ठाणेभारतीय समाजव्यवस्थेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले परिवर्तन घडवून आणण्यासाठी मुळासह अमुलाग्र बदल बदलावे लागेल, त्यासाठी नामांतर आणि धर्मांतर असे दोन्ही प्रकार करावे लागतील, नामांतराच्या आधारे जूनी ओळख पुसून नवे नाव आडनाव बदलण्याची क्रांती स्विकारण्याची गरज आहे, आणि सर्वांगीण समतामुलक विकासासाठी धर्मांतर करून बुद्ध की ओर चालावं लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन भन्ते विमलकिर्ती गुणसिरी यांनी केले,
बौद्ध समाज विकास संघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते, कोपरी ठाणे पूर्व येथील मंगला हायस्कूल हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर होते,
भन्ते विमलकिर्ती गुणसिरी पुढे म्हणाले की, जगाने बुद्धाला गुरु म्हणून मान्य केले आहे, भारतात बुद्धाचा जन्म झाला, महापरिनिर्वाण देखिल भारतातच झाले पण भारतीय लोक बुद्धापासून दूर का आहेत,हे ओळखले पाहिजे, भारतीयांना जाणिवपूर्वक बुद्धाच्या शिकवणी पासून अलिप्त ठेवले जातेय, त्यांच्या ज्ञानापासून वंचित ठेवले जातेय, हा महाभयंकर सुडबुद्धी षडयंत्रकारी प्रकार फक्त भारतातच पाहायला मिळतो, हे बौद्ध समाजाने ओळखले पाहिजे, त्यामुळे बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचे कार्य हाती घेतले पाहिजे, हेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे,
उपरे काकांनी ओबीसी समाजाच्या कानीकपाळी ओरडून सांगीतले की ओबीसींनो तूम्हाला घर वापसी करावी लागेल, वेळ वाया घालवू नका, बुद्ध धम्माच्या वाटेवर आरुढ होवुन आपली खरी ओळख निर्माण करा, उपरे काकांनंतर ओबीसीं मध्ये थोडी मरगळ आली आहे, भेदाभेदीचे खरे गमक जातींच्या मुळाशी आहे, जातींना माणूसं का चिकटून राहतात कळत नाही,ज्या जातीने तूमच्या हजारो पिढ्यांना कलंकित केले दुर्बल केले, मजबुर केले, गुलाम केले आहे,हि घाण झटकून टाका आणि मोकळा श्वास घ्या, आपल्याला महापुरुषांची हिच शिकवण आहे, असे परखड विचार या व्याख्यान कार्यक्रमातून भन्ते विमलकिर्ती गुणसिरी यांनी मांडले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार धम्मप्रचारक व्ही जी सकपाळ यांनी मानले, तसेच राजाराम ढोलम, वसंत भातडे, मिलिंद शेलार, विष्णू शिरसाट, शाहिर वसंत हिरे, सुखदेव कर्डक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर बुकाणे, अलंकार जाधव, अनिता जाधव, पद्माकर गायकवाड, विनायक कांबळे, भास्कर सोनावणे, झुंबर जाधव , आनंद त्रीभुवन, विजय सावळे, सचिनभाऊ भातंबरेकर, स्वप्नील पगारे, संघर्ष शिरसाट, विशाल रोकडे, पियुष बुकाणे, मयुर चासकर, यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या