सायन रूग्णालयाच्या नवीन बाह्यरूग्ण इमारतीत रूग्ण, नातेवाईकांचे हाल

 सायन रूग्णालयाच्या नवीन बाह्यरूग्ण इमारतीत रूग्ण, नातेवाईकांचे हाल,
केस पेपर काढण्यासाठी होते हमरी तुमरी,  मुंबई महानगर पालिकेचे दुर्लक्ष,

मुंबई महानगर पालिकेचे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णलयाच्या बाह्यरूग्ण इमारतीत रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक यांचे अक्षरश्: हाल होताना दिसत आहेत. केस पेपर काढण्यासाठी रूग्ण,रूग्णांचे नातेवाईक,प्रशासकीय कर्मचारी यांच्यामध्ये हमरी-तुमरी होताना दिसत आहे.याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून मुंबईकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. रूग्णालय प्रशासनाने रूग्णांचे हे हाल थांबवावेत,अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

        सायनच्या बाह्यरूग्ण इमारतीत विविध आजारांवर ओपीडी आहेत. तीन मजली या इमारतीत सकाळी उपचार घेण्यासाठी येणा-या रूग्णांची तोबा गर्दी होत असते. अनेक जण केस पेपर व दहा रूपयांची पावती घेण्यासाठी सकाळी पाच वाजलेपासून इमारतीबाहेर रांगा लावतात.सकाळी आलेले अनेक रूग्ण व त्यांचे नातेवाईक ओपीडीसह केसपेपर घेण्यासाठी एकच गर्दी करताना दिसून येतात. त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी इमारतीतील सर्वाना बाहेर काढल्याने एकच गर्दी होते. त्याच सुमारास इमारतीचा दरवाजा खुला केल्याने एकच गर्दी झाल्याने परिस्थिती सुरक्षारक्षकांच्या हाताबाहेर जाते. त्यावेळी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते,अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार? असा सवाल रूग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत.प्रथम दहा रूपये पावती व त्यानंतर केसपेपर काढण्यासाठी रूग्णांची एकच गर्दी होऊन लांबच रांगा लागतात. दिरंगाई कारभारामुळे केसपेपर काढण्यासाठी बराच वेळ लागतो.त्यामुळे अनेक जण रांगेत जबरदस्ती घुसल्याने हमरी तुमरीची वेळ येते. अशावेळी सुरक्षारक्षक हजर नसल्याने अनेकांमध्ये झटापटी होत रहाते.त्यामुळे एकच गोंधळ उडून जातो.
 
   याप्रकरणी सायन रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधला असता तेही कार्यालयात उपलब्ध नव्हते. रूग्णालय प्रशासनाने याप्रकरणी योग्य तो तोडगा काढून केस पेपरच्या खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.पालिका रूग्णालय व आरोग्य विभागावर स्वतंञ अर्थसंकल्प ठेवून करोडो रूपयांच्या मुंबईकरांच्या  कररूपी आलेल्या रक्कमेतूून खर्च करत असते. त्यानंतर ही मुंबईकर रूग्ण व नातेवाईक यांची गैरसोय होणे ही बाब गंभीर असल्याची प्रतिक्रीया रूग्णांचे नातेवाईक यांनी देवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या