Top Post Ad

श्रीस्वामी समर्थ

 दि. १९ जुलै १९९४ रोजी संपादक डॉ. दिपक टिळक यांच्या सह्याद्री अंकात दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजेच साईबाबा हा लेख प्रसिध्द झाला. लेखक अरुण ताम्हणकर यांनी गौप्यस्फोट करतांना एका अज्ञात साधुचा आधार घेतला आहे. त्यांचा हा लेख मूलनिवासी नायककडे उपलब्ध आहे. ताम्हणकर या लेखात जे म्हणतात त्यातील साररुप -

सदाशिवराव पेशवे हेच स्वामी समर्थ, तात्या टोपे हे शेगावचे गजानन महाराज तर  दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजेच साईबाबा. लेखकाला (ताम्हणकर) या स्वामी महाराज व बाबांचे प्रकटीकरण मान्य नाही. ही बाबा मंडळी अचानक प्रकट झालीच कशी? माणसाप्रमाणे आई-बापाच्या पोटी जन्माला का आली नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर  स्वजातीबद्दल आपण भलतंच बोलून गेलो. म्हणून ताम्हणकरांनी जे तोंड बंद केले ते पुन्हा कधीच उघडले नाही. ब्राह्मणांनी स्वामी समर्थ महाराजांचे अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आहेत. अक्कलकोट, मंगळवेढा, चिपळूण, अहमदनगर, कल्याण, दादर, गिरगांव या प्रमुख संस्थानात (मठात) दरवर्षी स्वामींचा प्रकट दिन साजरा होतो. या प्रत्येक मठात एक रिकामे सिंहासन आहे. कारण फक्त ब्राह्मणच जाणतात की, स्वामी समर्थ पेशवा सदाशिवराव हेच आहेत. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष काही मठांना भेट देवून स्वामींच्या बखरीचा व चरित्राचा अभ्यास केला आहे.

 या लेखाचा हेतु कोणाच्याही भावना दुखावणारा नाही. सर्व सामान्यांना सत्य इतिहास ज्ञात व्हावा तसेच त्यामागील  कारस्थानाची उकल व्हावी, गुढ समजावे व अंधश्रध्देचा नायनाट व्हावा हा आहे. 

पानीपतची तिसरी लढाई दि. १३ फेब्रुवारी १७६० रोजी पटदूर येथे विश्वासराव पेशवे यांचे सोबत सदाशिवराव पेशवे यांना मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. ग्वाल्हेर मार्ग. दि. ३० मे १७६० रोजी तोफखाना, रसद, बाजारबुणगे, बायका, घोड्दैळ घेवून सव्वालाख फौज निघाली. अहमदशहा अब्दालीला खलीता पाठविण्यात आला. अब्दाली सावध झाला. तो कुशल सेनापती होता. त्याउलट पेशव्यांकडे मुत्सद्देगिरीचा अभाव होता. सदाशिवराव हे उर्मठ, हट्टी, उद्दामी स्वभावाचे होते. (ही बाब ब्राह्मण कांदबरी लेखकांनी रेखाटली आहे.) दि. १४ जानेवारी १७६० रोजी पानीपत येथे लढाई झाली. विश्वासराव यांना गोळी लागून मृत्यू आल्यानंतर सदाशिवराव धायधाय रडत बसल्यामुळे सैन्याचे मनोधैर्य खच्ची झाले. सदाशिवरावांनी अशा प्रसंगी न डगमगता रणांगणात उभे राहणे गरजेचे होते. अचानक सदाशिवराव धुमश्चक्रीतून गायब झाले. (म.यु. भा. इतिहास पान क्र. ११२) इतिहासात पानीपतच्या लढाईचे वर्णन सव्वा लाख बांगड्या फुटल्या असे केले आहे. स्वामी समर्थ नेमके मंगळवेढ्याला १७६०/६१ याच सुमारास आले, असा बखरीत स्पष्ट उल्लेख आहे. अशा तऱ्हेने स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी पानीपत लढ्याचा घटनाक्रम जुळतो.

