Top Post Ad

एल्गार! - विवेक मोरे

 

     २९ सप्टेंबर २००६. खैरलांजी येथील भैय्यालाल भोतमांगेचं संपूर्ण सुशिक्षित कुटुंब जातीयवादी नराधमांच्या डोळ्यात खुपू लागलं होतं. का? तर हे कुटुंब मागासवर्गीय असूनही कोणाचीही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने जगतय. आणि हेच सहन न झाल्याने गावातल्या सवर्णांनी या कुटुंबावर सामुहिक हल्ला करुन, बलात्कार करुन या कुटुंबाला नेस्तनाबूत करुन टाकले. 

      याची पहिली खबर मला राजाराम खरातांनी फोनवर दिली. त्यावेळचं आंबेडकरी राजकारण फारसं वेगळ नव्हतं. म्हणजे आठवलेंची काँग्रेस बरोबर युती होती.  कवाडे सरही काँग्रेसच्याच गोटात होते. प्रकाश आंबेडकर यावर भूमिकाच घ्यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीतही आंबेडकरी जनता खैरलांजीच्या प्रश्नावर रस्त्यावर आली होती. मात्र आमचे म्हणविणारे हे हरामखोर नेते मौन साधून होते. राजाराम खरातांचा मला संध्याकाळी फोन आला होता. त्यावेळेस मी दादरच्या ब्रीजवर चालत होतो. ब्रीज उतरताच चळवळीतलाच एक अभ्यासू विद्वान मित्र मला भेटला.

     या बौध्द मित्राला मी संपूर्ण हकीगत ऐकवली. मी त्याला म्हटलं, आपण यावर काहीतरी करायलाच हवे. त्यावर त्या विद्वान मित्राने माझे हात झटकले आणि तो मला म्हणाला, हा आमचा प्रश्न नाही. मी म्हटलं, म्हणजे तुमचा प्रश्न तरी कोणता आहे? यावर तो मला म्हणाला, जो आमच्यावर अन्याय करतो त्याचं मतपरिवर्तन करणं हे आमचं मिशन आहे. मी त्याला म्हटलं, अरे मग हे तर चांगलच मिशन आहे. पण मग या मिशनच्या पूर्णत्वासाठी तुम्ही काहीतरी कालमर्यादाही निश्चित केली असेल ना!. कारण बाबासाहेबांनीही प्रतिगामी हिंदूना सुधारण्यासाठी काही लिमिटेशन्स दिले होते. त्यावर तो विद्वान मित्र उत्तरला की, अजिबात नाही. या मिशनसाठी पन्नास वर्षे होवो, शंभर वर्षे होवो, आमचं हे मिशन अविरत चालूच राहणार आहे. मग मात्र माझी खोपडी सटकली. मी त्याला म्हटलं, अरे भडव्या जर हेच तुझ्या आई, बहिणीबाबत झाले असते तर तू त्यांना उभा चिरले असतेस की त्यांचं मतपरिवर्तन करत राहिला आसतास? यानंतर मात्र आजतागायत या मित्राचे मी तोंडही पाहिलेले नाही.

      आणि मग त्याच रात्री अत्यंत उद्विग्नतेत मी जे काही वहीवर खरडले ती म्हणजे ही कविता. अर्थात कवितेत आलेले संदर्भ जरी तत्कालीन असले तरी आजही त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. आजही आमच्यावर अत्याचार होतच आहेत आणि आमच्या गांडू नेत्यांवर त्याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. तर मित्रांनो ही कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे. काही स्वांतसुखाय बौद्धांना ही कविता रुचणार नाही. पण साध्या मुंगीलाही तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न केला तर तीही तुम्हाला चावा घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आपण तर माणसे आहोत. अशावेळी जर आपल्यातला पँथर चवताळून उठत नसेल तर आपण मुंगीपेक्षाही गये गुजरे आहोत, हे समजण्यास हरकत नाही. तर माझी ही कविता. कवितेचं नाव आहे 'एल्गार!'

