Top Post Ad

आयपीएलवर कोटींचा सट्टा... बेटिंगच्या पैशात कुणाकुणाची हिस्सेदारी...?  क्रिकेट प्रेमींसाठी खेळाची पर्वणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल अर्थातच इंडियन प्रीमियर लीग सामन्यांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पहिल्यांदा आयपीएलचे सामने भारतात होत असून मुबईच्या वानखेडे स्टेडियम, ब्रेबोर्न स्टेडियम, डी वाय पाटिल स्टेडिअम आणि महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, पुणे या चार ठिकाणी आयपीएल मॅच खेळल्या जात आहेत. आयपीएल 2022 च्या सीझनमध्ये एकूण 70 लीग सामने होत असून 10 संघ सामन्यात खेळत आहेत. त्यांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने खेळले जाणार आहेत. तर बेबॉर्न स्टेडियमवर 15, डी. वाय पाटील स्टेडियमवर 20 आणि पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 15 सामने खेळले जाणार आहेत. तर ब्रेबॉर्न आणि पुण्यातील एमसीए स्टेडिएमवर तीन-तीन सामने होणार आहेत. 

 आयपीएल 2022चा मेगा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात 204 खेळाडूंवर एकूण 5 अब्ज 51 कोटी, 70 लाख रुपयांची बोली लागली. तर या सामन्यांचे ब्रॉडकास्टिंग राईट्स 3 हजार 270 कोटी रुपयांना विकले गेले आहे. तसेच आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटाने 600 कोटी रुपये खर्च केले आहेत. याव्यतिरिक्त शेकडो कोटींच्या स्पॉन्सरशिप या सामान्यांना मिळालेल्या आहेत. शेकडो-हजारो कोटींच्या घरात आकडे असलेला हा जगाला दिसणारा व्यवहार असून या पलीकडे देखील पडद्याआडून हजारो कोटींची उलाढाल आयपीएल सामन्यावर होतेय. तो पडद्याआडील व्यवहार म्हणजे क्रिकेट बेटिंग अर्थात क्रिकेट सट्टा बाजार होय. सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझन मध्ये एकूण होणाऱ्या 70 सामन्यांवर 21 हजार कोटींच्या घरात सट्टा लागणार असल्याची शक्यता एका आंतरराष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या बिजनेस वेबसाईटने वर्तवली आहे.  

आयपीएल जसे खेळासाठी चर्चेत असते तसेच त्याची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे येथे होणाऱ्या करोडो-अब्जो रुपयांच्या उलढालीची. खेळाडूंवर लागणाऱ्या कोट्यवधींच्या बोली, हजारो कोटींच्या ब्रॉडकास्ट राईट्स, हजारो करोडोंची स्पॉन्सरशिप आणि बरंच काही.   या साऱ्या जगासमोर असलेल्या हजारो कोरोडोंच्या उलाढाली पेक्षा जास्त खोऱ्याने पैसा खेचतात ते म्हणजे क्रिकेटवर जगभरातून सट्टा घेणारे बुकी. संपूर्ण सट्टा बाजार ऑनलाइन झाल्याने सध्या प्रत्येक सामन्यावर आणि सामन्यातील प्रत्येक बॉलवर अवघ्या काही सेकंदात शेकडो कोटींचा डाव संपूर्ण जगभरातून खेळला जातोय. सध्या सुरू असलेल्या आयपीएल सीझनमध्ये एकूण 70 सामने होणार असून प्रत्येक सामन्यावर जगभरातून 300 ते 800 कोटींच्या घरात सट्टा लावला जातोय. प्रत्येक संघावर एक भाव ठरवून त्याद्वारे हा सट्टा ऑनलाइन घेतला जातोय. या साऱ्या सट्टा सिंडिकेटचा व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी बुकींची साखळी देशातल्या प्रत्येक राज्यात व राज्यातील प्रत्येक महानगरात कार्यरत आहे. सध्याच्या आयपीएल काळात 21 हजार कोटी रुपयांची उलाढाल सट्टा बाजारात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र प्रत्येक्षात यापेक्षा जास्त पैसा सट्टा बाजारात फिरतोय असा अंदाज मुंबईतल्या एका बुकीने व्यक्त केला. 

