आम्ही सोबत आहोत... म्हणणारे मावळे होते महाराजांचे गुरु

         गुरुचं काम असतं की आपल्या शिष्याला मार्ग दाखवणं, त्याला शिकवणं, मार्गदर्शन करणं, मग या शपथेवेळी का नसावा हा गुरु सोबतीला? "आम्ही सोबत आहोत" म्हणणारे मावळे होते महाराजांचे गुरु!          बाल शिवाजीला तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक शिकवायला रामदास नावाचा गुरु आला नव्हता! बारा मावळातील जमा झालेले शिलेदार बाल शिवाजीला लढाईत तरबेज करत होतं... ते तलवारबाज आणि तिरंदाज  होते शिवाजी महाराजांचे गुरु!

        आग्र्याहून सुटका आणि त्यांचा तिथून राजगडपर्यंतचा प्रवास कसा होता हे आजवर कोणालाच माहित नाही, आहे त्या फक्त अफवा आहेत. एवढं मोठ्या गोष्टीचं नुसतं नियोजन करण्याची सुद्धा कुवत नसेल त्या गुरुकडे.         अफजलखान चालून आला आहे, स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, पंढरपूर - तुळजापूर, रयत होरपळून निघत आहे, खुद्द शिवाजी महाराजांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे... आणि एवढ्या सगळ्या गदारोळात हा रामदास नावाचा गुरु कुठेच नसावा? बरं लढाई जिंकल्यानंतर किमान आशीर्वाद द्यायला तरी यावं, तेही नाही!        लढाईत शरण आलेली रायबाघन असो की कर्नाटकातील गढीची पाटलीन असो महाराजांनी स्त्रियांना नेहमी आदराची वागणूक दिली आहे. स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराला कठोर शिक्षा महाराजांनी वेळोवेळी दिल्या आहेत, अशावेळी  आपल्या पत्नी आणि आईलासुद्धा वाऱ्यावर सोडून, स्वतःच्याच लग्नातून पळून गेलेल्या माणसाला महाराज गुरु मानतील का, हा प्रश्न स्वतःलाच विचारुन पाहिला तर योग्य उत्तर मिळेल!

        पुरंदरच्या तहात मिर्झाराजा जयसिंग स्वराज्याची शकलं तोडत होता, महाराज ताकदीने आणि मनाने खचून गेले होते. अशावेळी आधारासाठी गुरु लागतो... महाराजांना पुन्हा उभं करण्यासाठी तिथे जिजाऊ माँसाहेब होत्या! त्या होत्या महाराजांच्या गुरु!         तानाजी, मुरारबाजी, बाजी, शिवा काशिद, प्रतापराव गुजर सोबत हजारो लोकांनी आपले जीव दिले स्वराज्याच्या स्थापनेसाठी... या अग्निकुंडात रामदासाच्या रक्ताचं सोडाच पण घामाच्या थेंबाएवढं सुद्धा योगदान नाही. कुठल्या लढाईत साथ नाही, मोहीम नाही, तहात सामील नाही, कुठलं प्रशिक्षण नाही...मग या माणसाचं 'गुरु' म्हणून काय अस्तित्व होतं? 

          छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंत रामदास स्वामी या व्यक्तीचा दूरदूरपर्यंत कुठेही संबंध नाही किंवा महाराजांच्या कर्तृत्वात काहीही योगदान नाही. समर्थ रामदास उर्फ नारायण ठोसर हा एक लेखक होता, चांगला कवी होता, संन्यासी होता, रामभक्त होता, त्याने हनुमानाची मंदिरं उभारली पण म्हणून तो काही शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता!               बाल शिवाजीला शहाजी महाराजांनी बंगळुरूवरून पुण्याला पाठवताना भविष्याची तयारी करूनच पाठवले होते. स्वराज्य ही संकल्पना शहाजी महाराजांची! त्यासाठी लागणारी तरबेज माणसं, मोहीमा... राजमुद्रा हे सगळं शहाजी महाराजांचं नियोजन असायचं  आणि जिजाऊ माँसाहेब त्याची अंमलबजावणी करायच्या. महाबली शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब आणि वेळोवेळी त्यांच्यासमोर उभा राहिलेली परिस्थिती हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु!!

