Top Post Ad

काश्मीर फाइल्सचे पूर्णसत्य. !

    नुकताच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहून अनेकांना काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अन्याय - अत्याचार झाला, ते पाहून रडू कोसळत आहे व काश्मिरी पंडितांविषयी सहानुभूती दाटून येत आहे.    काश्मिरी पंडितांवर अन्याय आणि अत्याचार झाला आहे, हे तर सत्यच आहे, पण याला जबाबदार कोण होते? याचाही विचार झाला पाहिजे. चित्रपट पाहून तर असे वाटते, की काश्मिरी पंडितांवर जो अन्याय - अत्याचार झाला अथवा त्यांना काश्मीर सोडून जे पलायन करावे लागले, त्याला काश्मीरमधील सर्व मुसलमानच जबाबदार होते, त्यामुळे ज्यांना काश्मीरमधील त्या कालखंडाबद्दल वा तेव्हाच्या सत्य परिस्थितीबद्दल काहीच माहित नाही, अशा दर्शकांच्या मनात काश्मिरी मुसलमानांबद्दल (आणि आपोआपच देशातील सर्वच मुसलमानांबद्दलही) घृणा आणि तिरस्कार निर्माण होणे साहजिक आहे; पण मित्रांनो, चित्रपटात जे दाखवले जाते, ते नेहमी सत्यच असते, असे नाही आणि या चित्रपटात तर सत्याचा सरळसरळ गळा घोटलेला आहे. या चित्रपटाने सत्य इतिहासाचा कशाप्रकारे विपर्यास केला आहे, ते माझ्या वाचनाप्रमाणे मी क्रमशः स्पष्ट करण्याचा  प्रयत्न करत आहे.

 वाचकहो, 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहून दर्शकांचा असा समज होतो, की काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंच्याच हत्या केल्या, कारण काय तर दहशतवादी मुसलमान होते आणि त्यांना काश्मीर खोऱ्यात एकही हिंदू नको होता, पण हे ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णतः चुकीचे आहे; कारण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जसे हिंदूंच्या हत्या केल्या, तशाच मुसलमानांच्याही हत्या केल्या आहेत! यासंदर्भात पुराव्यानिशी मी खाली मांडणी करत आहे.

👉🏼 काश्मीरमधील पहिली राजकीय हत्या दि. २१ ऑगस्ट १९८९ रोजी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद युसूफ हलवाई यांची झाली होती. याशिवाय काश्मीरमधील सोपीयानचे कम्युनिस्ट पार्टीचे माजी सचिव अब्दुल सत्तार गंजू, मुस्लिम युनायटेड फ्रंटचे (MUF) संस्थापक सदस्य डॉ. काजी निसार अहमद यांच्याही हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केल्या. याच काळात (सन १९९०) काश्मीर विद्यापीठाचे उपकुलगुरु मुशीर उल हक, त्यांचे स्वीय सचिव अब्दुल गनी आणि HMT वॉच कंपनीचे काश्मीरमधील मुख्य व्यवस्थापक एच. एम. खेरा यांची अपहरण करून हत्या केली. (१)

👉🏼 फेब्रुवारी १९९० मध्येच दूरदर्शन श्रीनगरचे निर्देशक लासा कौल व सहनिर्देशक पी. के. हांडू तसेच, सन १९९३ मध्ये महम्मद शफीक बट, मेहराजुद्दीन व अब्दुल रशीद यांची हत्या झाली. संयुक्त निर्देशक सय्यद गुलाम नबी यांची १६ ऑक्टोबर १९९२ रोजी अपहरण करून निर्मम हत्या करण्यात आली. हे सर्वजण  काश्मीरमधील दूरदर्शन आणि आकाशवाणी विभागाचे कर्मचारी होते. (२)

👉🏼 IB अर्थात Intelligence Burrow या भारतीय गुप्तहेर संस्थेत काम करणाऱ्या काश्मिरी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मियांची हत्या काश्मिरी दहशतवाद्यांनी केली. (३)

