काही लोक दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातले ओवैसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहे. या विषयावर सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत. त्याच्या वरती काही कार्यवाही सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भोंग्याचं राजकारण झालं होतं. असा स्पष्ट आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला. ते आज आपल्या मुंबईतील निवासस्थानी बोलत होते.
आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवरती कधी तणावाचं वातावरण नव्हतं. कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. या राज्यातील वातावरण तनावाच करण्याच षड्यंत्र देखील रचलं होतं. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे. काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे. पुरंदरे हे त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाही त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. असे म्हणत पुरंदरे विषयावर भाष्य करण्याचे राऊत यांनी टाळले.
0 टिप्पण्या