          रामदासाचे नाव महाराजांचे गुरु म्हणून माथ्यावर मारणे हा खोडसाळपणा, खोटारडेपणा आहे. बऱ्याच काळापासून हे प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल कदाचित शब्द फिरवतील, प्रकरण शांत होईल पण काही दिवसांनी पुन्हा कोणीतरी हा खोडसाळपणा करील, पुन्हा कोणीतरी खडा टाकून पाहील. सत्ताधारी असो की विरोधक, एकाही नेत्याला साधा निषेधही करता येत नसेल तर हे महाराष्ट्रातचं दुर्दैव आहे. आज महाराजांच्या कर्तृत्वाच्या अस्तित्वावर वार केला आहे, उद्या अजून नीच पातळीवर पुढे सरकले तर नवल वाटायला नको. 

--- प्रकाश कोयाडे ---


 वीर उत्तमराव मोहिते हे नाव विदर्भाबाहेर पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या प्रखर कार्यकर्त्यांनाच परिचित असेल. वीर उत्तमराव मोहिते शिवकुळाचे अत्यंत अभिमानी होते. त्यामुळे जिजामाता, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज इत्यादी शिवकुळातील बहुजन जगत् उद्धारक त्यांचे आदर्श होते. मराठा इतिहासाचा त्यांना जाज्वल्य अभिमान होता. पेशव्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे केलेले विकृतीकरण दूर करण्यासाठी त्यांनी विद्यार्थी जीवनातच चळवळी उभारल्या. 

अकोला येथील ज्येष्ठ क्रांतिकारक लेखक व समाज प्रबोधनकार स्वामी नित्यानंद मोहिते महाराज यांचा वीर उत्तमराव मोहिते यांच्यावर प्रभाव होता. स्वामी नित्यानंद मोहिते महाराज यांनी मराठा इतिहासाचे संशोधन करून अनेक पुस्तिका प्रकाशित केल्या होत्या. 'शिवरायांचे गुरु कोण ?' हा त्यांचा सन 1937 ते 1940 च्या दरम्यानचा गाजलेला अत्यंत प्रखर व सत्य इतिहासाचा प्रबंध. रामदासी नपुंसक पिलावळीने छत्रपती शिवाजी महाराजांवर पळपुट्या रामदासाचे गुरुत्व थापले होते. रामदासी समलिंगी संघाच्या (आर.एस्.एस्.) माध्यमातून ते सगळीकडे पसरवले होते. स्वामी नित्यानंद मोहिते महाराजांनी सर्व मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन रामदासाची लंगोटीही त्याच्या अंगावरुन काढून खरा बाईलवेडा-पळपुट्या- विकृत मोगलांसाठी हेरगिरी करणारा रामदास जगासमोर नंगा उभा केला. रामदासाचे हे नंगे नपुंसकी विकृत दर्शन समोर येताच शिवप्रेमी रयतेने रामदास धिक्कारला. जेधे-जवळकरांचे 'सत्यशोधकी जलसे' व 'छत्रपती मेळे' ही महाराष्ट्रात गावोगाव पसरले होते. त्या माध्यमातूनही विदर्भात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची कधीही भेट झाली नसल्याचे समाजास समजले.   

गुरुवर्य कृष्णराव अर्जुनराव केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले शिवचरित्र लोकांनी वाचले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लेख व पत्र लिहून सन. 1920 मध्येच 'दादोजी कोंडदेव व रामदास स्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केले होते. ही थाप म्हणजे रामदासी ब्राह्मणांची क्लृप्ती आहे.' अशा पद्धतीचे शाहू महाराजांचे रामदासाबद्दलचे स्पष्ट मत होते. रामदासाच्याच रंगनाथ स्वामी व तीनशे ब्राह्मण रामदासी शिष्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कारस्थान केले होते. रामदासींनी औरंगजेबासाठी हेरगिरी केली होती. त्यातच छत्रपती संभाजीराजांचा घात झाला होता. हा सर्व सत्य इतिहास बाहेर आला होता. 