👉🏼 त्यावेळी भारतात केंद्रात भाजपासमर्थीत व्ही.पी. सिंग सरकार सत्तेत होते. या सरकारमध्ये गृहमंत्रीपदी मुफ्ती मोहम्मद सईद हे काश्मिरी नेते होते. त्यांची मुलगी रुबिया सईद हिचे आतंकवाद्यांनी जेव्हा अपहरण केले, तेव्हा तिला सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांनी चार अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली. तेव्हा या मागणीस जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी प्रखर विरोध केला होता, तेव्हा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी परस्पर दहशतवाद्यांशी संपर्क करून चार दहशतवादी सोडले आणि रुबिया सईदची सुटका केली. हा सत्य इतिहास आपण लक्षात घ्यायला हवा. या चित्रपटात मात्र फारूक अब्दुल्ला यांना यासिन मलिक सोबत गुटरगुं करतांना दाखवले आहे, जे अनैतिहासिक आहे. याउलट दिल्लीमध्ये सन २००३ मध्ये काश्मिरी पंडितांची एक परिषद संपन्न झाली होती. यावरील वृत्तकथन (Proceeding) अवंती भाटी यांनी संपादित व प्रकाशित केले आहे, त्यात अशोक भान नावाचे काश्मिरी पंडित म्हणतात, की 'काश्मिरी पंडितांच्या घाटीमधून होणाऱ्या स्थलांतराला दोनच व्यक्तींनी विरोध केला होता. पहिले मिरवाईज मौलवी फारूक आणि फारूक अब्दुल्ला!' (मिरवाईज म्हणजे काश्मीरमधील इस्लामचे मुख्य धर्मगुरू) (४,५,६)

👉🏼 २१ मे १९९० रोजी मिरवाईज मौलवी फारूक यांची दहशतवाद्यांनी हत्या केली, कारण काय? तर मौलवी मिरवाईज यांनी उपरोल्लेखित रुबिया सईदच्या अपहरणाचा निषेध करून, असे कृत्य हे 'गैरइस्लामी' असल्याचे जाहीर केले. मिरवाईज हे धर्मप्रमुख असल्याने त्यांचा घाटीत मोठा प्रभाव होता. त्यामुळे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने मिरवाईज यांची हत्या केली. (७)

👉🏼 मिरवाईज यांची हत्या झाल्यानंतर त्यांची प्रचंड प्रेतयात्रा निघाली. हजारो लोक यात सहभागी होते. त्यावेळी काश्मीरचे मुख्य सचिव आर. के. ठक्कर हे होते. त्यांनी काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांना मिरवाईज यांच्या कबरीवर पुष्पगुच्छ अर्पण करण्याची विनंती केली, पण जगमोहन यांनी असे केले नाही, उलट या प्रेतयात्रेवर CRPF ने गोळीबार केला, ज्यात BBC च्या वृत्तानुसार १०० लोक मारल्या गेले. गोळीबाराचे आदेश काश्मीरचे तत्कालीन पोलीस महासंचालक अल्ला बक्ष यांनी दिले होते (अर्थात, ते मुसलमान होते, हे सांगण्याची गरज नसावी). (८, ९)

👉🏼 दहशतवाद्यांनी मारलेल्या काश्मीरच्या धर्मप्रमुखाच्या शवयात्रेवर राज्यपाल जगमोहन यांच्या संमतीने पोलीस महासंचालक अल्ला बक्ष CRPFला गोळीबाराचे आदेश देतात. किती आश्चर्यकारक आहे हे..! आपला धर्मप्रमुख ज्या दहशतवाद्यांनी मारला, त्यांच्याबद्दल प्रचंड घृणा व तिरस्कार मनात बाळगणाऱ्या काश्मिरी मुसलमानांवर जेव्हा भारत सरकारचे प्रतिनिधी अशा पध्दतीने गोळीबार करतात, तेव्हा याला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे असेच म्हणावे लागेल. भारतसमर्थक काश्मिरी जनतेला पाकिस्तानच्या पारड्यात कोणी ढकलले, याचा वाचकांनी थोडा विचार करावा.