मंगळवेढ्याचे गावकरी हा कुणीतरी नागडा राहाणारा, वेडा मनुष्य आहे असे मानीत. काही वर्षातच या वेड्या तरुणाचा दिगंबर बाबा झाला. इ.स. १८१८ साली कोकणातील ब्राह्मण गोपाळबुवा केळकर यांनी स्वामीची पहिली बखर लिहिली. गोपाळबुवा हे स्वामीचे अंतरंग (गुप्त गोष्टी) माहित असलेले शिष्य होते. त्यानंतर दि ९ मे १९७५ रोजी बखरीचे पुनर्लेखन करण्याचे काम रामचंद्र चिंतामण यांनी केले. अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म कोठे झाला ? ते लहानाचे मोठे कोठे झाले ? तसेच त्यांचे माता-पिता कोण होते? त्यांची जात कोणती होती ? यापैकी एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही असे बखरीत लिहिले आहे. स्वामी मंगळवेढ्याला १२ वर्षे राहात होते. मंगळवेढा गावातील लोक त्यांना कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजत. येथील एका गरीब बसप्पा तेल्याच्या घरात जबरदस्तीने राहाणारा हा नागडा तरुण शेंदूर लावलेल्या दगडावर मुतायचा. स्मशानात कबरीवर संडासला बसायचा. कधी कधी तर बसप्पाच्या चुलीत संडास करायचा. परंतु बसप्पाची पत्नी मात्र आपला नवरा कुठून या वेड्याच्या मागे लागला म्हणून ती दुःखी होती. मोलमजुरी करुन पोट भरणारे तेल्याचे कुटुंब गरीबीत दिवस काढीत होते.  कधी कधी तर बसप्पाच्या कुटुंबियांना घरातून हाकलवून देत व काठी घेवून स्वामी दारात बसत. मात्र एक दिवशी अचानक बसप्पाच्या कुटुंबाला सोन्याची लगड मिळाली आणि या गरीब कुटुंबाची कायमची गरीबी नाहिशी झाली?  प्रत्यक्षात स्वामींना भेटण्यासाठी मालोजीराव पेशवे मंगळवेढ्याला येत होते. त्यांनी स्वामींचा महिण्याचा खर्च बसप्पाला देण्याची व्यवस्था लावून दिली होती. पेशव्याकडून महिना अर्थसहाय्य येताच गणपत चोळप्पा हे सेवेकरी मंगळवेढ्याला स्वामीच्या सेवेसाठी रुजू झाले.

स्वामी मंगळ वेढ्याला असतांना जेव्हा त्यांना वेडाचा झटका येई तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी एक उपाय म्हणून सेवेकरी गावातील वेडी सरस्वती सोनारीन हिला घेऊन यायचे. ही वेडी बाई हातात काठी व काखेत चिंध्याचे बोचके घेऊन सेवेकरांच्या मागे पळे. सेवेकरी म्हणत ज्ञानोबा तुकाराम लगेच दुसरा म्हणे बोडकीचे काय काम ? हा प्रकार पाहून स्वामी गदागदा हसायचे. इतके त्यांचा पलंगही हलायचा.१२ वर्षे मंगळवेढ्याला राहिल्यांनतरही स्वामीच्या मानसिक स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अक्कलकोटला चिंतोपंत यांचेकडे एरंडाची सुकलेली लाकडे आणायचे त्यांचे वितभर तुकडे करायचे. त्यामध्ये माती ठासत. पाच-पाच, सात-सात तुकडे त्रिकोणाकृती पलटनीत सैन्य बंदुका लावून ठेवतात. त्याप्रमाणे घोंगडीच्या  एका बाजूला लावून ठेवीत. असा. उपक्रम महिनो-महिने चाले. महाराज, काय करता? असा कोणी प्रश्न विचारला तर पलटणी तयार करतो असे उत्तर द्यायचे. त्यानंतर स्वामी अक्कलकोटला दुसरा खेळ खेळू लागले. अक्कलकोटला लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे. तेथे जाऊन तोफेच्या तोंडात डोके खुपसून तासन् तास बसायचे. बुधवार पेठेत बडबडायचे अब हिंदु कुछ नही घोडा गया, हाथी गया, पालखी गया, सब कुछ गया मध्येच ओरडायचे सरबत्ती लगाव ! हा पानीपतच्या पराभवाचा परिणाम होता? 