 शिवाभिमानी विद्यार्थी उत्तमराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली गावोगाव रात्रं-दिवस फिरून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास विविध लोककलांच्या माध्यमातून सांगत होते. रामदास व रामदासी हरामखोऱ्या समजल्यामुळे तरुणवर्ग रामदासाविरोधात पेटून उठलेला होता. त्यातून रामदासाचा 'दासबोध' जाळण्यात आला. आणि याच पार्श्वभूमीवर सन 1930 मध्ये अमरावती शहरातील सिनेमागृहात 'भगवा झेंडा' नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकराचा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी उत्तमराव मोहिते व सहकारी गेले होते. हा चित्रपट सुरू झाला. काही वेळाने ह्या चित्रपटात रामदास हा शिवरायांचा गुरू असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर स्वत शिवाजी महाराज रामदासाच्या पाया पडत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले. 

हा असत्य, विकृत व घाणरेडा शिवरायांचा अपमान करणारा प्रसंग पाहून सर्व शिवप्रेमी युवकांचा राग अनावर झाला. त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या प्रचंड घोषणा दिल्या व चित्रपट बंद पाडला. चित्रपटगृहाचा पडदा जाळून टाकला. थियटरची मोडतोड केली. चित्रपटाच्या सर्व फिल्म रिळचा ताबा घेऊन ते नष्ट केले. रामदास व रामदासींचा धिक्कार करत थियटरला आग लावून प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. पोलीस आले. सर्व युवकांनी त्यांना सत्यकथन केले. पोलिसांनी उत्तमराव मोहितेंना अटक केली. सुटका झाल्यावर उत्तमरावांनी सहकाऱयांना एकत्रित करून गावोगावी दासबोध जाळण्याचा यशस्वी कार्यक्रम राबविला. त्यासाठी वीर उत्तमराव मोहित्यांनी 'मी दासबोध जाळणार आहे' याचे समर्थनार्थ एक शोधपुस्तिका प्रकाशित केली होती (जिजाई प्रकाशनानेही आता प्रकाशित केली आहे.) प्रल्हाद केशव अत्रेंनी मोहिते यांना हे आव्हान दिले होते. रामदास व रामदासी कुरूपता समजताच सगळीकडे रामदासाचे दहन जनता प्रेरणेतून करू लागली. गावोगाव युवकामध्ये शिवप्रेरणा निर्माण केली व त्यांनी एकत्रित येऊन अमरावती शहरात सुमारे एक लाख लोकांच्या वतीने उत्तमराव मोहिते यांना 'वीर' ही पदवी प्रदान केली. अशा रितीने लेखक 'वीर उत्तमराव मोहिते' झाले.  

`भगवा झेंडा' चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांना कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांनीच राजाश्रय दिला होता. रामदासाचा शिवचरित्राशी प्रत्यक्षात कोणताही संबंध नाही; हे शाहुजी महाराजांचे सत्यकथन रामदासी भालजीच्या जिव्हारी लागले होते. म्हणून भालजीने शिवकुळाची बदनामी केली. याला म्हणतात ब्राह्मणांचा सांस्कृतिक दहशतवाद. हे सज्जन ब्राह्मणांचे वर्तन! वीर उत्तमराव मोहितेंच्या यशस्वी लढाईनंतर चित्रपटावर बंदी आली. महाराष्ट्रात रामदासाविरुद्ध वातावरण तयार झाले. छत्रपती मेळे सुरूच होते. ब्राह्मणांच्या हरामखोऱ्याबाहेर येवू लागल्या. नकळत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वातावरण तयार झाले. ब्राह्मणांनी हातपाय जोडायला सुरुवात केली.

