चला व्यक्त होऊ या...

आज आपण सर्वजण एका भीषण स्थितीतून जात आहोत. धर्माना एकमेकांविरुद्ध झुंजविले जात आहे. द्वेषाचा उन्माद असह्य होत आहे. छोट्या छोट्या दंगली घडवून दहशतीचे सावट सर्वत्र पसरविले जात आहे. महागाई, बेकारी, शिक्षण आणि आरोग्य या सारख्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष उडवून धर्माच्या नावाने तरुणांची माथी भडकावली जात आहेत. सत्ता टिकविणे आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी या सगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. आज सर्वसामान्य माणूस महागाई आणि बेकारीने पुरता गांजला आहे. आता तो भयग्रस्त आणि असुरक्षित झाला आहे.

या सगळ्या घटनांमुळे आम्ही फार अस्वस्थ आहोत. आज आम्ही आमची अस्वस्थता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी व्यक्त करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेसाठी खऱ्या अर्थाने शांततेचे, प्रेमाचे आणि आपलेपणाचे होते. महाराजांनी कधीही धर्मधर्मात भेदभाव केला नाही.सर्व अडलेल्यांना पित्याच्या मायेने पोटाशी घेतले. ते खऱ्या अर्थाने रयतेचे कुटुंबप्रमुख होते. आज आम्ही हातात पांढरे स्वच्छ कापड किंवा पांढरा कागद किंवा पांढरे कपडे घालून इथे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पांढरा रंग हा शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे असे आम्हाला वाटते. आम्ही आमची अस्वस्थता फक्त प्रेमाच्या मार्गानेच व्यक्त करत आहोत.

आम्ही असे ठामपणे मानतो की या देशात राहणारे विविध धर्मांचे नागरिक एकमेकांची भावंडे आहेत. आम्हाला आमचे जीवन सुखी करायचे असेल तर आम्ही विविध धर्मांच्या भावंडांनी एकमेकांच्या श्रद्धांचा आणि परंपरांचा मान ठेवून गुण्यागोविंदाने नांदायला हवे. आपल्या प्रत्येकात काहीतरी कमतरता असते. ही कमतरता दूर करण्याचा मार्ग द्वेष आणि हिंसा नाही. प्रेम आणि परस्पर संवादातूनच आपल्या कमतरता दूर करून आपल्या सर्वांचे जीवन अधिक उन्नत आणि समृद्ध बनते.

आमची आपल्याला विनंती आहे की आपला देश विविध धर्म, भाषा, संस्कृतीने नटलेला आहे. प्रेम, सहिष्णुता, सलोखा, विश्वास हे आपल्या जीवनाचा पाया असल्यानेच आपल्या देशाची संस्कृती गेली हजारो वर्षे टिकून आहे. कटुता, अविश्वास आणि संशयाची फळे कधीच गोड नसतात.त्याचे परिणाम कायम घातक असतात. हिंसा आणि द्वेष,  कोण आणि का पसरवत आहे, ते आत्ताच का पसरवत आहेत हे आपण नीट समजून घ्या. आपण सर्वांनी ' ते आणि आपण ' ही खोटी दरी बुजवूया. प्रेमाचे आणि संवादाचे पूल बांधूया. भारतीय संविधानाच्या चौकटीत चर्चा आणि संवादाने आपल्या अडचणीतून मार्ग काढूया. शांततापूर्ण, समाधानी, समृद्ध आणि संवादपूर्ण जीवन जगूया

 नमस्कार.
आमचा मुक्त संवाद साधणाऱ्या लोकांचा एक छोटा गट आहे.  साहित्यिक, चित्रकार, नाटकवाले, कवी, वास्तुशिल्पी, शेती, तंत्रज्ञान, विज्ञान, संगीत, सिनेमा अशा इत्यादी विविध क्षेत्रात काम करत असलेले अभ्यासू लोक त्यात आहेत. अभ्यासपूर्ण मांडणीबरोबर विनाअडसर अघळपघळ अतरंगी गप्पा तिथं मारल्या जातात. समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक अशा अनेक स्तरांवर संवाद होतो. त्यात अल्याडपल्याड वैचारिक छटा आहेत. त्या गटातील बहुतेकांना सध्याचे आपल्या आजूबाजूचे वास्तव बोचत होतं. त्यानं आम्ही मंडळी अस्वस्थ होतो. आमच्यात कोणी राजकीय ताकद असलेली माणसं नाहीत किंवा संघटना वगैरेही काही नाही. 

मैत्री, सद्भाव, प्रेम, सहृदयता आणि खुल्या संवादाला प्राधान्य देणं हेच आमच्या गटाचं बलस्थान आहे. तर गप्पांच्या ओघात काही जणांनी आपण या परिस्थितीत अस्वस्थ आहोत आणि जे सुरू आहे ते आम्हाला पटत नाही असं म्हणण्याचं पत्रक काढायचं ठरवलं. Voice of dissent. पुढे सहीच्या पत्रकासोबत छोटी कृती करू असं कोणी सुचवलं. त्यातून मग साधा कार्यक्रम सुचला. सहमती असल्यास पत्रकावर सही, पांढरा कागद/कापड धरून फोटो समाजमाध्यमावर डकवणे आणि आपापल्या गावातील पोलीस परवानगीने छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पांढरे कागद धरून शांततेने उभं राहणं ठरलं. या तीन पर्यायातील कुठलाही प्रकार कोणीही निवडू शकतो आणि कसलंच बंधन नाही असंही ठरलं.

पत्रक तयार करून आमच्या संपर्कातील मंडळींना ते पाठवलं. त्याला विविध क्षेत्रातील विचारी लोकांनी पाठींबा दिला. २०० च्या आसपास सह्या मिळाल्या. हा वाढता पाठिंबा पाहून आम्ही हे पत्रक सर्वांसाठी आज खुलं करत आहोत.
१) आमचे हे पत्रक वाचून आपणही यात सामील होऊ शकता.
२) सहमत असाल तर  comments/ प्रतिसादात सहमती दर्शवा.
३) यातील कुठलीही कृती कोणालाही बंधनकारक नाही.
नम्र विनंती इतकीच की हे पत्रक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
आपले विनीत,
आम्ही सारे
२६ एप्रिल २०२२

विविधतेत एकतेचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशातील धर्मांमध्ये दुही माजवून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हल्ली हेतुपुरस्सर वरचेवर होत असलेले दिसत आहेत. आपल्या आसपासचा उन्माद, भय आणि सामाजिक ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.  आम्ही या पत्रकाखाली सह्या करणारे भारतीय नागरिक या वाढत्या घटनांमुळे अतिशय अस्वस्थ आणि व्यथित आहोत.
आम्ही सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही मूल्ये मानतो. समाजातील प्रश्न सोडविण्याचा मार्ग परस्पर संवादाचा असतो यावर आमचा ठाम विश्वास आहे. याला अनुसरून आम्ही पुढील कार्येक्रम आखला आहे. महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम कुठल्याही संघटनेचा, पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. तो असा -
१) हे पत्रक वाचून सहमत असल्यास प्रतिसादात आपलं नाव नोंदवा आणि अनेक लोकांपर्यंत हे पत्रक पोहोचवा.
किंवा
२) दिनांक १ मे २०२२ रोजी (महाराष्ट्र दिन) सकाळी ९ ते १० या वेळामध्ये आपण  जिथे कुठे  असू, तिथल्या  जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमून हातात पांढरे कापड किंवा पांढरा कागद किंवा पांढरे कपडे घालून उभे राहू. काहीही न लिहिलेले पांढरे कापड किंवा पांढरा कागद हे फक्त  प्रेमाचे प्रतीक आहे अशी आमची भावना आहे. यावेळात कोणीही भाषण अथवा भाष्य करणार नाही. घोषणा, गाणी, चर्चा असणार नाहीत. लोकांनी उत्सुकता दाखवल्यास सोबत जोडलेले (पत्र २) हे आपण त्यांना द्यावे ही विनंती. शांतता हेच मूल्य तिथे पाळले जाईल. आम्ही आमची अस्वस्थता फक्त प्रेमाच्या मार्गाने व्यक्त करू इच्छित आहोत.
* आपण आपल्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवणार असाल तर आमची आपल्याला विनंती आहे की , या कार्यक्रमासाठी आपण स्थानिक पोलिसांना पूर्वसूचना द्यावी. त्यांनी परवानगी दिली नाही तर हा कार्यक्रम करू नये. शांततेचा भंग करून कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था आपण मोडायचा नाहीये.
किंवा
३) ज्यांना या वेळात कार्यक्रमाला जाणे जमत नसेल त्यांनी हातात पांढरे कापड किंवा पांढरा कागद किंवा पांढरे कपडे घालून आपला फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करून कार्यक्रमात सामील व्हावे.
अर्थात हा सर्व कार्यक्रम बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.
सहकार्याबद्दल धन्यवाद.