👉🏼 प्रसिद्ध लेखिका तवलीन सिंग या आपल्या काश्मीरवरील पुस्तकात काश्मिरी पंडितांच्या विस्थापणास राज्यपाल जगमोहन यांनाच जबाबदार मानतात. 'जगमोहन यांनी काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेसाठी काहीही केले नाही', असे त्या म्हणतात. यासंदर्भात त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक पुरावेही दिलेले आहेत. (१०)

👉🏼 सन १९९० च्याच सुमारास दक्षिण काश्मीरमधील काँग्रेस नेते गुलाम नबी यांनी 'जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडून जाऊ नये', तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. (११)

👉🏼 एक काश्मिरी पंडितांचे नेते संजय टिक्कु यांच्या मते काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवळपास ६५० हिंदूंच्या हत्या केल्या. (१२)

👉🏼 सन १९८१ च्या जनगणनेनुसार काश्मीर घाटीत त्यावेळी एक लाख चोवीस हजार अठ्याहत्तर हिंदू राहत होते (ज्यात काश्मिरी पंडितांबरोबरच इतर जातीचे हिंदूही गृहीत धरले आहेत) आणि एकूण लोकसंख्येत त्यांची भागीदारी ३.१६℅ होती. ऐंशीच्या दशकात भारतीय जनसंख्या वाढीचा दर हा ६.७℅ इतका होता. त्यानुसार १९९० पर्यंत त्यांची संख्या अंदाजे एक लाख बत्तीस हजारांपर्यंत जाते. काश्मिरी पंडित स्थलांतरीत झाल्यावरही जवळपास आठ हजार हिंदू घाटीत राहत होते. याचा अर्थ असा की सन १९९० मध्ये काश्मीरमधून एक लाख चोवीस हजार हिंदू स्थलांतरीत झाले आणि हे स्थलांतरही एका रात्रीत न होता वर्षभरात झाले, त्यामुळे 'पाच लाख हिंदूंनी एका रात्रीत स्थलांतर केले', ही बोंबाबोंबही खोटी ठरते. (१३)

👉🏼 चित्रपटात हिंदू आणि मुसलमानांत स्वस्त धान्य दुकानांवर राशन वाटपाच्या वेळी भेदभाव केला जात असल्याचे एक दृश्य आहे. यासंदर्भात काश्मीर राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी राहिलेल्या खेमलता वटलु या असे म्हणतात, की 'स्वस्त धान्य दुकानांचा जेव्हा जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) ने ताबा घेतला, तेव्हापासून स्वस्त धान्य वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारख्याच प्रमाणात धान्य वाटप सुरु झाले.' विशेष म्हणजे खेमलता आणि त्यांचे पती यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते, अर्थात, दहशतवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या असूनही त्या JKLF विषयी वरील उद्गार काढतात. (१४)*

👉🏼 काश्मिरी पंडितांसाठी सन २०१४ पर्यंत कोणत्याही सरकारने काहीच केले नाही, असा एक आरोप सातत्याने केला जातो, पण हा आरोपही तथ्यहीन व निरर्थक आहे; कारण काश्मिरी पंडितांच्या सहाय्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांनुसार प्रतिव्यक्ती ₹ ५ लाख नुकसानभरपाई, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, प्रतिव्यक्ती ₹ २५००/- (एका कुटुंबाला जास्तीत जास्त ₹ १०,०००/-) मासिक मानधन, विविध राज्यांमध्ये शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, मोफत घरे इ. सुविधा देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे सन २०१४ अगोदरच्या केंद्र व राज्य सरकारांनी काश्मिरी पंडितांसाठी काहीच केले नाही, हा आरोपही निरर्थक ठरतो. याउलट, ज्या भाजप सरकारने 'आम्हीच काश्मिरी पंडितांचे खरे तारणहार' अशी वारंवार स्वतःचीच टीरी बदडून घेतली, त्यांनी ३७० कलम रद्द करण्याखेरीज काश्मीर व काश्मिरी पंडित यांच्यासाठी काहीही केलेले नाही. केंद्रातील भाजप सरकार काश्मिरी पंडितांच्या मदतीबाबत जो खोटा प्रचार करते, त्याबाबत 'पनून काश्मीर' या काश्मिरी पंडितांच्या संघटनेचे अध्यक्ष अग्निशेखर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहाल शब्दांत टीका करून सरकारचा निषेध केला आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. (१५, १६)

