बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनवणाऱ्या काशीबाई गायकवाड

 


काशीबाई गायकवाड..(आजी)

बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनवणाऱ्या ९३ वर्षाच्या काशीबाई गायकवाड यांची खास मुलाखत..
आठवणीसह जपून ठेवले पितळेचे ताट, वाटी, तांब्या, ग्लास या भांड्यासह आठवणींना उजाळा...
बेटा काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी?
मला आजही ते दिवस आठवतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळेगावातील या बंगल्यात शिरताच मला आवाज देत. "बेटा काशीबाई, आज काय बेत केलाय आमच्यासाठी!"
आवाज कानी पडताच मी आधीच तयार केलेले आरतीचे ताट, निरंजन घेऊन सामोरी जायची, बाबासाहेबांना ओवाळायची. पाया पडून आशीर्वाद घेऊन स्वयंपाकाच्या कामाला सुरुवात करायची. बाबासाहेबांना आवडणाऱ्या भाज्या व भाकरीचे रुचकर जेवण त्यांच्यासाठी बनवायची. त्यांना पोटभर खाऊ घालण्यात मला धन्यता वाटायची. केवळ बाबासाहेबांच्या सेवेतच नाही, तर त्यांच्या परिवर्तनाच्या लढ्यातील एक अनुयायी मी होते. सासरे बाबासाहेब तळेगावच्या वास्तूत एकूण ४८ वेळा आले. क्वचित मुक्कामीही थांबले. त्यांची सेवाशुश्रूषा करण्याचं काम आमचे कारभारी दत्तोबा गायकवाडांचे कुटुंब मोठ्या आत्मीयतेने करायचे आमचे कारभारी आज हयात नाहीत; पण
लिंबाजी अमृतराव गायकवाड मावळातल्या धामण्याचे सधन शेतकरी आणि बड़े कंत्राटदारही होते.
बाबासाहेबांनी तळेगावची जागा त्यांच्या अथक परिश्रमाने मिळाली होती.
बाबासाहेबांच्या व त्यांच्या आठवणी
कायम हृदयात जपून ठेवल्या आहेत. "बाबासाहेब तळेगावात येणार असल्याची माहिती आदल्या दिवशी
तहसील कचेरीतून मिळताच, आम्ही दोघेही सकाळपासून कामाला लागायचो. त्यांनी वाण्याकडून टपकळ बाजरी आणावी. ती निवडून माहेरच्या एखाद्या आई-बाईला बोलावून जात्यावर दळावी. बाबासाहेबांना जात्यावर दळलेली आणि हातावर थापलेली, चुल्हागणावर गरम गरम खरपूस भाकरी बेहद्द आवडायची. शिवाय बाबासाहेब आवडीने भात खायचे तो आंबेमोहर. हा आंबेमोहर धामण्याच्या शेतातलाच असायचा. भाजीचे म्हणाल, तर बाबांना मेथीची भाजी खूप आवडायची. मुगाच्या डाळीचे वरण, कधी शेंगदाणा, तिळाची चटणी तर कधी कधी जवसाची. एवढ्या जेवणावरही ते खुश होत; पण कधी सांगावा धाडून बोंबलाची चटणीही करायला लावीत. चुलीच्या हारात भाजलेल्या कांडक्या, पात्याचा कांदा, मसाल्यात डवचून तव्यात उलथापालथ करून दिलेली चटणी बाबांनी मागून मागून खावी आणि मी प्रेमाने वाढत राहावी. हातावरच्या दोन भाकऱ्या खाऊन ते तृप्त झाल्याचे पाहून आनंद वाटायचा. येथील बंगल्यात त्यांच्या येण्याने मावळची ही भूमी पावन झाली आहे.
(शब्दांकन: ज्ञानेश्वर भंडारे)
(संदर्भ लेख लोकमत वृत्तपत्र दि १४ एप्रिल २०२२)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या