Top Post Ad

आंबेडकरी जनतेची राजकीय शाेकांतीका



डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करतांना राजकीय अपयशी असण्याचे कारण आणि उपाय यांचे चिंतन करावे.वैचारिक मित्र आणि शत्रू माहिती असला पाहिजे,भाजप-सेना क्र.एकचा शत्रू आणि काँग्रेस क्र.दाेनचा शत्रू. हे साधं गणित समस्त आंबेडकरी समाजाला ठाउक आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या शत्रूला म्हणजे काँग्रेसला बाबासाहेबांनी "जळते घर" म्हटलं हाेतं. त्याउपर "काँग्रेस पिळवणूक करनाऱ्याची आणि पिळले जानाऱ्यांची झालेली एकजूट आहे." असं युराेपला जातांना टाईम्स आँफ ईडिया ह्या बातमीपत्राला मुलाखत देतांना म्हणाले हाेते. तरीही रिपब्लिकन नेत्यांनी आंबेडकरी समाजाला काँग्रसच्या दावनीला बांधलं.

१९९८ला एकीक्रूत रिपाईं,काँग्रेस युतीचे चार खासदार दिल्लीत गेलेत,तेव्हा काँग्रेसने सामाजिक परिवर्तन झाल्याचं ढाेल वाजविलं.त्यावेळी अल्पमतातील सरकार पायउतार झालं.आणि १९९९ मध्ये पुन्हा निवडणूकांना सामाेरं जावं लागलं. १९९९ मध्ये रिपब्लिकनचे दाेन खासदार कमी झाले. अवघ्या दाेन हजार मतांनी निवडुन आलेल्या प्रा. कवाडेंचा ७० हजार मतांनी पराभव झाला. २००४ च्या निवडणूकीत कवाडे ९८ हजार मतांनी मागे पडले. रा. सू. गवई तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आणि जवळपास असाच पराभवाचा फटका ईतर रिपाईं नेत्यांना बसला.  सगळ्यांचा दारुन पराभव झाला.पण परिवर्तनाचं ढाेल पिटनाऱ्या काँग्रेसला "आता परिवर्तन कुठे गेलं ?" असा सवाल रिपब्लिकन जनतेनं आणि नेत्यांनीही विचारला नाही.

आंबेडकरी समाजाचं थाेडही भय नसल्याने आपण कितीही तुकडे केले तरी त्याला वजन प्राप्त हाेताे,असा ह्या नेत्यांचा गैरसमज झाला.म्हणूनच सकल रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येवुन आपल्या पराभवाची कारणे शाेधुन नव्यानं राजकीय खेळी आखन्याऐवजी एकीक्रुत रिपाईची फाटाफुट करुन नवी रिपब्लिकन पिलावळ जन्माला घातली. पिरिप,प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष,आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष,........ ईत्यादी रिपब्लिकन गटांची, तुकड्यांची मालीका तयार झाली. ही मालीका पहान्याचं दुर्दैव समाजाच्या वाट्यास आलं. त्यामुळे आता आपण कुनावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न समाजाला न पडला तरच नवल ! कधी कवाडे, कधी आठवले,कधी गवई आणि कधी प्रकाश आंबेडकर ईत्यादींचा पर्याय ह्या समाजापुढे ऊभा राहीला. भांबावलेल्या समाजाला तर्कसंगत विचार करुन याेग्य निर्णयाप्रत येवून ठेपता आलं नाही.  प्रत्येक गटाला रिपब्लिकन हे नांव चिकटलेलं. प्रत्येकांचा निळा झेंडा. मग कुनाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा? समाजाचा भावनिक छळ हे नेते करीत राहले. 

रिपब्लिकन ऐक्याच्या घाेषनांनी हा समाज अनेकदा आनंदुन गेला.आणि अनेकदा त्यांच्या आनंदाला ग्रहन लागलं.अनेकदा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं. पण कुणी कुणाचं ऐकेनात म्हणून ते फुटलं. ऐक्य दुभंगन्याचा हा ईतिहास बघा- १९५९,१९६३ आणि १९८९ मध्ये ऐक्य फुटलं हाेतं. ६ डिसेंबर १९९५ ला झालेलं ऐक्य टीकेल असं समस्त आंबेडरवाद्यांना वाटत हाेतं. कारण रिपब्लिकन नेत्यांनी तसं सबळ वचन दीलं हाेतं. २८/१/१९९६ ह्या नेत्यांनी दीलेल्या प्रतिक्रिया बघा, 
१) प्रकाश आंबेडकर :- ऐक्य फूटु नये म्हणून तुम्ही जनतेने हातात घेतलेला जाेडा तसाच ठेवा. कारण ताे आम्हला दिसायला पाहीजे. त्याची आम्हाला सतत भिती वाटायला पाहीजे. 
२) रा. सू. गवई :- जातीविरहीत समाज निर्मान करन्याचे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करन्यासाठी समाजातील सर्वच मागास घटकांनी रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली येण्याची गरज आहे.
३) रामदास आठवले :- निवडनुकीत काेनत्या पक्षाला मदत करायची या प्रश्नावरुन ऐक्य किंवा पक्ष फुटनार नाही. अशी निःसंदिगद्ध शब्दात ग्वाही देताे. 
४) प्रा.जाेगेंद्र कवाडे :- काेणी पुन्हा बाहेर जान्याचा विचार जरी केला तर जनता त्याला काठी,दगड, जुन्या ठेवनातील हत्त्यारे आणि बंदुका ऊचलुन नेत्यांना वठनीवर आणल्याशिवाय रहानार नाही.त्यांना उद्याचा उगवत सूर्य दिसणार नाही,
५) बी. सी. कांबळे :- रिपब्लिकन ऐक्य महान आहे . ते आता आम्ही गहान ठेऊ देनार नाही.रिपब्लिकन नेत्यांनी असे सबळ वचन देवुनही वचनभंग केला.अनेकदा ह्या नेत्यांनी एकमेकांवर आराेपांच्या फैरी झाडल्या हाेत्या. त्याची काही ऊदाहरने पहा 
प्रा.कवाडे:- रामदास आठवलेंची माझ्या जाेड्याजवळ उभा राहन्याची लायकी नाही. 
राजा ढाले:- बी.सी.कांबळे यांना गवईंनी पैसे देऊन विकत घेतले. 
वा.काे.गाणार:- प्रकाश आंबेडकर यांना पक्षातुन काढुन टाका..........

