. २०-५-१९९६ ला आणि २८-५-१९९७ ला अशी दोन शिफारसपत्र महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठविले. राष्ट्रपती के.आर.नारायणन यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनीही महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला १९/१९९७ रोजी शिफारस पत्र लिहिले. या सर्वच पत्रांना महाराष्ट्राच्या सचिवांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे सचिवाने राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांचाही अपमान केला असे वाटते. त्याबरोबरच सरकार अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द विद्यापिठाविषयी गंभीर नाही. त्यामुळे हे सरकार जातीवादी असल्याची समस्त आंबेडकरी जनतेला शंका यायला वाव मिळतो. लढत राहणे हा आमचा स्वभाव आहे.

ह्या लढ्याचे प्रमुख बबन लव्हात्रे ह्यांचं मागील वर्षी निधन झालं. त्यानंतर रिपब्लिकन नेते राजकारणात रमलेत. खरेतर लव्हात्रे सरांचा हा लढा तेव्हाही कोणत्याही रिपब्लिकन नेत्यांनी मनावर घेला नाही. किमान आतातरी रिपब्लिकन नेते आणि जनता विचार करेल. पुर्व विदर्भात डॉ.आंबेडकर बौध्द विद्यापिठ उभे राहील व त्यासाठी या लढाईत नव्या दमाने नव्या भिमसैनिकांचा हातभार लागेल असा विश्वास वाटतो.

राजू बोरकर ............७५०७०२५४६७
रा. पो. ता. लाखांदूर जिल्हा भंडारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com