मात्र, प्रत्येक्षात बेटिंग घेणाऱ्या सट्टा बुकींना विचारले असता त्यांनी हा आकडा कमी असल्याची शक्यता वर्तवली आहे. उल्हासनगर शहरातील एका बुकीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की, सध्या होणाऱ्या प्रत्येक सामन्यावर मुंबईसह भारतातील मोठ्या महानगरातून 300 ते 800 कोटींच्या घरात सट्टा डाव लावला जातोय. तर सध्या बोटिंग पद्धती ऑनलाइन झाल्याने जगभरातून कमी कालावधीत बेटिंग स्वीकारणे सहज शक्य झालेय. त्यामुळे जगभरातून लागणाऱ्या बेटिंगचा पैसा हजारो कोटींच्या घरात आहे. सामना सुरू असताना पुढील टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूवर, ओव्हरवर, व्हीकेटवर बेटिंग लावण्याची सोय ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे एका चेंडूवर अवघ्या काही सेकंदात शेकडो कोटींचा डाव लागतो, साहजिकच बेटिंगचा हा पैसा आपल्या कल्पनेपलीकडील आकड्यात असतो असे देखील या बुकीने सांगितले. आयपीएलवर बेटिंग लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आठ वेबसाईट कंपन्यांना हक्क देण्यात आले आहेत. ह्या कंपन्यांनी सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी भारतासह जगभरात महत्वाच्या ठिकाणी आपली बुकींची साखळी उभी केली आहे, अशी माहिती बुकिंवर कारवाई केलेल्या ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

हायटेक यंत्रणा -  कधी काळी कागदावर लिहून अथवा फोनवर घेतला जाणारा सट्टा बाजार आता आधुनिक झाला आहे. कुठल्याही एका टीम अथवा खेळाडूंवर बेटिंग लावण्यापासून तर प्रत्येक चेंडूवर, हंपायर निर्णयावर देखील आता ऑनलाइन बेटिंग लावता येतो. त्यास इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग म्हणतात. तर बुकींची एक साखळी नेहमीच हॉटलाईन वरुन सट्टा घेण्यास सज्ज असते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर बेटिंग स्वीकारण्यासाठी मुंबई परिसरातील बुकींनी तब्बल दीड हजाराहून अधिक टोल फ्री फोन लाईन सट्टा लावणाऱ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. खासकरून हॉटेल मध्ये रूम घेऊन तेथून बुकिंचा हा सारा नेटवर्क काम करीत असतो. 

टीम निहाय भाव - सट्टा बाजारात आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी सट्टा घेण्याची पद्धती मात्र जुनीच आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या भाव पद्धतीनेच हा सट्टा स्वीकारला जातो. भाव म्हणजे एखाद्या टीमला दिलेली किंमत असते. त्या किमतनुसार सट्टा लावणाऱ्यास पैसे दिले जातात. उदाहरणार्थ एखाद्या टीमचा भाव 1 रुपये 66 पैसे असेल आणि त्या टीमवर एखाद्याने 1 हजार रुपये लावले. तर ती टीम जिंकल्यानंतर सट्टा लावणाऱ्यास 1 हजार 660 रुपये मिळतील. अर्थात 1 हजार गुणिले 166 असे हे गणित असते. जी टीम जिकण्याची शक्यता जास्त असते त्याचा भाव कमी असतो. सध्याच्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंगला सर्वात कमी भाव फुटला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या चेन्नई सुपर किंगला 1 रुपये 60 पैसे इतका भाव आहे. तर मुंबई इंडियन्सला 2 रुपये 6 पैसे इतका भाव आहे. पंजाब किंगला 1 रुपये 83 पैसे, गुजरात टायटन्सला 2 रुपये 17 पैसे, सनरायझर्स हैदराबाद 2 रुपये 27 पैसे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1 रुपये 88 पैसे, दिल्ली कॅपिटल्स 1 रुपये 86 पैसे, लखनऊ सुपरजायंट्स 2 रुपये 7 पैसे असा भाव आहे. 

 इन प्ले बेटिंगवर सर्वाधिक सट्टा - खेळ सुरू असताना पुढील चेंडूवर अथवा खेळाडूंवर ऑनलाइन बेटिंग लावण्याच्या पद्धतीस इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग असे म्हणतात. सध्या अशा इन प्ले बेटिंगला सर्वाधिक पसंती मिळतेय असे एका बुकीने सांगितले. इन प्ले बेटिंगसाठी बेटिंग स्वीकारणाऱ्या वेबसाईट कंपन्यांनी खास ऑप्शन दिले आहेत. त्यात मॅच विनर, पहिल्या डिलिवरीवर रन, प्रति ओव्हर रन, प्रति ओव्हर रन, नेक्स्ट मॅन आउट, हायस्ट ओपनिंग पार्टनरशिप, प्लेयर्स इनींग रन असे ऑप्शन देण्यात आले आहेत. सट्टेबाज कुठल्याही ऑप्शनला निवडून काही मिनिटं अगोदर त्यावर बेटिंग लावू शकतो.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com