👉🏼 विविध स्रोतांपासून मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये ऐंशी व नव्वदच्या दशकात ज्यावेळेस दहशतवाद शिगेला पोहचला होता, तेव्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जवळपास ६५० काश्मिरी पंडितांची कत्तल केली, पण याच दहशतवाद्यांनी या काळात जवळपास २५००० भारतसमर्थक मुसलमानांनाही ठार केले! काश्मीर खोऱ्यातून जवळपास दीड लाख काश्मिरी पंडितांना पलायन करावे लागले, हे तर सर्वच जाणतात, पण जवळपास पन्नास हजार मुसलमानांनाही पलायन करावे लागले होते, हेही आपण लक्षात घ्यायला हवे..! (१७)

   यासंदर्भात अजूनही खूप काही लिहिता येईल, कारण काश्मीर प्रश्न हा इतका किचकट आहे आणि त्याला इतके पदर आहेत, की त्याविषयी अनेक अभ्यासकांनी हजारपानी पुस्तके लिहिली आहेत. लेखनमर्यादेमुळे मी इतकेच मांडले आहे.    थोडक्यात, एका चित्रपटात दाखवलेल्या अर्धवट व अनैतिहासिक माहितीवरून आपण काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या प्रश्नासंबंधी मत बनवणे, हे सत्य इतिहासावर अन्याय केल्यासारखे होईल, त्यामुळे याविषयी जाणून घेणारांनी या विषयावरील पुस्तके वाचायला हवीत.    शिळ्या कढीला ऊत आणून 'हिंदू - मुसलमान' खेळ खेळायचा आणि त्याचा उपयोग आपल्या विकृत राजकारणासाठी करायचा, यासाठी अग्निहोत्री आणि कंपूने या साऱ्या उठाबशा मारल्या आहेत. याचा फायदा कोणाला होणार आहे अथवा कोण याचा फायदा स्वतःचे विकृत हेतू साध्य करण्यासाठी करणार आहे, हे तर जगजाहीर आहे. असो.

   या चित्रपटात एक संवाद आहे, 

   'झुठी खबर दिखाना इतना बडा गुनाह नही है, जितना की सच्ची खबर छुपाना।' 
   विडंबना अशी आहे, की चित्रपटातील हा संवाद या चित्रपटात दाखवलेल्या अर्धवट अर्धसत्य कथानकालाच लागू होतो, म्हणून वाचकांनी यासंदर्भातील पूर्णसत्य जाणूनच आपली मते बनवावीत..!

बाळासाहेब_गरुड


  • #संदर्भ - 
  • @कश्मीर और कश्मीरी पंडित - लेखक अशोक कुमार पांडेय (१, ७, ८, ११, १२, १६, १७)
  • @रेडिओ कश्मीर - लेखक राजेश भट (२)
  • @कश्मीर : द वाजपेयी इयर्स - लेखक ए. एस. दुलत (तत्कालीन IB प्रमुख) (३)
  • @काश्मिरी पंडित : प्रॉब्लेम्स अँड पर्सपेक्टिव्ह - संपादन अवंती भाटी (४)
  • @कश्मीर : ग्लिमसेस ऑफ हिस्टरी - लेखक सैफुद्दीन सोज (५)
  • @माय कश्मीर - लेखक वजाहत हबीबुल्लाह (६)
  • @BBC काश्मीर वृत्तांकन १९९० (९)
  • @काश्मीर : ए ट्रेजेडी ऑफ एरर - लेखक तवलीन सिंग (१०)
  • @भारत : जनगणना १९८१ (१३)
  • @काश्मीर : बिहाइंड द व्हाइट कर्टन - लेखक खेमलता वखलु (१४)
  • @पनून काश्मीर या संघटनेच्या अध्यक्षांची युट्युबवर उपलब्ध असलेली मुलाखत (१५)
----------------------------------------------
 " द काश्मीर फाईल्स " चित्रपटात काश्मिरी पंडीत,ब्राह्मण यांच्यावर अत्याचार दाखवला हा अत्याचार हा अलिकडच्या काळातील आहे, म्हणजेच काश्मीर मधील मुस्लिम अतिरेक्यांमूळे झालेला आहे.हे निषेधार्थच आहे.
अशाच पध्दतीने भारतातील " द ब्राह्मण फाईल्स " या नावांने एक फिल्म तयार करा.हि जर का फिल्म काढली तर मुस्लिम अतिरेक्यांपेक्षाही किती भयानक अत्याचार हिंदू ब्राह्मणांनी या देशातील  बहूजन,मराठा,कूणबी,दलित, आदिवासी, भटके,मागासवर्गीय यांच्यावर केले हे दिसून येईल. साडेचार ते साडेपाच हजार वर्षे केवळ " मनुस्मृती " च्या आधारे किती नंगानाच केला हे दाखवा.लाखो पिढया " मनुस्मृती " च्या आधारे कशा सर्व साधनसंपत्ती पासून वंचित ठेवल्या ,बरबाद केल्या हे कळून येईल.

