Top Post Ad

कशाची माफी मागायची ? अमोल मिटकरी यांचा थेट सवाल


 

 कशाची माफी मागायची ?
जे मला माफी मागा म्हणतायत,त्यांना माझा साधा प्रश्न आहे,, आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे” - अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीवर वक्तव्य करत त्यातील वास्तव उघड केले. यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाने  पुण्यात अमोल मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.  शनिवारी गुरुजींच्या पारंपारिक वेषात व पारंपारिक मंत्रघाेष करण्यात येणार हाेते. परंतु त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालया बाहेर पक्षाचे कार्यकर्ते माेठया सं‌ख्येने जमले आणि त्यांना विरोध केला. यामुळे हे आंदोलन फसले. यावेळी दोन्हीकडून प्रचंड  घाेषणाबाजी झाली. यामध्ये  धक्काबुक्की झाल्याने पाेलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणताना कसरत करावी लागली.   या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली. ब्राह्मण  महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहिला मिळाला.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया बाहेर काही मंडळी येऊन आंदोलन करत हाेती. आंदोलन कर्त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा बुक आणून ठेवण्यात आला हाेता. या कार्यालयाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न साेडवण्यासाठी झाला पाहिजे. ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्त्यांनी मंत्राेच्चार करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे निषेधात वक्तव्य केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. अमाेल मिटकरींचे भाषण हे त्यांचा एक वेळचा विनाेद हाेताे. राज्यात विनाेदबुध्दी राहिली नसून तेवढयापूरताच ताे मर्यादित हाेता.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल राज्यपाल बोलले तेव्हा काही प्रतिक्रिया नाहीत पुरंदरेंच्या लिखाणावर काही बोलले नाहीत असा सवाल करीत ‘ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी सगळं तपासावं. कन्यादान हा कन्या दान विरोध करण्याचा विषय नाहीय, स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चारला तो मी सांगितला,  कुठल्याही समाजावर टीका केली नाही, मी कोणत्याही समाजाचे नाव घेतले नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ तपासावा. मी केवळ एका गावात कन्यादान सुरू असताना त्यास विरोध केला. कन्यादान करण्याचा विषय नाही, कन्यादान सुरू असताना त्या गुरूजींनी जो मंत्रोच्चार केला, त्याचा मी केवळ अर्थ सांगितला  माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय,

 सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यासभेत बोलताना मिटकरी यांनी भाषणात एका लग्नाचा किस्सा सांगितला होता. 'आपला बहुजन समाज कधी दुरूस्त होईल काय माहित, आचमन करा..' असे म्हणतच एका लग्नाला गेलो होतो, त्यावेळी तिथे मुलीच्या वडीलांनी कन्यादान आहे असे सांगितले, म्हटले अन्नदान ऐकले, नेत्रदान ऐकले, रक्तदान ऐकले. पण कन्या काय दान करण्याचा विषय आहे का? असे मिटकरींनी विचारल्याचे सांगितले. यावेळी बोलताना मिटकरींनी लग्न लावणारे गुरूजी सांगतात की डोळ्याला पाणी लावा, आणि तुम्हा दोघांचे हात माझ्या हातात द्या आणि म्हणा 'मम भार्या समर्पयामि'... मग मी नवरदेवाला या मंत्राचा अर्थ सांगितला की गुरुजी म्हणताय की मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको समर्पयामि म्हणजे घेऊन जा. असे म्हणताच स्टेजवरील मंत्री आणि सभेला उपस्थित सर्व जण हसु लागले होते. या वक्तव्यावरून मिटकरी यांच्याविरुद्ध ब्राह्मण संघटना असा वाद निर्माण झाला आहे.

ब्राम्हण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या घटनेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे त्या ठिकाणी हजर होत्या. या सर्व प्रकरणावर इशारा देतांना त्या म्हणाल्या, आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवावं,  तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं. 

