महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर कलावंतांचा सन्मान

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन चळवळीत स्वतःला झोकून देऊन काम करणारे डॉ.बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर हजारो गीतांची रचना करणारे महाकवी गायक वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त सध्या चळवळीत काम करणारे व आंबेडकरी चळवळीतील गीतकार गायक कलावंत यांचा सन्मान व त्यांचा जाहीर सत्कार ट्रॉफी,सन्मान पत्र,शिल्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते दिनांक 14 ऑगस्ट २०२२  रोजी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. 


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भिमशाहिर कलावंत यांची माहिती संकलित करण्यात येत असून 
कवी गायक कलावंत यांनी स्वतः आपली माहिती किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सविस्तर माहिती 
दि.५ जुलै २०२२ पर्यन्त 
सचिव परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद ४१३६o२ 
ई मेल lD parivartan.naldurg@gmail.com 
Mob No 9604166899 
या पत्त्यावर पाठवावी असे आवाहन सचिव मारूती बनसोडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या