काढा नग्न धिंड यांच्या बायका पोरांची,
करा विवस्त्र यांच्या आयाबहिणींना राजरोसपणे,
तोडा यांचे हात, पाय, मुंडके दिवसा ढवळ्या,
करा कत्लेआम यांच्या समूळ खानदानीचा.
काय म्हणू मी ह्यांना?
ह्यांना हिजडे सुध्दा म्हणू शकत नाही आपण.
कारण हिजडेसुध्दा करतात अन्यायाचा प्रतिकार टाळ्या वाजवून. 
ह्यांना तो सुध्दा करता येत नाही.
आता हे काय करतील?
निषेध नोंदवतील, 
सभा घेतील आणि सह्यांचं निवेदन काढतील,
की ज्याच्यावर कुत्रसुध्दा मुतणार नाही.
रमाबाई काॅलनीत ज्याने ह्यांची अकरा माणसे मारली,
त्याचा एक बालसुध्दा बाका करु शकले नाहीत हे.
ह्यांना मारणारा ह्यांच्या उरावर बसून प्रमोशन घेतोय आणि......,
हे स्साले मंत्रीपदाची भीक मागताहेत.
भोतमांगे प्रकरण तर आत्ता झालं,
पण यांचं भिकमांगे प्रकरण तर रोजच चालू आहे.
मला कळत नाही,
ही कर्तुत्वशुन्य जमात कशाला जाते कोरेगावला?
कशाला बढाया मारते आपल्या शूरपणाच्या?
आमच्या बापजाद्यांनी पेशवाईला धूळ चारली म्हणे.
असं काही म्हटलं की,
हे म्हणतात आम्ही बुध्दाचे अनुयायी,
शांतीचे उपासक!
अत्याचार झाला तर हे म्हणतील, साधू, साधू!
बलात्कार झाला तर हे म्हणतील, भवतु सब्ब मंगलम!
कोणी अंगावर धावून आला तर हे म्हणतील, अत्त दिप भवं!
म्हणे आम्ही बुध्दाचे अनुयायी.
अरे बुध्द काय तुमच्यासारखा शेळपट नव्हता.
बुध्द शूर होता, 
निर्भय होता,
लढवय्या होता!
म्हणून तर अंगुलीमालसारख्या शेकडो नराधमांना त्याने नमवलं आपल्या पायाशी.
तुमच्यासारख्या भ्याड आणि डरपोक लोकांचा बुध्दांशी संबंधच काय?
अरे कशाला तुमच्यासोबत त्या बुध्दाचीही बदनामी करता?
आज जर तुमचा तो बाप जीवंत असताना,  तर सगळ्या दुनीयेला आग लावून मोकळा झाला असता तो.
कारण तो होता शेरेबब्बर,
तुमच्यासारखा बॅ,बॅ करणारा बकरा नव्हता तो.
अरे घरादाराला आग लागलेली असताना त्रिशरण म्हणतात काय?,
बायकापोरांची नग्न धिंड काढली जात असताना कॅडर कँप घेतात काय?,
सर्रास कत्लेआम होत असताना मेडिटेशन करत बसतात काय?
अरे माझ्या भावांनो अन् बहिणींनो,
शिका नाहीतर नका शिकू,
संघटित व्हा नाहीतर नका होवू.
पण आपल्या बापाने सांगीतलयना संघर्ष करायचाय म्हणून. 
मग अजून तुम्ही थंड कसे?
चला ना आता भिडूया ना एकदा,
कोरेगावचा इतिहास पुन्हा जागवूया ना एकदा,
चवताळलेले पँथर्स पुन्हा होऊया ना एकदा,
आणि शेवटचा का होईना पण एल्गार करुया ना एकदा!
आणि शेवटचा का होईना पण एल्गार करुया ना एकदा!!

                     - विवेक मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com