दिक्षाभूमी RSSच्या ब्राह्मणांच्या ताब्यात कशी ?


 दिक्षाभूमी आम्ही वाचवणारच !

आरएसएसच्या ब्राम्हणांनी नागपूरवर कब्जा करुन नागांची जमीन आणि दीक्षाभूमी ताब्यात ठेवणे हा एक मोठ्या व्यापक षडयंत्राचा भाग आहे !

दिक्षाभूमी RSS च्या ब्राह्मणांच्या ताब्यात कशी ??
हा प्रश्न प्रत्येक जागृत बौद्धाला पडायला हवा.

रा.सू.गवईच्या काळापासून दिक्षाभूमी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे.पंडित शर्मा नावाच्या ब्राम्हणाला गवईंनी दीक्षाभूमी येथे वसवण्याचे काम केले आणि तो ब्राम्हण मरेपर्यंत तिथेच राहिला. या बदल्यातच गवई यांना प्रशासनाने मोठ मोठी पदे दिली होती. इतकेच नव्हे तर दिक्षाभूमीसाठी प्रचंड निधीही दिला होता.  ही गोष्ट उजेडात आणताच RSSला वाटले की समाज जागरूक होत आहे आणि त्यामुळे प्रचंड क्रांती होऊ शकते त्यामूळे नागपुरात RSS च्या ब्राह्मणांना धोका वाटला म्हणून  पडद्यावर ब्राह्मणांची नावे येऊ नयेत मात्र दीक्षाभूमीचे नियंत्रण RSS कडेच असावे अशी योजना आखली त्यामुळे आशिष द्विवेदी, डॉ. निर्झर कुलकर्णी, डॉ.अरविंद पी.जोशी सारख्या ब्राह्मणांच्या हातात सुत्रे दिली गेली हे वर उल्लेख केलेले ब्राह्मण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या जवळचे आहेत.

दिक्षाभूमीवर या ब्राह्मणांचे काय काम आहे ??
डॉ. अरविंद जोशी हा दिक्षाभूमी येथे स्पोर्ट च्या 40 बॅचेस सकाळ सायंकाळ चालवतो त्याला ही परवानगी कोणी दिली ?? RSS आणि सरकारी कार्यक्रमांचे संपूर्ण नियंत्रण या तीन ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली आहे या ब्राह्मणांना दिक्षाभूमीवर आणण्याचे श्रेय मोदी, भागवत, गडकरी, फडणवीस यांना जाते विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भीमाकोरेगाव दंगलीचे सूत्रधार आहेत, तरीही ते RSS च्या कार्यालयात सकाळी RSS च्या ड्रेसमध्ये राहायचे आणि दीक्षाभूमीवर भाषण देण्यासाठी काळा कोट घालून आले. ज्यांनी भीमाकोरेगावच्या लढाईच्या द्विशताब्दी वर्षाला दंगल घडवली, त्यांना दिक्षाभूमीवर येऊच कसे दिले ?

दिक्षाभूमीचा AIM आणि OBJECT अद्याप सापडलेला नाही.लोकांना त्यांचे कार्यक्रम, योजना काय आहेत याची माहिती दिली जात नाही.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागांचा देश असलेल्या नागपुरातील ब्राह्मणी धर्माला लाथ मारून बहुजन, बौद्ध धर्माचा मूळ धर्म पुनरुज्जीवित केला होता.सावरकर, गोळवलकर, दत्ता ठेंगडीपासून RSS च्या सर्व प्रमुखांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीची भीती होती आणि आजही आहे. 

RSS च्या ब्राह्मणांचे हे क्रांतिकारी केंद्र काबीज करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की सदर दीक्षाभूमी विदेशी ब्राह्मणांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मोहीम राबवेल कारण हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे, त्यावर RSS च्या ब्राह्मणांचे काम काय ?

पुष्यमित्र शुंगने मौर्य साम्राज्यात घुसखोरी केली ज्यामुळे त्याला महान सम्राट अशोक यांचा पणतू  सम्राट बृहद्रथ मौर्य याला मारण्याची संधी मिळाली. नागपूरातील बौद्ध या इतिहासापासून धडा घेणार की नाही ? RSS च्या ब्राह्मणांचे समर्थन करणाऱ्या काही देशद्रोही, समाजद्रोही यांच्या पासून दीक्षाभूमीला वाचवावेच लागेल.

 

प्रा.डॉ.विलास खरात
राष्ट्रीय प्रभारी
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, नवी दिल्ली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या