 स्वामी नित्यानंद मोहिते महाराज यांचे पुस्तक 'शिवरायांचे गुरु कोण ?' पुणे शहरात सत्यशोधक मराठा नेते केशवराव जेधे यांनी इ.स. 1939 मध्ये प्रकाशित केले. पुस्तकाच्या हजारो प्रती हातोहात व महाराष्ट्रभर पोचल्या. शिवप्रेमी पुन्हा ब्राह्मणी हरामखोरीविरुद्ध पेटून उठले. आणि चलाख ब्राह्मणांनी प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांचे पाय धरायला सुरुवात केली. शिवरायांचे वारसदार, सरदार, इनामदार, देशमुख, देशपांडे, पाटील, वतनदार मराठ्यांना ब्राह्मण शरण गेले. मराठे पिघळले. शरण आलेल्यांचे संरक्षण करणे हा मराठ्यांचा मराठाधर्म ब्राह्मणांनी जागा केला. ब्राह्मणांनी ब्राह्मणी अस्त्रांचा वापर करून ब्रह्मसंहार वाचवला. ब्राह्मणांचे जीव वाचले, पण ब्राह्मणी क्रूरता डिवचल्या गेली होती. त्यामुळे मराठ्यांची श्रेष्ठ, त्यागी, शूर, संस्कृती डागाळण्याचा चंग ब्राह्मणांनी बांधला. (भांडारकर प्रकरणातही असेच घडले.)  

मराठ्यांना समोरासमोर रणात हरविणे इंद्रालाही अशक्य आहे, हा मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांना माहीत आहे. म्हणून त्यांनी विष्णू अवतारातील एक-एक प्रयोग मराठ्यांविरुद्ध वापरायला सुरुवात केली. त्यासाठी साम-दाम-काम-दंड-भेद ह्या ब्राह्मणी तत्त्वांचा वापर सुरू केला. रणमैदान गाजविणारे अनेक मराठे ब्राह्मणी रमणांच्या वनात रमले. कामनीतीने काम केले. मराठ्यांच्या सांस्कृतिकीकरणाची हागणदारी करण्याचा क्रूर कार्यक्रम राबविण्यासाठी भोर, औंध, सांगलीची ब्राह्मण संस्थानं क्रूर पद्धतीने एकत्र आली. सारा ब्रह्मवृंद घरदार सोडून तिथे जमा झाला. मराठा शूर कुळातील कागदपत्रे - मूळपत्रे-अस्त्र- शस्त्र वेगवेगळी ब्राह्मणी आमिषे दाखवून मिळविली.

 मराठ्यांचे मोठेपण स्पष्टपणे सिद्ध करणारे सारे मूळ इतिहासाचे साधने ह्याच काळात ब्राह्मणांनी जाळून भस्मसात केली. ते कागदांचे भस्म नव्हते; तर मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचे भस्म होते. अशा रितीने मराठ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेला इतिहास क्रूर ब्राह्मणांनी काळ्या शाईनेच काळा केला. रक्त वाहून गेले, पण बाह्मणी शाई अजरामर झाली. राजकी इतिहास काळवंडल्यावर ब्राह्मणांनी मराठ्यांचे मेंदू गुलाम करण्याची यशस्वी मोहीम राबविली. मराठ्यांचा सांस्कृतिक इतिहास त्यापेक्षा काळाकुट्ट केला. हाच काळाकुट्ट डागाळलेला इतिहास नष्ट करण्यासाठी मराठ्यांचं मन, मान, मनगट, मस्तक, मणका व मेंदू सशक्त होऊन अन्यायाविरुद्ध क्रांती करण्यासाठी सज्ज व्हावा, या उद्देशाने वीर उत्तमराव मोहिते यांनी 'मराठ्यांच्या सांस्कृतिक क्रांतीचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला होता. वीर उत्तमराव मोहिते या व्यक्तीची ओळख आज नव्या पिढीला नाही. महाराष्ट्रालाही नाही. 


मराठ्यांचे रामदासीकरण - या पुस्तकातून साभार 

पुरुषोत्तम खेडेकर- पुणे 

----------------------------------------------------टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1