Top Post Ad

मुंबईवर हक्क कुणाचा ?


"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या मागणीतून 'संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय. सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.
डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला' हे निर्भेळ यश मिळाले. कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे… आणि अश्या बऱ्याच जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.

पण आज संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला जात असताना केवळ डांगे, अत्रे आणि जोशी यांच्याच नावाचा गवगवा केला जातो. त्यांचे योगदान कुणीही नाकारत नाही, पण त्यांच्यासोबतच काम करणाऱ्या ' 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'च्या दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे…. इत्यादी मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो. आणि त्यापेक्षाही वाईट याचे वाटते कि जो हा 'संयुक्त महाराष्ट्राचा लढा' ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात लढला गेला त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुणीही करत नाही याचा !!
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरु असताना प्र.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांना या लढ्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा लढा यशस्वी झाला त्या डॉ. आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय मी तरी 'महाराष्ट्र दिन' साजरा करत नाही.
बाबासाहेबांच्या दादर, मुंबई येथील 'राजगृह' या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी प्र.के.अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेले आहे. या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी 'मराठा' या वृत्तपत्रातून प्र. के. अत्रे जसे रान उठवत होते, त्याप्रमाणेच डॉ.आंबेडकर आपल्या 'जनता' मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते. याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित-वंचित-कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त अमराठी होते त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली. आणि त्याचवेळेस "मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या मागणीनेही जोर पकडला. त्याचवेळेस बाबासाहेबांनी ७ जाने. १९५६ ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला.
मुंबईवर हक्क कुणाचा ?
मुंबई हि राज्याची अस्मिता आहे हे सर्वजण मान्य करत होते, पण ती का व कशी ? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते. त्यावर बाबासाहेब म्हणतात...
"मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५%, पण ५०% हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती."
संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५
बाबासाहेब नसते तर आणखी किती वर्षे गीतेत सांगितल्याप्रमाणे...
"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषुकदाचन l " कर्मच करीत राहिला असतो...
किती भारतीयांना माहित आहे जिथे हा देश जातीवादाने पूर्ण पोखरून निघाला असताना, जिथे माणसाची जात व वर्ण पाहून किंमत ठरत असे, अश्या या भारतात शेतकरी- मजूर-कष्टकरी- रोजंदार याचे जगणे किती हलाखीचे- दारिद्रयाचे असतील याची कल्पना सुद्धा केली तरी अंगावर शहारे येतात, जिथे बहुसंख्य(ओबीसी) यांनाही शुद्र म्हणून अपमानित केले जात असेल तिथे गरिब - लाचार मजुराची काय अवस्था असेल. सुविधा- सवलती हे नावच कधी ऐकले नसावे मागील सात पिढ्यांनी.. मजुराचे जीवन म्हणजे नरक यातना...
कष्टकरी-रोजंदारांचे जीवन म्हणजे रोजचा काटेरी वनवास. अश्या भीषण परिस्थितून बाहेर काढावयास कोणी मायका लाल ३३ कोटीतून अवतरला नाही, जिथे गीताच म्हणते...
"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l "
अर्थात, कामगारानो दिवस रात्र फक्त घाम गाळा, मेहनत करा, तथाकथित सवर्ण भांडवलदारांची सेवा चाकरी करा, त्यांची धुनी धुआ, शेतात राबा, त्यांचा मैला साफ करा, जीव तोडून मजुरी करा मात्र मजुरी मांगू नका. कारण मैला साफ करणे हेच तुमचे कर्म, तुम्ही फळाची अपेक्षा करू नका..
देव आज्ञा समजून अडीच हजार वर्षे से सर्व मुकाट्याने सहन करीत राहिले.गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा गुलामी सहन करेल का? नाही कधीच नाही..
बाबासाहेब तुम्हाला…. माझ्या तुमच्या पूर्वजानसारखे लाचार वाटले का? ते करारी तडफदार मिलिटरी सैनिक सुबेदार सकपाळांचे सुपुत्र होते. माझ्या शेतकरी-मजूर- कष्टकरी यांनी वरील होणारा अन्याय का सहन करावा? म्हणून संधीच्या शोधत असताना, ब्रिटीश राजवटीत मजूर मंत्री पदावर काम करावयाची संधी मिळाली आणि मजुरांचे दिवस पालटले... बुलंद आकाशात सुर्य... आणि धरणीवरचा महासूर्य बाबासाहेब....
शेतकरी-मजूर-कष्टकरीयांच्या अंधार जीवनात कायमचा महाप्रकाश टाकून गेला.. अरे यां कारखाण्यातील, शेतावरील, उद्योग-व्यवसायातील कर्मचारी-मजुरा तुला माहित आहे का? तुला कोणी दिल्या सुविधा-सवलती... होय.. महासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी...
1 आठ तास कामाची वेळ (Reduction in FactoryWorking Hours 8 hours duty)
2. महिलांना प्रसूती रजा (Mines MaternityBenefit Act)
3. महिला कामगार वेलफेयर फंड (Women Laborwelfare fund)
4. महिला व बालकामगार संरक्षण कायदा (Womenand Child, Labor Protection Act)
5. खाणकामगार यांना सुविधा (Restoration ofBan on Employment of Women onUnderground Work in Coal Mines)
6. भारतीय फेक्टरी कायदा (Indian Factory Act)
7. Maternity Benefit for women Labor,
5.Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in CoalMines,
8. National Employment Agency(Employment Exchange):
9. Employment Agency was created.
10. Employees State Insurance (ESI):
11. India’s Water Policy and ElectricPower Planning:
12. Dearness Allowance (DA) to Workers.
13. Leave Benefit to Piece Workers.
14. Revision of Scale of Pay forEmployees.
15. Coal and Mica Mines Provident Fund:
16. Labor Welfare Funds:
17. Post War Economic Planning:
18. Creator of Damodar valley project,Hirakund project, The Sone River valleyproject.
19. The Indian Trade Unions (Amendment) Bill:
20. Indian Statistical Law:
21. Health Insurance Scheme.
22. Provident Fund Act.
23. Factory Amendment Act.
24. Labor Disputes Act.
25. Minimum wage.
26. The Power of Legal Strike..
यावरून स्पष्ट दिसून येते कि 'संयुक्त महाराष्ट्रच्या लढया'त बाबासाहेबांचे अमुल्य योगदान राहिले आहे. बाबासाहेबांचे कार्य फक्त शोषित-वंचित समाजापुरते मर्यादित नाही. आज फेक्टरीतला कामगार, व कार्पोरेट मधील अधिकारी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनसंघर्ष विसरता कामा नये.. त्यांनी घटनेद्वारे दिलेल्या कायद्यामुळेच आज ऐशोआरामाचे जीवन जगत आहोत. परंतु आज कामगार कायद्यांचे बदलणारे स्वरूप या विषयी सर्वच कामगार संघटना मुग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांसारखा उठाव का करत नाही हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. बदलत्या कामगार कायद्याची चिंता कुणाला





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com