 रिपब्लिकन नेत्यांची ही शाब्दीक चकमक बघीतली तर चाैदाव्या लाेकसभेसाठी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचं नाटक केलं जाईल अशी सुतराम शक्यता नव्हती. पण नेत्यांनी आपलं राजकारण साेडलं नाही.
ऐक्य चर्चेसाठी परत निमंत्रणं धाडली गेली. ह्यावेळी दुभंगलेलं ऐक्य आणखी तिळभर दुभंगलं. कारण प्रकाश आंबेडकरांनी दाद दिली नाही. १९९८ च्या यशानंतर रिपाईं नेत्यांनी हेव्यादाव्यांना अधिक महत्व दिलं. सामान्य आंबेडकरी समाजाला काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहेत.......ईत्यादींशी नेत्यांना काही घेणेदेणे नाही. हे नेते निवडनुकीत मतांचा जाेगवा मागायलाच बौद्ध वसत्यांमध्ये फिरतात त्यानंतर ते दिसेना हाेतात. निवडणूकांचा हंगाम आला की वसत्या निळ्या हाेतात,पांढऱ्या हाेतात.   

आंबेडकरी जनतेनं अशा विदूषकी नेत्याना धडा शिकवायची वेळ आलीय. कारण बाबासाहेबांनी सांगुन ठेवलंय,दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिनारे किंवा भाडाेत्री कामे करनारे लाेक तुम्ही निवडाल तर ते तुमची फाटाफुट करतील. ते तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहनार नाही.तरी अशा नामधारी पुढाऱ्यांपासुन सर्वांनी सावध राहायला हवे. बाबासाहेबांचा ह्या समाजाला असा सावधतेचा ईशारा हाेता. मग त्यांच्या जनतेला हा ईशारा माहीत नाही असं समजायचं का? आणि माहीत असेल तर समाजाने गंभीर दखल का घेतली नाही?  समाजाने रिपब्लिकन पक्षांच्या गटांवर मालकी हक्क सांगनाऱ्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायची वेळ आलीय.नाही तर समाज असाच दुभंगत जाईल. बाबासाहेबांचं नाव घेत आनखी नव्या पक्षांची निर्मिती हाेईल. गवईंचं समर्थन करनारा कार्यकर्ता कवाडेंकडे उडी घेताे. ताे तिथेही फार काळ टीकत नाही. लगेच आठवलेंचं समर्थन करीत गट बदलताे.पण हा कार्यकर्ता ईथेही निष्ठावंत राहात नाही. ताे आठवलेंना कधी विसरताे हे कळायच्या आत त्याचं नाव प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांच्या यादीत बघावयास मिळते. आणि तिथेही राजकीय भविष्य दिसत नाही म्हणून ताे सेना भाजप काँग्रेसचे तळवे चाटताे. पायातील जाेडा बदलावा तसा रिपब्लिकन कार्यकर्ता पक्ष बदलताे. 

बाबासाहेबांच्या कल्पनेतुन जन्मास आलेल्या रिपब्लिकन पक्षाची चाैफेर परवड झालीय. सर्व गटांचं अस्तीत्व धाेक्यात आलंय.आंबेडकरी समाजाला चिंतनशिल करनारी ही गंभिर बाब आहे. आंबेडकरी समाजाची ही फार माेठी शाेकांतिका आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतांना त्यांच्या राजकीय चळवळीचा हिशेब कोणी मांडत नाही, म्हणूनच शत्रूच्या पैसावर भिम जयंती साजरी करणे थांबवा स्वबळावर स्वाभिमानी बनून १३१ वी भिम जयंती साजरी केली तरच आंबेडकरी जनतेची राजकीय शाेकांतीका थांबेल,नव्हे ती थांबलीच पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जय जय कार होईल.

राजू बाेरकर ७५०७०२५४६७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com