आजपावतो पेशव्यांचे गुणगान करायला सदाशिव पेठी लेखक, प्रकाशक थकले नाही. अटकेपार झेंडे लावले याच पराजयाला म्हणतात असेच वाटते! स्वामी व राऊ कादंबऱ्यामध्येही तोतया म्हणून याच पागलपणाचे वर्णन केलेले आहे.जो पेशवा अटक होता तो काय वेडा होता ? तो काय तेथून वेडाचे सोंग करुन पळून गेला असे नाना प्रश्न कादंबरी वाचणाऱ्यांना जरी वाटले नसतील कारण कादंबरी आहे. पण इतिहासात असे उत्पन्न होतातच! 

स्वामी एका जागी कधीच बसून रहात नव्हते. दिवसातून सात आठ ठिकाणे बदलायचे म्हणून लोक त्यांना चंचल भारती असेही म्हणत. अक्कलकोटला स्वामींसाठी आश्रमाची स्वतंत्र सोय करण्यात आली.  ब्राह्मणी खोपडीने अशा प्रकारे वेड्या सदाशिवरावांचा स्वामी समर्थ महाराज केला होता. स्वामींच्या दर्शनाने तुमचे आमचे सर्व प्रश्न सुटतात. भाकड गाई दुध देतात. स्त्रियांना मुले होतात. असा प्रसार प्रचार आजुबाजुच्या परिसरात केला. प्रचारांना एक भाग म्हणून भक्तगणात ब्राह्मण स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असे. पेशव्यांच्या दप्तरखान्याच्या दस्ताऐवजाप्रमाणे ब्रम्हेंद्रस्वामी धावडशीकर हे स्वामींच्या रुपात सावकार व बदफैली आचरणाचे होते. ब्रम्हेंद्रस्वामीजवळ सुमारे वीस स्त्री नोकर असत. ज्या-ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य असे त्या त्या ठिकाणी या दासी स्त्रिया जात असत. त्यातील काही प्रसिध्द दासींची नावे याप्रमाणे सजनी, गंगी, सोनी, लक्ष्मी, मानकी, नागी, राधी, गोदी, नथी, कृष्णी, यशोदा, नयनी, आनंदी इ. या सर्व पेशव्यांकडून भेट म्हणून आलेल्या दासी होय. असे जानकारांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर ज्यांना संतती प्राप्ती होत नाही अशा स्त्रियांना महाराजाकडे आणीत स्वामींचा विशिष्ट प्रसाद देण्यात येत असे त्यासाठी रात्रभर मठात रहावे लागे. हा सारा प्रताप पेशव्यांच्या बळजबरीपणाने झाकला जाई. हीच रित स्वामी समर्थाची ही होती असे दस्ताऐवजावरुन व आख्यायिकेवरुन सिध्द करता येते. 

आता स्वामींच्या दर्शनाला अधिक भक्तगण येऊ लागले. आश्रमात गाई, बकऱ्या, कुत्री, मांजरे यांची संख्या वाढली. स्वामींना दर्शनासाठी तयार करण्यात येई. केशर कस्तुरीचे मिश्रण करुन कपाळाला पेशव्याप्रमाणे गंध लावण्यात येई. स्वामी कधी दाढी ठेवत कधी काढत ते लहरी स्वभावाचे होते. स्त्रियांच्या सत्राला पुरुषांना प्रवेश नव्हता. कधी स्वामींना साडी चोळी घालून बसविण्यात येई, परंतु स्वामींना जास्त करुन लंगोटी लावून बसणे अधिक पसंत होते. मुंगी पैठणची विठाबाई ही सुध्दा काही काळ स्वामींची सेवेकरी होती. एकदा तिने सेवकरी चोळप्पा व गणपत यांना घेऊन पंढरपूरला जायचे ठरविले. हे स्वामींना समजले. त्यांनी सर्व जमलेल्या स्त्रियांसमोर  विठाबाईला विचारले काग? विठोबाचे लिंग धरायला अजून गेली नाहीस?  विठाबाई म्हणाली आपणच माझे विठोबा मी पंढरपूरला कशापाई जाऊ? हा सर्व प्रकार ऐकून मुल होण्याच्या कार्यशाळेतील सर्व स्त्रियांनी माना खाली घातल्या. (स्वामी समर्थ बखर पान क्र. ४६). 

