Top Post Ad

पॉइझन ऑनलाइन विक्री ...?

       


 आपली मुले ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात जात आहेत, त्या उंबरठ्यावर ड्रग्ज नावाचा पॉइझन जाऊन पोहचलाय. आता या ड्रग्ज माफियांनी तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एलएसडी पेपर नावाचा नवा ड्रग्ज प्रकार डिझाइन केला आहे. कार्टून पेपरवर ड्रग्ज लावून त्यास विक्री केले जात आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि शाळा, कॉलेज परिसरात विक्री करण्यासाठी खास हे ड्रग्ज डिझाइन करण्यात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या पारदर्शक पेपरला को लाईक ऍसिड मध्ये भिजवून नंतर त्यास डाईएथाइलामाईंड नावाच्या केमिकल मध्ये कम्पोनेट करून ट्रेनस्परंट फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट केले जाते. या प्रक्रियेनंतर ही पेपरशीट ड्राय करून त्यावर कार्टूनचे स्टिकर लावले जातात. त्यानंतर या पेपरवर पिंक- सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन अशी विविध कार्टून्स चित्रे लावली जातात.

 सध्या किरकोळ ड्रग्ज विक्री मार्केट मध्ये आय़ - 25, प्रमोदम, टपरी अशा विविध कोडवर्डने हे ड्रग्ज संबोधले जातात. एका एलएसडी पेपरची किंमत 165 डॉलर म्हणजेच सुमारे 12 हजार रुपयांपर्यंत असते. विदेशात या ड्रग्ज प्रकाराने अत्यंत कहर केलेला असून अनेक देशातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेली आहे. त्यामुळे आता मुंबई-ठाणे व इतर महानगराच्या दारात येऊन ठेपलेले हे किचकट ड्रग्स आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे आताच सावध होण्याची गरज आहे. नाहीतर तुमचा मुलगा जे कार्टून पेपर खिशात बाळगून फिरतोय ते एक घातक ड्रग्ज असू शकते.

        अनेक देशात धुमाकूळ घालणारा पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर ड्रग्ज विक्रीचे जाळे सध्या ठाण्या-मुंबईत झपाट्याने वाढत आहे. नुकतेच ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण आणि डोंबिवलीतून तब्बल 1 कोटी रुपयांचा एलएसडी पेपर ड्रग्जचा साठा पकडल्याने खळबळ उडाली. मात्र, त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व ड्रग्जचासाठा एका 21 वर्षाच्या तरुणाने चक्क डार्क वेबच्या माध्यमातून ऑनलाइन मागवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. शाळा, महाविद्यालय, आयटी पार्क आदी पिसरात सहज विक्री करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांनी खास डिझाइन केलेले हे ड्रग्ज अत्यंत घातक मानले जाते. त्यामुळे इतक्या घातक ड्रग्जची सर्रास ऑनलाइन विक्री सुरू असल्याची माहिती समोर आल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत. दरम्यान, या साऱ्या घटनेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून ड्रग्ज मार्केट डिजिटल होत असल्याचे हे संकेत आहेत. सहाजिकच ड्रग्ज ऑनलाइन उपलब्ध होत असल्याने पोलिसांसमोर नवी डोकेदुखी उभी ठाकली आहे. तर एलएसडी पेपर सारखे ड्रग्ज ऑनलाइन उपलब्ध होऊ लागल्यास त्याचा मोठा परिणाम ड्रग्ज प्रतिबंधात्मक कारवाईवर होण्याचा संभाव्य धोका व्यक्त केला जात आहे. 

        कोकेन, चरस, अफिंग, गांजा, एमडी व इतर प्रचलित ड्रग्स विक्री व सेवनावर भारतात कडक निर्बंध असल्याने ड्रग्ज माफिया आता अनेक पर्यायी अमली पदार्थाचा शोध सुरु करून त्यास भारतात रुजवण्यास व त्यांची तस्करी करण्यास सुरुवात करत आल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. काही वर्षापूर्वी पोलिसांना देखील माहित नसलेले एमडी आणि एफेड्रीन हे अमली पदार्थ देखील त्यापैकीच एक आहेत. नवीन अमली पदार्थाची तस्करी केली तर तो सामान्य माणूस काय खुद पोलिसांच्या देखील नजरेत येत नसल्याने हे ड्रग्ज तस्कर अनेक छुप्या अमली पदार्थाची तस्करी व विक्री भारतात करू लागले आहेत. या नवनवीन ड्रग्जचा प्रकारात आता भर पडली आहे ती एलएसडी पेपर उर्फ पेपरबॉम्ब या अमली पदार्थाची. गंधहीन आणि कार्टूनच्या स्टिकरवर असलेले हे ड्रग्ज सहजासहजी ओळखणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे या पेपरची चव घेतल्याशिवाय ते ओळखणे जवळपास अशक्य आहे. 

आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि शाळा, कॉलेज परिसरात विक्री करण्यासाठी खास हे ड्रग्ज डिझाइन करण्यात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या पारदर्शक पेपरला को लाईक ऍसिड मध्ये भिजवून नंतर त्यास डाईएथाइलामाईंड नावाच्या केमिकल मध्ये कम्पोनेट करून ट्रेनस्परंट फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट केले जाते. या प्रक्रियेनंतर ही पेपरशीट ड्राय करून त्यावर कार्टूनचे स्टिकर लावले जातात. त्यानंतर या पेपरवर पिंक- सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन अशी विविध कार्टून्स चित्रे लावली जातात. सध्या किरकोळ ड्रग्ज विक्री मार्केट मध्ये आय़ - 25, प्रमोदम, टपरी अशा विविध कोडवर्डने हे ड्रग्ज संबोधले जातात. एका एलएसडी पेपरची किंमत 165 डॉलर म्हणजेच सुमारे 12 हजार रुपयांपर्यंत असते. विदेशात या ड्रग्ज प्रकाराने अत्यंत कहर केलेला असून अनेक देशातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेली आहे. त्यामुळे आता भारताच्या दारात येऊन ठेपलेले हे किचकट ड्रग्स आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरणार आहे अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. 

शाळा, कॉलेज, आणि बड्या आयटी कंपनी परिसरात विक्री करण्यासाठी खास डिजाईन केलेले हे ड्रग्ज पूर्णतः गंधहीन असल्याने ते सहजासहजी ओळखणे अवघड होते. काही महिन्यांपूर्वी ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण-डोंबिवलीतल्या तिघा ड्रग पेडलरकडून पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर हे डिझायनर ड्रग्स पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल 1 हजार 466 एलएसडी पेपर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत तब्बल 1 कोटी 2 लाख 62 हजार रुपये इतकी आहे. या घटनेत अटक केलेल्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हे ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून ऑनलाइन मागवल्याचा जबाब दिला आहे. या जबाबने पोलीस देखील चक्रावले आहे. इतक्या घातक ड्रग्जची सर्रास ऑनलाइन विक्री सुरू असल्याने त्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा सक्रिय सहभाग असल्याचा संशय अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, ठाण्या-मुंबईत ड्रग्ज विक्री व तस्करीवर कारवाई होणे तशी सामान्य बाब. मात्र, एलएसडी नावाच्या डिझायनर ड्रग्जचा नवा प्रकार भविष्यात मोठी समस्या ठरणार असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कारण विदेशात धुमाकूळ घालणारा हा ड्रग्ज प्रकार मुंबई ठाण्यात अत्यंत नवा असून या एलसीडी पेपर ऑनलाइन विक्रीचे जाळे सध्या आयटी पार्क, शाळा कॉलेजेसचा परिसरात मोठ्या प्रमाणात विणले जात आहे. त्याच बरोबर या ड्रग्जचे फॅड बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये देखील झपाट्याने वाढत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.      