१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला पुण्यातील ब्राह्मणांनी विरोध का केला?  त्यांच्यावर ऐकमेव तलवारीने घाव करणारा ब्रांम्हणच का होता.?,आणी औषधांच्या रूपाने विष देऊन मारणारे ब्राम्हण पंडीतच का होते..?  
२)छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध  का केला? 
३)क्षात्रवीर,छ.संभाजी महारांजाना संपवन्याचा कट ब्राम्हंनांनी का केला..
४) महात्मा जोतिबा फुले यांना मारण्यासाठी कोणी मारेकरी  ब्राह्मणांनी का पाठविले?
५) माता सावित्रीबाई फुले यांना शाळेत शिकविण्यासाठी जात असताना शेण,दगड कोणी मारले ब्राह्मणांनी का मारले?
६) मुसलमान राजांजवळ कोण असायचे ? त्यांच्या दरबारात कोण मुजरा करायचे ? ब्राह्मण की,मागासवर्गीय ?
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यास विरोध ब्राह्मणांनी का केला.?
८)हींन्दू असनारे कूलबर्गी,दाभोळकर,पानसरेनां ब्राम्हनांनीच कट करून  का मारले.? 
९) जिजाऊ,शिवाजी महाराज,संभाजी महाराजांची आजही बदनामी हेच ब्राम्हनच का करतात..?
आणी हो राममंदीर बांधन्यासाठी बाबरी पाडन्याच्या आंदोलनात ६३००० तरून मारले गेले याची यादी पहा यात ऐकही पंडीत,ब्राम्हनांची पोरे नाही तर ही फक्त जाट गूज्जर,मराठा,
ओबीसीचीच आहेत.असे अनेक प्रश्न आहेत. यावरसुध्दा विचार करा .केवळ दलीत, मुस्लिम व्देष करु नका.
आज बाँलीवूडमध्ये सर्व मुस्लिम हिरोंच्या बायका हया " ब्राह्मण " आहेत. मग अशा फिल्म काढून डायरेक्टर काय साध्य करतोय ?

सतत हिंदू- मुस्लिम वाद,हिंदू ब्राह्मणांचा धर्मावर आधारित असलेला जातीयवाद यामूळे देशाचे अपरिमित असे भरुन न निघणारे नुकसान होत आहे .हे लक्षात घ्या.प्रत्येक हिंदू - मुस्लिम दंगलीमध्ये फक्त आणि फक्त बहुजन,मराठा,कूणबी, दलित, आदिवासी, भटके,मागासवर्गीय जातीचेच मुले मारली जातात. हे सत्य आहे.आतापर्यंत हिंदू - मुस्लिम दंगलीत पंडीत ,ब्राह्मणांची मुले का मारली जात नाही ?
 मराठा,कूणबी,ओबीसी,बहुजन , मागासवर्गीय, दलित, भटके,आदिवासी या मुलांची डोकी का भडकवली जात आहेत ?  "त्यांची मूले स्टडीत आणी आमची मूले कस्टडीत"? आज कोरोनामूळे सर्वांना समजले की आपण कसे वागले पाहीजे,आपण आपली आर्थीक,शैक्षणीक प्रगती करून आपण सर्व क्षेत्रात यशश्वी होवुन आपले जिवन सूसाह्य करावे..!  सत्तेसाठी जातीजातीत अन धर्माधर्मात वाद लावून स्व:ताला ऊच्चवर्णीय समजनारे स्व:ताचा व त्यांच्या समाजाचा फायदा करून घेत आहे, आपण आपले डोके स्वताच्या हितासाठीच वापरावा..ही अपेक्षा..
अशी फिल्म बनवा की,भारतातील सर्व समाजाला " हम सब एक हैं " असा चांगला संदेश जाईल......
   धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com