Top Post Ad

"आरोग्य हीच संपत्ती ".... 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस .


मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग "कोरोना महामारीशी" झुंज देतय आणि आताही देत आहे.  जगात आतापर्यंत आलेल्या महामारीच्या तुलनेत ही महामारी 10 पटीने घातक असल्याचे सिद्ध झाले.यामुळे जगात करोडोच्या संख्येने  संक्रमीत व  लाखोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला. तसे पहीले तर दिवसेंदिवस पृथ्वीचा ह्रास होत आहे.जगातील जंगल संपदा फक्त 60 टक्के शिल्लक आहे. कारण जगात मोठ्या प्रमाणात वाढते कारखाने यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होतांना दिसुन येते यांच्यामुळेच मानव, पशु-पक्षी,जिव-जंतु यांचे "आरोग्य" धोक्यात आले आहे.आज प्रत्येक देश आपल्या सुरक्षेसाठी परमाणु परीक्षण,अनुचाचणी, मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा साठा आणि मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक यामुळे आकाश-पाताळ, चंद्र -सुर्य,ग्रह-तारे व पृथ्वी यांच्यावर  प्रदुषणाचे सावट आपल्याला दिसून येते.

यामुळे पृथ्वी तलावरील "आरोग्य"अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचले आहे.परंतु आरोग्याची जोपासना मानवजातीलाच करायची आहे हेही तेवढेच सत्य आहे.आरोग्य सुदृढ कसे ठेवायचे याची जाणीव महीलांना जास्त असते.12 मे 1820 मध्ये ब्रिटनमध्ये जन्मलेली पहीली महीला नर्स उदयास आली तिचे नाव होते "फ्लॉरेंस नाईटॲगल"तीला "नर्सिंगची जननी" सुध्दा म्हटले जाते.कारण ती आरोग्याच्या बाबतीत देवदुतच होती.तीला "दी लेडी विथ दी लैप"(दीपक वाली महीला) हा मोठा बहुमान प्राप्त आहे.त्याचप्रमाने आधुनिक नर्सिंग आंदोलनच्या जन्मदाता मानल्या जाते.आरोग्य सेवेसोबतच अनेक भाषांचे ज्ञान,गणिताचे ज्ञान,एक विलक्षण व बहुमुखी लेखिकासुध्दा होत्या.

त्यांनी आरोग्य विषयक 50 हुन अधिक पुस्तके लिहिली.त्याचे आरोग्य विषयक योगदान पहाता दरवर्षी"आंतरराष्ट्रीय नर्सिंग दीवस"साजरा करण्यात येतो.यामुळे जगात सुरू असलेल्या महामारीवर महीलांचे आरोग्य विषयक योगदान कीती महत्त्वाचे आणि मोलाचे असते याची संपूर्ण जान जगाला अवश्य मिळेल.आरोग्याच्या दृष्टीकोनातून डॉक्टर,नर्स ही व्यक्ती म्हणजे मानवजातीसाठी "दैवीशक्ती"असल्याचे मी समजतो.जगातील वाढती लोकसंख्या आणि वाढते कारखाने यामुळे पृथ्वीवरील तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते.आज मोठ-मोठे ग्लेशीयर वितळत आहेत, समुद्राच्या पाण्याची पातळी दीवसेंदीवस वाढत आहे, भुकंप,सुनामीचे प्रकार,जंगलातील हिंसक पशु  शहरात धाव घेतांना दीसुन येते.यामुळेही मानवजातीचे "आरोग्य" धोक्यात आल्याचे दिसून येते.

त्यामुळे आज जगातील संपूर्ण देशांचे कर्तव्य बनते की आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.जगात इबोला ऍथ्रॅक्स,प्लेग,स्वाईनफ्लु, डेंग्यू , कॅन्सर एचआयव्ही सारखे अनेक साथीचे रोग आले.त्यावर आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियंत्रण सुध्दा आनले.परंतु आज चिनच्या "जैविक हतीयाराच्या" शर्यतीने मानवजातीचे आरोग्य धोक्यात टाकल्याचे दीसुन येते.आज जगात कोरोणामुळे (COVID-19)जे "मृत्यूचे तांडव" निर्माण झाले होते त्याला पुर्णतः चिनी जबाबदार आहे.WHO सहीत जगातील 200 देशांनी कोरोणावर व्हॅक्सिन व औषध शोधन्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व त्यात भारतासह अनेक देशांना यश प्राप्त झाले.परंतु बरेच देश व्हॅक्सीन बनवु शकले नाही.परंतु भारताने वर्षभरात व्हॅक्सीन बनवु संपूर्ण जगाला संजीवनी देण्याचे काम केले.याकरीता मी भारतीय वैज्ञानिकांना शत शत प्रणाम करतो.7 एप्रिल आपण आरोग्य दीवस म्हणुन साजरा करीत आहोत.

.सध्याच्या परीस्थितीत आरोग्याला एवढा धोका निर्माण झाला आहे की संपूर्ण जग आर्थिक मंदीशी लढा देत आहे.2009 मध्ये आर्थिक मंदी आली होती त्यापेक्षा भयानक आर्थिक मंदी 2020-2021 व 2021-2022 ची असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आय एम एफ) प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे.कारण 2020 व2021 ची आर्थिक मंदी ही "आरोग्याशी खिलवाड"केल्यामुळे निर्माण झाली होती आणि आता 2021-2022 मध्ये रशिया -युक्रेन युद्धाने भर टाकल्याने जगाची, आर्थिक, आरोग्य विषयक आणि तिसऱ्या महायुद्धाच्या संकेतामुळे चिंता आणखीनच गडद झाल्याचे दिसून येते.त्यामुळे आरोग्याशी कोणत्याही देशांनी चेष्ठा करू नये.