दिवसागणिक अक्कलकोटला भक्तांची संख्या वाढत गेली तसा संस्थानाच्या पैशाचा ओघही वाढला. याच सुमारास सुंदराबाई नावाची तरुण विधवा स्वामींची सेवकरी बनली.  स्वामींना जेवायला घालणे, आंघोळ घालणे, दर्शनासाठी तयार करणे ही कामे सुंदराबाई स्वतः करायची. तिने स्वामींना उठा म्हटले की ते उठायचे, झोपा म्हटले की झोपायचे. इतकेच नव्हे तर भक्तदर्शनासाठी सुंदरा स्वामींना खेटून पत्नीप्रमाणे बसू लागली! संस्थानातील बेहिशोबी पैसा सुंदराबाई हडप करु लागली. या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर शिष्यांनी सुंदराबाईला उचलून खेचत नेली व तुरुंगात टाकली. स्वामी अवतार होते पण बाईलवेडे होते, शेवटी प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. हे अवतार पण नसून ढोंग होते हे सिध्दच झाले आहे. 

स्वामींच्या बखरीत २६४ प्रकरणे आहेत. ती सर्वच देणे शक्य नाही,  तरीही कर्वे  नावाचा ब्राह्मण स्वामींना भेटायला आला. कर्वे याची तरुण मुलगी बिघडली होती. स्वामी म्हणाले, होळी करा, कर्वेना तर धक्का बसला. त्यांनी स्वामींना विचारले आपली ज्ञाती कोण ? स्वामी म्हणाले, युजुर्वेदी ब्राह्मण, - गोत्र-काश्यप, रास -मीन, हे ऐकून कर्वे तिथून निघून गेला. मात्र काही दिवसांनी कर्वेच्या मुलीचे होलीका दहन झाले म्हणजेच जाळण्यात आले (स्वामी समर्थ बखर पान क्र. ५८) 

स्वामी समर्थांनी सत्तरी ओलांडली होती. आता ते वार्धक्याकडे झुकले होते. अक्कलकोटला स्वामी एकूण तेवीस वर्षे राहिले. इ.स. १८०० मध्ये त्यांना मृत्यू आला. स्वामींच्या प्रेतयात्रेला अंबारीचे हत्ती, सजवलेले घोडे, तोफदार, पायदळ, जरीपटक्याचे पेशवे, निषाण, दारुकाम करणारे असा लवाजमा होता. स्वामींना भरजरी पोशाख व अलंकार घालण्यात आले. स्वामीना अंत्ययात्रेनंतर शेवटी सुगंधी पेटीत बंद करण्यात आले असे बखर म्हणते. या अंत्ययात्रेला स्वामीचे भक्तगण घोषणा देत होते. श्रीस्वामी समर्थ महाराज की जय! परंतु प्रत्यक्षात १४ जानेवारी १७६१ रोजी रणांगणातून पळून गेलेले सदाशिवराव पेशवे यांचा अंत झाला होता.

स्वामींना मंगलवेढ्याला असताना पेशव्याकडून मिळणारे अर्थसहाय्य काहीही बंद करण्यात आले नाही. स्वामींनी  एकदा शिव्या देत मालोजीरावांना कानपट्टीत मारली. त्याचे प्रमुख कारण हेच होते की, स्वामी समर्थ हेच सदाशिवराव होते. पुढे हाच प्रयोग तात्या टोपे व नानासाहेब  पेशवे यांच्याबाबतीत करण्यात आला. कारण ब्राह्मण वेड्या माणसाला  स्वामी बनवू शकतात तर धड असलेल्या तात्या टोपेंना गजानन महाराज तसेच नानासाहेब पेशव्यांना शिर्डीचे साईबाबा का बनवू शकत नाहीत ? 