“त्यांनी आमच्या कार्यालयात घुसून मंत्र म्हणायला सुरवात केली. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या काही महिला कार्यकर्त्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द देखील काढले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्हाला निषेध करायचा असल्यास तो लोकशाही मार्गाने करा”, “या आंदोलनानंतर आम्ही त्यांना देण्यासाठी रुपये एकशेएकची दक्षिणा आणि केळी देखील आणली होती. परंतु ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते ते न घेताच निघून गेले. आमच्याकडून आणि अमोल मिटकरी यांच्याकडून कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत.” “त्यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करावं. घरात घुसण्याची भाषा करू नये. अंगावर आलात तर डोक्यावर घेऊन जाऊ”, असे देखील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे पुढे म्हणाल्या आहेत. 


    



छत्रपती शाहूजी महाराजांनी बऱ्याच वेळा सांगूनही त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईसाहेब काही ऐकल्याच नाहीत, ही बाब त्यांनी चातुर्मासात वाड्यात पोथी पुराणांचे वाचन करण्याची परवानगी महाराजांच्या मातोश्रींकडून मिळवली. आता पोथी पुराणांचे वाचन लावायचेच असेल तर महाराजांनी *मत्स्यपुराणातील अनंगदानाचा ७० वा अध्याय* लावा असे सांगितले . यावर मनोभावे पूजा अर्चना करणाऱ्या लक्ष्मीबाईसाहेबांना खूप आनंद झाला . पोथी सुरू झाल्यावर महाराज लंडन दौऱ्यावर निघून गेले आणि पोथी संपण्याच्या सुमारासच घरी आले.  
  
मत्स्यपुराणातील ७० व्या अध्यायाचे वाचन संपत आले होते. या दिवशी तरी महाराजांनी हा अध्याय आपल्याबरोबर ऐकावा अशी विनंती लक्ष्मीबाईसाहेबांनी महाराजांना केली तेव्हा महाराज बसले.      तो नेहमीचा पुरोहित आला त्याचे मनोभावे पाद्यप्रक्षालन करण्यात आले. महाराज वगळता सगळ्यांनी त्याचे दर्शन घेतले. त्याने भक्तीमय वातावरणात ७० वा अध्याय सांगितला.    महाराजांनी त्यास मराठीत निरूपण करण्यास सांगितले असता त्याने सदर श्लोकाचा अर्थ सांगितला तो येणेप्रमाणे, 

" चातुर्मासात श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेत्तर स्ञीला सुगंधादि पाण्याने आंघोळ घालावी. तिला नवीन कपडे परिधान करण्यास द्यावीत. तिला अंलंकारादि भूषणाने नटवावे व हे सर्व झाल्यानंतर राञी भोगण्यासाठी ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे व ब्राह्मणाने त्या ब्राह्मणेत्तर महिलेला यथेच्छ भोगावे .".
      हे ऐकताच लक्ष्मीबाईसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अंगाचा तीळपापड झाला. डोळ्यात क्रोध भरला. राजस्त्रीचा मर्यादाशील स्वभाव सारून ज्याच्या पायांची थोड्या वेळापूर्वी पूजा केली होती त्या भटजींच्या अंगावर त्या आपले पायताण घेऊन धावल्या....
     महाराजांनी भटजीला दूर केले व लक्ष्मीबाईसाहेबांसमोर दूध का दूध पाणी का पाणी केले. तेव्हापासून तिथे कोणतेही वैदिकोपचार झाले नाहीत. खुद्द लक्ष्मीबाईसाहेबांनी याला आळा घातला....
     राजहूकूम देऊन महाराजांना हे बंद करता आले असते वा नकार देता आला असता परंतु महाराजांनी प्रबोधनाचा दुसरा मार्ग स्विकारला.

       #_मम_भार्या_समार्पियामी* (मराठीतील अर्थ - माझी बायको तुला देऊन टाकतो ) म्हणून मिटकरींनी अर्थ सांगितला पण ब्रम्हवृंद चवताळून उठलाय आता त्यांनी हे धार्मिक थोतांड मान्य करावे !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com