आपले विनीत,
तुषार गांधी, अमोल पालेकर, अशोक शहाणे, वसंत आबाजी डहाके, सुधीर आणि शांता पटवर्धन, प्रभाकर कोलते, रंगनाथ पठारे, सुभाष अवचट, जयंत भीमसेन जोशी, प्रा. हरिश्चंद्र थोरात, डॉ. हरी नरके, अच्युत गोडबोले, रामदास भटकळ, डॉ. रझिया पटेल, उर्मिला पवार, संध्या नरे पवार, नीला भागवत, राजन गवस, मुकुंद टाकसाळे, सुनील तांबे, सुमती लांडे, श्रीकांत देशमुख, सतीश तांबे, नीरजा,  प्रेमानंद गज्वी, डॉ. राजीव नाईक, मकरंद साठे, प्रा. अजित दळवी, शफाअत खान, डॉ.चंद्रशेखर  फणसळकर, दिलीप जगताप, डॉ. शरद भुताडीया, अतुल पेठे, सुनील सुकथनकर, पुरुषोत्तम बेर्डे, डॉ.कुमार अनिल, इरावती कर्णिक, मोहित टाकळकर, आलोक राजवाडे, निपुण धर्माधिकारी, शंभू पाटील, गजानन परांजपे, आशिष मेहता, संदीप मेहता, मनस्विनी लता रवींद्र, अरुण कदम, आशुतोष पोतदार, चिन्मयी सुर्वे, वीणा जामकर, निरंजन पेडणेकर, गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, ओंकार गोवर्धन, अभिजित झुंजारराव, अक्षय शिंपी,  सतीश मनवर, दीपक राजाध्यक्ष, दत्ता पाटील,  रवी लाखे, सागर तळाशीकर, सचिन शिंदे, अश्विनी कासार, डॉ.अरुण मिरजकर, रसिका आगाशे, चिन्मय केळकर, सुषमा देशपांडे, उल्का महाजन, डॉ.माया पंडित, विजय तांबे, संध्या टाकसाळे, येशू पाटील, डॉ.मुक्ता पुणतांबेकर, डॉ. श्रुती तांबे,  प्रा. सुभाष वारे, सुनीती देव, ओजस सु.वि., अविनाश कोल्हे, गणेश विसपुते, राजू बाविस्कर, अशोक कोतवाल, अमोल चाफळकर, राजा शिरगुप्पे, अंजली मुळ्ये, राहुल पुंगलिया, सुनील पाटील, गोपाळ आजगावकर, अजित साबळे, रोहिणी पेठे, राहुल लामखडे, मंगेश भिडे, आदित्य संतोष, अरुणा बुरटे, महेंद्र दामले, माधव पळशीकर, मिलिंद चंपानेरकर, सचिन गांवकर, प्रदीप चंपानेरकर, एकनाथ पाटील, मंगेश काळे, अलका धुपकर, आशुतोष शिर्के, प्रा.शैलजा बरुरे, प्रा.मीनल सोहोनी, शुभांगी थोरात, साधना दधिच, सुहिता थत्ते, सूरज कोल्हापुरे, विश्वास कणेकर, रमेश दाणे, प्रदीप खेलूरकर, प्रा. श्याम पाखरे, सुहास कोते, सई तांबे, गणेश वामन कनाटे, उत्पल व बा, वसंत एकबोटे, प्रकाश बुरटे, रेखा ठाकूर, अंजली चिपलकट्टी, शरद कदम, सुभाष लोमटे, मिलिंद मुरुगकर, स्वातीजा मनोरमा, सुहास परांजपे, डॉ.अनंत फडके, रेखा शहाणे, श्यामला चव्हाण, सिरत सातपुते, नीता साने, सुधीर देसाई, इर्शाद बागवान, प्रिया जामकर,  ज्योती केळकर, मेधा कुलकर्णी, अरुणा सबाने, हेमंत कर्णिक, प्रा. वंदना सोनाळकर, प्रा. वंदना महाजन, राजू इनामदार, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, रश्मी रोडे, प्रशांत कोठडीया, हर्षल पाटील, प्रशांत केळकर, अजय कांडर, पंकज भोसले, मुक्ता दाभोलकर, गणेश मतकरी, संदेश भंडारे, संजय बनसोडे, श्रुती मधूदीप, शिल्पा बल्लाळ, डॉ.अजित वाडीकर, डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. रमेश अवस्थी, मनोज पाठक, प्रकाश डाकवे, मेधा पानसरे, सविता दामले, सचिन पटवर्धन, स्मिता गांधी, राजेंद्र साठे, जयप्रकाश लब्दे, डॉ. हमीद दाभोलकर, समीर शिपुरकर, प्रवीण बांदेकर, रोहिणी गोविलकर, प्रमोद निगुडकर, जीवराज सावंत, डॉ. तारक काटे, आनंद चाबुकस्वार, , ज्ञानेश परब, अनिरुद्ध लिमये, जवाहर नागोरी, प्रज्वला तट्टे, श्याम शिंदे,  प्राची माया गजानन, जगदीश नलावडे, अनिश पटवर्धन, दत्ता बाळ सराफ, डॉ.अरुण गद्रे, मिलिंद देशमुख, डॉ. राजेंद्र चव्हाण, करुणा गोखले, शुभम परखड, गीताली वि. मं., धनंजय सरदेशपांडे, प्रणिता भुजबळ, यज्ञेश आंबेकर, दीपा देशमुख, वैशाली रोडे, कृतार्थ शेवगांवकर,विजया चौहान, गोविंद काजरेकर, रफिक सूरज, नीना निकाळजे, रमेश दाणे, संजय रेंदाळकर, मयूर कोठावळे.-

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1