ऑनलाइन विक्री व युवा वर्गासाठी खास डिझाइन

         ड्रग्ज माफियांचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे युवा वर्ग आहे. त्यामुळे युवा वर्गापर्यंत ड्रग्ज पोहचवण्यासाठी इंटरनॅशनल लेव्हलवर माफिया गॅंग अनेक नवनवे मार्ग शोधत असतात. अलीकडच्या काळात अनेक ड्रग्ज माफियांनी आपल्या गॅंगला कंपनीचे स्वरूप दिले आहेत. या ड्रग्ज माफिया कंपनीत नियुक्त केलेले क्रेटिव्ह टीम युवा वर्गापर्यंत ड्रग्ज पोहचवण्यासाठी अनेक नवनवे डिझाइन विकसित करतात. याच ड्रग्ज माफियांच्या क्रेटिव्ह टीमने एलएसडी हे पेपर डिझाइन केलेले आहे. पेपरवर ड्रग्ज लावून त्यावर कार्टूनचे चित्र लावून ते विक्रीसाठी पाठवण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे हे ड्रग्ज शाळा व कॉलेज परिसरात सहज विक्री करता येणे. मात्र, हे ड्रग्ज डिझाइन करण्यामागे फक्त इतकाच हेतू नसून ड्रग्जचा नवा प्रकार मार्केटमध्ये आणणे आणि तो सहज ऑनलाइन पद्धतीने विक्री करता यावे हा देखील मुख्य हेतू ड्रग्ज माफियांचा आहे. 

ऑनलाइन ड्रग्ज उपलब्ध होऊ लागल्यास या विक्रीच्या नेटवर्कला तोडणे मोठे मुश्किल काम होऊन बसणार आहे अशी भीती देखील एका पोलीस अधिकाऱ्याने खाजगीत व्यक्त केलीय. त्यास मुख्य कारण म्हणजे एकदा का या नशेच्या आहारी एकदा युवक गेल्यास त्यातून बाहेर पडणे सहज शक्य नाही. एकदा का या पेपर बॉम्बची चव जिभेवर बसली की नशा करणाऱ्यास हवेत उडत असल्याचा अथवा पाण्यावर तरंगत असल्याचा अत्यादीक व क्षणिक आनंदभास उत्पन्न करणारी भावना निर्माण होते. त्यामुळे नशा करणारा व्यक्ती या अभासातून बाहेर पडूच नये अशी धारणा करून बसतो व कायमचा या नशेच्या आहारी जातो. अशा स्थितीत ड्रग्ज माफियांना अचूक माहिती असते की आता आपण ग्राहकापर्यंत नाही गेलो तरी ग्राहक आपल्या पर्यंत नक्की येणार. सहाजिकच त्यामुळे ड्रग्ज माफिया फक्त नवे ग्राहक कसे मिळवावे याचाच फक्त विचार करतात. एकदा का कोणी त्यांचा ग्राहक बनला तर मग तो सहजासहजी त्यांच्यापासून तुटत नाही अथवा त्या ग्राहकास ड्रग्जपासून दूर करणे देखील अशक्य होऊन बसते.

डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज मिळतोय ऑनलाइन

         ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण आणि डोंबिवलीतून पकडलेल्या ड्रग्ज पेडलर्सची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हे ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून ऑनलाइन मागवल्याचा जबाब दिला आहे. या घटनेतून ड्रग्ज माफिया आपला व्यवसाय ऑनलाइन करण्यासाठी डार्क वेबचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमके हे डार्क वेब आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला आहे. डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरील तस्करी जगताचे स्वतःचे छुपे ब्राऊजर आहे. येथे घातक हत्यार, लोकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स, ई-मेल, लोकांचे फोन नंबर, ड्रग्स, नकली करन्सी इतर वस्तू सहज मिळतात. 

या सर्व गोष्टी येथे खूप कमी दरात मिळतात. आपण ज्या इंटरनेटचा वापर करतो, ते खूप छोटे आहे. इंटरनेटच्या मोठ्या भागापर्यंत लोक पोहचली नाहीत. त्यालाच डार्क वेब म्हणतात, इंटरनेटची ही दुनिया लोकांसाठी अदृश्य आहे. येथे युजर्सची ओळख गुप्त राखली जाते. हॅकर्ससाठी डार्क वेब हा मोठा अड्डा आहे. येथे करोडो लोकांची पर्सनल माहिती डार्क वेबमध्ये फक्त तीन हजार पाचशे रुपयांत मिळते. यामध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड, बँक डिटेल्स आणि क्रेडिट कार्ड संबधित माहितींचा समावेश असतो. डार्क वेबमध्ये ड्रग्स आणि इतर घातक वस्तू विकणारे लोक परदेशी असतात. कोरियर किंवा आपल्या एजंट्सच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत आपल्या वस्तू पोहचवतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com