1915 मध्ये पहील्या विश्र्व युद्धात जर्मनीने "ऍन्युवेक्स ग्लोडर्स" या जैविक व्हायरसचा अट्याक जानवरांवर केला होता.यामुळे मानव हानीसुध्दा झाली.परंतु सरळ मानवावर अट्याक नव्हता.परंतु "कोरोणा व्हायरसने" सरळ मानवावर अट्याक करून संपूर्ण जगातील मानवजातीचे "आरोग्य" धोक्यात टाकुन "महामारी" पसरवील्याचे दीसुन आले .तरीही जगातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा मानवजातीला वाचविण्यासाठी "खांद्याला खांदा" लावून उभी आहे.यामुळेच आज आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) मोठ्या प्रमाणात कार्यरत करतांना दिसत आहे.कारण जगाचा मुलं मंत्र "आरोग्य हीच संपत्ती"हा आहे. याची जोपासना जगातील संपूर्ण देशांनी स्विकारली पाहिजे.

आज मोठ्या प्रमाणात जैविक खतांचा वापर होताना दिसतो यामुळे खान-पानच्या अनेक वस्तूनी विषेली रूप धारण केले आहे.यामुळे कॅन्सर सारखे महाभयानक बिमारीचे शिकार आपण जगात पहातो.आज युवकांमध्ये तंबाखू, गुटखा,दारू,ड्रग्स,खर्रा इत्यादींचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यामुळे जिवन धोक्यात येवुन "आरोग्यावर मोठा आघात" होवु शकतो आणि होत आहे.त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून या घातक वस्तुपासुन सावध रहायला पाहिजे व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. 

आपण एकीकडे "आरोग्य दीवस" साजरा करीत आहोत आणि दुसरीकडे चीन जगाशी आरोग्याच्या बाबतीत "धोका" देत आहे.स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून आल्हाददायक वातावरण निर्माण करू शकते व आरोग्य सुदृढ ठेवण्यास मोठी मदत मीळु शकते.कारण सुदृढ "आरोग्याचे ब्रम्हास्त्र स्वच्छताच" आहे.आज मानवजातीच्या आरोग्यासाठी जगातील संपूर्ण देशाचे डॉक्टर,नर्स,पोलीस प्रशासन,सुरक्षा विभाग,स्थलसेना, वायुसेना,जलसेना, अग्निशमन विभाग आरोग्य  नियंत्रणात रहावे यासाठी कसोटीचे प्रयत्न करतांना दिसते.कारण "जान है तो जहान है" मानव जगला तर देश जगेल, देश जगला तर जग जगेल यावरच पृथ्वीचे संतुलन टीकुन आहे.

मानवाच्या घोर चुकांमुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2020 पासून आजपर्यंत मोठे आव्हान जगापुढे आहे.ते आव्हान पेलण्याची डॉक्टर, वैज्ञानिक,सायंटीस्ट,नर्स यांना ईश्र्वर शक्ती प्रदान करो व जगातील मानवजातीचे आरोग्य सुदृढ राहो व कोरोणाचा जळामुळासकट नायनाट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.आज मानवजातीचे आरोग्य इतके धोक्यात आले आहे की करोना महामारीचे दु:ख पाहून मागील वर्षी जर्मनीतील आर्थिक मंदीमुळे "जर्मनीचे वित्तमंत्री शॉमश शाफर"यांनी आत्महत्या सुध्दा केली.त्याचप्रमाणे स्पेनच्या राजकुमारी 86 वर्षीय मारीया याचा मागील वर्षी कोरोणा व्हायरसमुळे मृत्यू झाला आणि अनेक देशांची मोठी नामांकित व्यक्ती कोरोणाच्या चपेटमध्ये आली आहे. आजच्या स्थितित आरोग्य वाचविण्यासाठी आणि सुदृढ ठेवण्यासाठी संपूर्ण मानवजाती आकाश-पाताळ एक करीत आहे.सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की "आरोग्य हीच संपत्ती आहे" Health Is Wealth मानवजातीचे आरोग्य चांगले तर सर्वच काही चांगले.

कारण धन-संपत्ती, जमीन-जुमला हा सर्व दीखावा आहे.कारण मनुष्य जन्म घेतो तेव्हा खाली हात येतो आणि मृत्यू समयी सुध्दा खाली हात जातो.त्यामुळे मानव, पशु-पक्षी जोपर्यंत पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत त्यांच्या "आरोग्याची"जोपासना व्हायलाच हवी यातच मानसाची मानुसकी आहे.सध्या भारतातील अनेक राज्यांत सुर्य आग ओकत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी आप-आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.जागतिक आरोग्य दीनाच्या निमित्ताने मी सर्वांना आव्हान करतो की, आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आरोग्य दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी.जगातील प्रत्येक व्यक्तीने आरोग्य दिनाचे औचित्य साधून एकतरी झाड लावले पाहिजे.कारण आरोग्याचा केंद्र बिंदू ऑक्सिजन आहे.वृक्षलागवडीने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, शुद्ध हवा, गुरांना चारा,मानवाला शुद्ध हवा व सर्वांना सावली मिळण्यास मोठी मदत होईल. 

  •  रमेश कृष्णराव लांजेवार
  • .9921690779, नागपूरटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com