इंग्रज सरकारच्या विरोधात अनेक सशस्त्र लढे झाले. त्यापैकी  इ.स.१८५७ चा लढा एक संघटीत प्रयत्न होता. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुध्द केलेला हा उठाव अयशस्वी झाला. पराभवानंतर इंग्रजांच्या हाती लागू म्हणून बंडाचे नेतृत्व करणारी मंडळी भूमिगत नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, रंगो बापूजी साधू किंवा गोसाव्याच्या रुपात स्थलांतर करीत होते. (रंगो बापूजी प्रबोधनकार क्र. २७०) तात्या, रंगो आहेत. त्यावेळी डझनभर लोकांना फाशी दिली. त्यात तात्या टोपेही होते.  मात्र  त्यांच्या नातेवाईकांनी प्रेते ताब्यात न घेता ते हे नाहीत असे म्हटले, याबाबत दैनिक जागरणमध्ये तात्या टोपे यास फासावर लटकाविले. तो दुसराच कोणीतरी होता, असे वृत्त छापून आले, त्यामुळे यास पुष्टी मिळते.

लेखक ताम्हणकर म्हणतात, तात्या टोपे वर्णन शेगावच्या गजानन महाराजांशी मिळते जुळते आहे. शेगावचा प्रकट झालेले तात्या टोपे आहेत असा ठाम दावा आहे.  साईबाबा व गजानन महाराज एकाच कालखंडात होऊन गेले. दोघांच्या चरित्रात दोघांची भेट झाल्याचा उल्लेख नाही. परंतु गजानन गेले तेव्हा शिर्डीत साईबाबा माझा गजानन गेला रे... म्हणून शोक करत होते. मुळात ही मंडळी संत नव्हतीच. ब्राह्मणांनी बनविलेली बहुरूपे होती. हे त्यांच्या चरित्रावरुन स्पष्ट होते. सुख- दुःखांच्या पलीकडे गेलेल्या संतांकडून हे अपेक्षित नाही.  परंतु आपला सेनापती वारल्याचे दु:ख पेशवे नानासाहेबांना झाले.

केसरी प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या घराण्याचा या पुस्तकात लेखक प्र.ग. ओक म्हणतात, दुसऱ्या बाजीरावाने ७ जून १८२७ रोजी गोविंद माधवराव भट या मुलास १८२४ साली दत्तक घेतले.  म्हणजेच १८५७ च्या बंडात दुसरे नानासाहेब पेशवे हे ३२ वर्षांचे होते. नानासाहेब पेशव्यांना संस्कृत, पर्शियन (इराणी), उर्दु या भाषांचे ज्ञान होते. नानासाहेब पेशवे हे नेहमी किनरवापी अंगरखा परिधान करायचे. शिर्डीच्या द्वारकामाई चावडीजवळ साईबाबाचा छत्री घेऊन किनरवापी अंगरखा घातलेला फोटो सर्वांच्या परिचयाचा आहे. इ.स. २८ फेब्रुवारी १८५६ रोजी इंग्रजांनी नानासाहेब पेशवे यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते. वर्ण-गव्हाळ, मोठे डोळे, उंची सहा फुट दोन इंच, नाक सरळ आकाराचे सोबत तुटलेल्या कानाचा नोकर असे वर्णन जाहीर केले होते. नानासाहेब असे समजून दुसऱ्या व्यक्तीसच फासावर लटकाविले होते. वास्तवात नानासाहेब पेशवे फरार झाले होते, नानासाहेब पेशवे हे कधीच परागंदा झाले होते. साई हे नाव ब्राह्मणांनी येशू ख्रिस्ताच्या ईसाच्या उलट साई घेतले आहे. वेड्या सदाशिवराव भाऊला स्वामी समर्थ बनवू शकतात. तर नानासाहेब पेशव्यांना शिर्डीचा साईबाबाही बनवू शकतात. या स्वामी, बाबा, महाराजांना लोकांना शिव्या देण्याची सवय होती. तसेच स्वामी समर्थ यांची चावडी कठडा हा शिर्डीच्या साईबाबा चावडी व लाकडीकठड्या सारखाच आहे व त्या कठड्यावर हात ठेवण्याची पध्दतीही एकच आहे हे विशेष ! दुसरे विशेष म्हणजे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज यांना व्यसनेही फार होती. यापैकी गजानन महाराज गांजा ओढतानाचे छायाचित्र फारच प्रसिध्द आहे. 

प्रा.विलास खरात /  एन.जी.पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com