लोणावळ्याच्या कार्लालेणींवर झेन मास्टर सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली बुद्धपौर्णिमा संपन्न


कार्ला लेणी येथे या वर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शेकडो बौद्ध उपासक-उपासिका यांनी सकाळीच कार्ला लेणी वरती चढण्यास सुरुवात केली व एकवीरा देवीच्या मंदिराजवळच बुद्ध मूर्ती ची स्थापना करून झेन मास्टर सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली उपासक उपासिका यांच्यासमवेत वंदनीय भिक्खू संघाने बुद्धवंदना केली व बौद्ध लेणीत प्रवेश केला एकविरामंदिरा शेजारी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला शांतता व सुव्यवस्था कायम होती पुणे जिल्हा परिसरातील सर्व बुद्ध लेणी मुक्त करून तसेच संवर्धन करण्यासाठी यावेळेस घोषणा करण्यात आली 


त्यावेळेस समाजातील सर्व क्षेत्रातील उपासक-उपासिका उपस्थित होत्या रिपब्लिकन नेते सूर्यकांत वाघमारे व वडगाव मावळ भागातील बंधू-भगिनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे सहा हजार पुरणपोळीचे भोजनदान केले उपासक-उपासिका टाकवे गाव वेहेरे गाव व धडापासून लेणीच्या वरील भागापर्यंत पाणी व सरबत चे वाटप केले सदर कार्यक्रमाचे आयोजन लेणी संवर्धक...सुरज जगताप,   दिपक गायकवाड,नागेश भोसले, सचिन वाघमारे दादाआगळे सुनिल पवार व स्थानिक बुद्ध समाजाचे नेते यांनी केले. 


या ठिकाणी असलेल्या बुद्ध लेण्यातील काही भागात हिंदू धर्मातील काही देवांचे फोटो लावून बुद्ध लेणी वर अतिक्रमण करून बुद्ध लेणी संपुष्टात करण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न अद्यापही सुरु आहेत.  बुद्ध लेणी संवर्धन करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुद्धपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी भव्य कार्यक्रम घेण्यात आला. याबद्दल सर्वच आयोजकांचे आभार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA